तत्रादौ मालाप्रथनप्रकार :--- ‘अष्टोत्तरशतं कुर्याच्चतु:पञ्चाशदेव तु । सप्तविंशतिकं वापि ततो नैवाधिका वरा ॥’ अक्षसूत्रं प्रकर्तव्यं गोपुच्छवलयाकृति । वक्त्रं वक्त्रेण संयोज्य पुच्छं पुच्छेन योजयेत् ॥ मेरुमूर्ध्वमुखं कृत्वा प्रत्येकं नागपाशकम् । एकैकमणिमध्ये तु ग्रंथिमेकं प्रकत्पयेत् ॥ आरोपयेद्धेमसूत्रे राजते ताम्रजेऽपि वा । ग्रथयेत् क्षौमसूत्रे वा मेरुं सूत्रद्वयं न्यसेत् ॥ इति ॥
अर्थ :--- १०८, ५४ वा २७ मण्याचे मालेचें सुवर्णतंतूमध्यें अथवा राजत, किंवा रेशमी सूत्रामध्यें ग्रथम करावें. प्रत्येक मण्यामध्यें एकेक गांठ असावी. रुद्राक्ष असतील तर मुखापुढें दुसर्या मण्याचें मुख यावें. पुच्छाकडे पुच्छ असें अथन करावें. मेरु उर्ध्वमुख असावा. अशा रीतीनें गुंफलेली माला संस्कार केल्यावांचून जपोपयोगी होत नाहीं.
म्हणून मालासंस्कार - विधि करावा.