असंगति अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अथवा असंगतीचें हें दुसरें उदाहरण :---
‘या मृगनयनेची द्दष्टि कानाच्या टोकापर्यंत येऊन भिडलेली आहे. (वेदाच्या ज्ञानांत पारंगत झालेली आहे, हा दुसरा अर्थही घ्यावा) आणि केशा मोकळे सुटतात (प्रपंचाच्या बंधनापासून मुक्त होतात. हाही अर्थ घ्यावा). खरोखर दैवगति विचित्र आहे.’ यापैकीं पहिल्या उदाहरणांत असंगति शुद्ध आहे; व दुसर्यांत ती श्लेषानें उभी केलेली आहे. हा या दोहोंत फरक.
येथें ‘प्रहरित’ याचा अभेदाध्यवसायरूप अतिशयानें होणारा कामपीड अहा अर्थ, ‘अपराधाला होणारा दंड’ या रूपानें प्रतीत होतो. त्यामुळें या ठिकाणीं विषयी जें ताडन त्याचा अंश घेऊन त्याच्याशीं समानाधिकरण (म्हणजे एकत्र राहणारा) म्हणून प्रसिद्ध असलेला अपराधरूपी हेतु, तो ताडानाहून निराळ्या ठिकाणीं राहत असल्याचें श्लोकांत प्रतीत होत आहे. त्यामुळें या ठिकाणीं वरवर विरोध दिसतो खरा. तरीपण विषय जी तरूणांची कामपीडा, त्या अंशाचा विचार केल्यानंतर, फुलांची शोभा हरण करण्यानें सूचित झालेली व तरुणांच्या प्रेमभावनेनें कल्पिलेली जी नायिकेची विशेष प्रकारची शोभा, अथवा त्या शोभेविषयीची तरूणांच्या मनांतील भावना या दोहोंपैकीं कोणीही त्या कामपीडेला कारण मानल्यास, हा प्रथम भासमान होणारा विरोध नाहींसा होतो; म्हणून या श्लोकांत अभेदाध्यवसान (म्ह० कामपीडा व अपराधामुळें होणारें ताडन या दोहोंचा अभेद मानणें) हा प्रस्तुत असंगतीचा उत्थापक आहे. व विरोधाभास हा या असंगतीचा उत्कर्ष करणारा आहे. दुसरीकडेही असेंच समजावें.
या असंगतींत, “विभावनेप्रमाणें कार्यांशांत अतिशयोक्तीचें सहाय आवश्यक असतें, असें नाहीं मानलें तर ह्या अलंकारांत प्रथम प्रतीत होणारा विरोध टाळताच येणार नाहीं.” असें अलंकारसर्वस्वकार वगैरेंचें मत. पण वरील ‘द्दष्टिर्मृगीद्दश:’ इत्यादि आम्ही रचलेल्या उदाहरणांत, त्यांचें (म्ह० अलंकारसर्वस्वकार वगैरेंचें) मत, खोटें पडत असल्यामुळें, त्याची संगति लावतां येत नाहीं. ‘मुच्यन्ते बंधानात्केशा;’ या ठिकाणीं केश बंधनमुक्त होणें हें जें कार्य त्या अंशांत, अतिशयोक्ती मुळींच नाहीं. त्यात केवळ श्लेषमूलक अभेदाध्यवसान आहे. म्हणून कोणत्यातरी प्रकारानें कार्यांशांत अभेदाध्यवसान असंगतींत आवश्यक असतें. असेंच म्हणणें योग्य, वरील “द्दष्टिर्मृगीद्दश:’ इत्यादि श्लोकांत, कारणांश (श्रुत्यंतपरिशीलन) या अंशांत श्लेषमूलक अभेदाध्यवसान संभवते ही गोष्ट खरी, पण त्यावरून या अलंकारातील प्रयेक कारणांशांत अभेदाध्यवसान असलेंच पाहिजे असें मात्र समजूं नये.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP