महादा - यादवांचे कुळीं झोंड जे जन...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
यादवांचे कुळीं झोंड जे जन्मले । नाहीं ऐसें केलें मागेंपुढें ॥१॥
देईंगा विठोबा आमुचें ठेवणें । लोकांचें तूं ऋण नेदों पाहासी ॥२॥
आमुचे साधु आहेत सज्जन । तुमचा जमान कोठें देवा ॥३॥
नामयाचा महादा बळकट झाला । विठोबा आणिला चौबारांत ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP