मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संतचरित्रे| जनजसवंत संतचरित्रे कबीर कमाल मिराबाई भानुदास जगमित्न नागा संताजी पवार बोधलेबावा जनजसवंत जनाबाई गोरोबा कुंभार राका कुंभार नरसी मेहता चोखामेळा संतचरित्रे - जनजसवंत संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव जनजसवंत Translation - भाषांतर जनजसवंत भला । देवत याचे घरा गेला ॥१॥येऊन राहातो चाकरी । पोटा मागतो भाकरी ॥२॥स्त्री वाढावया गेली । वरचेवर विठठल झेली ॥३॥काम सांगा सहज कांहीं । करितों मी लवलाहीं ॥४॥मागें उरों नेदी कांहीं । कशाला गे माणुस बाई ॥५॥दुबळ्याचे घरची नागवण । भाग्या घरची सांठवण ॥६॥शेतांतील काम करी । विठो माझा नांगर धरी ॥७॥खुटें पालख्या तोडी । साठ चाहुर पाणा झोडी ॥८॥देव लाकडांसी गेला । परत घेवूनियां आला ॥९॥पांचा साता गांवा गेला । लेंकी सुना घेऊन आला ॥१०॥खांद्यावरी आणिल्या पाहीं । नवल याचें सांगों काइ ॥११॥मायलेंकी केल्या भेटी । ऐशा विठोबाच्या गोष्टी ॥१२॥कैसा प्रगटरे झाला । विठो माझा निघोन गेला ॥१३॥आठवा आठवा माझा सखा । नामा सांगे सर्व लोकां ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : January 14, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP