परसा भागवत व नामदेव यांचा संवाद

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


१.
परसा म्हणे नामयासी । अरे नामदेवा परियेसीं । तूं तंव दवडिल्या न जासी । मनीं न लाजसी अझुनी ॥१॥
परसा वदे  नामयासी । तुझे पूर्वज माझे चरणापासीं । जरी तूं हरिदास झालासी । तरी याती हीनची ॥२॥
तुवां कोठवरी काय देखिलें । नाहीं वेदशास्त्र म्हणीतलें । एक तुजची जाणीतलें । इतुकें झालें गावया ॥३॥
आणिक सांगेन एका । तूं तर ठायींचाची वासनीक । मातें लाविसी मौन टिलक । तेथें पाईक काय करी ॥४॥
तयासी त्वां कौटाल्य केलें । सहस्र वैष्णवांमाजी भुरळें । ठेले । तंव ते उमगो लागले । मग भुलले आपोआप ॥५॥
ऐसा तूं  कवटाळिया पाहीं । तुझे पूर्वज माझे पायीं । मन शंका धरिसी कांहीं । अझुनी तरी विचारीं पां ॥६॥
तुजसी करितां वादक । तरी हे शंकतील लोक । तूं तंव माझाची सेवक । विष्णुदासा म्हणे परसा ॥७॥
२.
यावरी नामदेव काय बोलला । आजि मनीं संतोष फार झाला । शब्द पूर्वजांचा ऐकिला । आनंदें भरला सागर ॥१॥
परसोबास म्हणे नामा । चरणतीर्थ द्यावें आम्हां । तुमचे चरणींचा महिमा । माझ्या पूर्व्जा आतुडला ॥२॥
इतुके दिवस गिवसितां पाही । परी हे व्यवस्था न पडे ठायीं । पूर्वज आहेत तुझे पायीं । तें म्यां आजि जाणितलें ॥३॥
तयासी आपुले चरणीं राहविलें । म्यां काय पूर्वी कर्म केलें । त्वां मज वेगळें धरियलें । थीतें अंतरलें चरण तीर्थ ॥४॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य समस्त । हे तंव तुमच्या पायां पडत । तया दंडवत घडत । दोष जाती तयांचे ॥५॥
ऐसें ठायींचेंच जाणतों । तरी कासया हिंडतों । चरण धरूनीच राहतों । विष्णुदास म्हणे नामा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP