यांपैकीं पहिल्या उदाहरणांत कंकण वगैरे दागिने दागिने दागिने दुसरीकडे (म्ह० हात वगैरे ठिकाणीं) घालयचे म्हणून प्रसिद्ध असल्यानें, हात वगैरेंचा उल्लेख न करतां ते भलत्याच ठिकाणीं घातलें, असें वर्णन केलें आहे. (भूषा) ‘भवति’ या पदानें, अमुक एक व्यापार करण्याला अनुकूल अशी कृति सूचित होते, असें धरूनच वरील श्लोकांत असंगति अलंकाराच्या लक्षणाची संगति लावावी,’ असे कुवल्यानंदकारांनीं असंगतीचे आणखी दोन प्रकार, त्यांचीं लक्षणें करून व त्यांचीं उदाहरणें देऊन, सांगितले आहेत; पण तें बरोबर नाहीं; कसें तें पहा - प्रथम, अपारिजाता ह्या ठिकाणीं, पारिजातरहित करण्याची इच्छा हें कारण, व पारिजातरहित ह्या ठिकाणीं, पारिजातहित करण्याची इच्छा हें कारण, व पारिजातरहित होणें हें कार्य हीं दोन्हीं, विरुद्ध अशा निरनिराळ्या ठिकाणीं आहेत, असें वर्णन केल्यानें, ‘विरुद्धं भिन्नद्शत्वं कार्यहेत्वोरसंगति:’ (कार्य व हेतु यांचें, विरुद्ध भासणारें असें भिन्न ठिकाणीं वास्तव्य, म्ह० आसंगति) या, यांचें, विरुद्ध भासणारें असें भिन्न ठिकाणीं वास्तव्य, म्ह० असंगति) या, असंगतीच्या तुम्ही वर सांगितलेल्या पहिल्या प्रकाराहून या तुमच्या नव्या प्रकाराचा फरक आहे, असें म्हणतां येत नाहीं, चिकीर्षा (म्हणजे करण्याची इच्छा) ही आलंबननाक विषयतासंबंधानें प्रत्येक कार्याशीं, समानाधिकरण असून, त्या त्या कार्याला हेतु होत असल्याचें प्रसिद्ध आहे. आतां “पारिजातरहितत्व हें अभावरूप असल्यानें, व अभावाला नैय्यायिकांनीं नित्य मानलें असल्याकारणानें, त्याला चिकीर्षा ही कारण होऊ शकतच नाहीं.” अशी कोणी शंका घेतल्यास त्याचें उत्तर हें कीं, या आमच्या अलंकारशास्त्रांत्त अभावालाही जन्य ऊर्फ कार्य आम्ही समजतों, (त्यामुळें अभावरूपी कार्याला कारण असणें हे सरळच आलें.) वरील असंगतीच्या लक्षणांत कार्यकारण या शब्दांनीं समानाधिकरण असे कोणतेही दोन पदार्थ ह्याचाही संग्रह होऊ शकेल; हें पूर्वी आम्ही, ‘कार्यकारणभाव हें उपलक्षण आहे,’ या शब्दांनीं सांगितलेंच आहे. त्या द्दष्टीनें पाहतां अभाव व चिकीर्षा यांचा कार्यकारणभावसंबंध पाहिजेच, असें कांहीं नाहीं). आतां ‘गोत्रोद्धार०’ या उदाहरणांत मात्र, ‘विरुद्धात्कार्यसंपत्तिर्द्दष्टा काचिद्विभावना’ ही जी पांचव्या प्रकारची विभावना तिचें लक्षण लागू पडत असल्यानें, त्याला विभावना म्हटल्यानें काम भागेल. त्याच्याकरतां असंगतीच्या आणखी एका प्रकारची कल्पना करणें योग्य नव्हे. गोत्रोद्धार करण्याची प्रवृत्ति ही गोत्रोदभेदरूपी कार्याला विरुद्ध असल्यानें येथें पांचवी विभावना मानणेंच योग्य. आतां सिद्धांताच्या द्दष्टीनेंही या श्लोकाचा निर्णय करायचा म्हणजे, या ठिकाणीं विभावना व विशेषोक्तिया दोन अलंकारांचा संकर मानणेंच योग्य
आहे. ‘नेत्रेषु कंकणम’ या श्लोकांत, कंकणत्व व नेत्रालंकारत्व हीं दोन्ही निरनिराळ्या ठिकाणीं राहणारीं म्हणून प्रसिद्ध आहेत; पण त्या ठिकाणीं विरोधाभास अलंकार मानणेंच योग्य आहे. याचप्रमाणें ‘मोहं जगत्रय०’ या श्लोकांतही, मोहनिवर्तकत्व व मोहजनकत्व हे दोन विरुद्ध ठिकाणीं राहत असलेले धर्म एकत्र राहत असल्याचें वर्णनही विरोधालंकाराचें उदाहरण म्हणून समजावें. यावर तुम्ही म्हणाल, “मग विरोधाभासानेंच सर्व काम भागत असतां, तुम्हीसुद्धां विभावना वगैरे निराळ्या अलंकाराची कल्पना करणें हे फुकट आहे.” यावर आमचें म्हणणें हें कीं, (आम्ही विभावना विरोधाभासाहून निराळी कां मानतो) याचें उत्तर आम्ही पूर्वीं देऊन टाकलें आहे.
येथें रसगंगाधरातील असंगतिप्रकरण समाप्त झालें.