“प्रसिद्ध उपमानोपमेयभावाच्या (साद्दश्याच्या) उलट वर्णिलेल्या उपमानोपमेयभावाला प्रतीप म्हणतात.” (हा प्रतीपाचा पहिला प्रकार,) उलटपणा म्ह० प्रसिद्ध उपमानाला उपमेय मानणें, व उपमेयाला उपमान मानणें, हाच; दुसर्या तर्हेचा उलटपणा नाहीं.
“उपमान आणि उपमेय या दोहोंपैकी एकाचा कांहीं गुणामुळें, ‘अद्वितीय’ म्हणून होणारा जो उत्कर्ष, त्याला तोडून पाडण्याकरतां, त्यांना दुसरी सद्दश वस्तु दाखवली असतां, जें साद्दश्य स्फुरतें, तो दोन प्रकारचा दुसरा प्रतीप अलंकार, (म्ह० या दुसर्या प्रतीपाचे दुसरा व तिसरा असे दोन प्रकार.) ‘उपमानाचा काय उपयोग ?’ म्ह० कैमर्थ्य ह प्रतीपाचा चवथा प्रकार. व ‘साद्दश्य अजिबात न जुळणें’ हा प्रतीपाचा पांचवा प्रकार.
ह्या पांचांपैकीं पहिल्या प्रकारांत, उपमान व उपमेय म्हणून प्रसिद्ध अससेल्या जोडीपैकीं जें उपमये, तें उपमानापेक्षां उच्च आहे; व जें उपमान आहे तें उपमेयाहून कमी दर्जाचें आहे असें पटविणें, हें (या प्रतीपाचें) फळ. उपमेयाहून कमी दर्जाचें आहे असें पटविणें, हें (या प्रतीपाचें) फळ. उपमेंतील व प्रतीपांतील उपमानोपमेयभावांत म्ह० साद्दश्यांत (प्रथम) कांहीं फरक वाटत नसला तरी, हें (वर दाखविलेल्या प्रतीप प्रकाराचें, उपमेयापेक्षां उपमान कमी दर्जाचें आहे असें पटविणें हें) फळच, उपमेहून या अलंकाराचा फरक मानण्याचें बीज आहे. साद्दश्याची ‘द्दढ स्थापना’ या वैशिष्टयामुळें हा अलंकार, साद्दश्याचा ज्यांत निषेध आहे, अशा व्यतिरेक अलंकाराहून (साहजिकच) निराळा पडतो.
कुणी विचारतील, “कां हो, साद्दश्य हें, उपमान व उपमेय ह्या दोहोंच्या ठिकाणीं सारखेंच असतांही, उपमान व उपमेय यांपैकीं एकाचा अधिकपणा व दुसर्या कमीपणा सूचित होतो, तो कां म्हणून ?”
(यावर आमचें उत्तर हें कीं,) ‘ऐका, उपमान व उपमेय ह्या दोहोंमध्यें असलेला जो साधारण धर्म त्याच्या संबंधाचा, प्रथम उपमानाच्या ठिकाणीं अनुवाद करून, मग त्या साधारण धर्माच्या संबंधाचे उपमेयाच्या ठायीं विधान केलें जातें, ही गोष्ट अगदीं निर्विवाद आहे. आतां नेहमीं, ठायीं विधान केलें जातें, ही गोष्ट अगदीं निर्विवाद आहे. आतां नेहमीं, सिद्ध वस्तूंचाच अनुवाद केला जातो, व साध्य वस्तूचें विधान केलें जातें ही गोष्ट प्रसिद्धच आहे. अर्थात, सिद्ध वस्तु ही वरिष्ठ दर्जाची व साध्य वस्तु कमी दर्जाची (व्यवहारांत मानली जात) असल्यानें, सिद्ध जें उपमान तें, साध्य जें उपमेय त्यापेक्षां वरिष्ठ प्रतीचें मानलें जावें, हें स्वाभाविकच आहे. ब्यवहारांतही, ज्याच्या विद्येविषयीं लोकांची खात्री आहे, त्यालाच पूज्य मानतात. व ज्याच्या विद्येविषयीं संशय आहे अशाला पूज्य मानीत नाहींत हें उघड आहे.