तत्र न्यासो नाम :--- ‘तत्तन्मंत्रस्थं वर्णं पदं पादादि वा यथोपदिष्टमुच्चार्य
तत्तदंगावयवेषु अंगुल्यादिना विहितमुद्रया स्पर्श: ।’
अर्थ :--- मंत्रस्थ अक्षरादिकांचा उच्चार करून त्या त्या अंगावयवाला अंगुल्यादिकांनीं
विशिष्ट तर्हेनें स्पर्श करणें याला न्यास म्हणतात. अंगुल्यादींनी विशिष्ट तर्हेने
स्पर्श करणें ही न्यासमुद्रा होय. न्यास रोज आचरला जातो. पण त्याविषयींची पूर्ण
माहिती नसल्यानें योग्य रीतीनें होत नाहीं. म्हणून हा विषय सविस्तर देतों.