प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या स्मरणालंकारांत, प्रतिवस्तूपमेच्या लक्षणाची अतिव्याप्ति होऊं नये म्हणून, ‘दोन वाक्यार्थांत आलेलें साद्दश्य’ असें लक्षणांत विशेषन घातलें आहे. वरील स्मरणालंकारांत, साद्दश्य शब्दवाच्य नसून आर्थ आहे, (आणि प्रतिवस्तूपमेतही साद्दश्य आर्थच असते, या द्दष्टीनें या दोन्ही अलंकारांत साम्य असलें) तरी तें साद्दश्य स्मरणालंकारांत पदार्थगत असतें, (प्रतिवस्तूपमेंतल्याप्रमाणें) वाक्यार्थगत नसतें. (हा या दोहोंत फरक) कारण स्मरणाचा म्ह० स्मरणांत सूचित होणार्या साद्दश्याचा, वाक्यार्थांशी कांहीं संबंध नसतो. बाकीच्या पदांची साभिप्रायता वर सांगितलीच आहे.
वरील प्रतिव्स्तूपमेच्या लक्षणांतील आर्थ, साधारणधर्मक, (वरैरे इतर) पदांचें तात्पर्य (साभिप्रायता) वर सांगितलेंच आहे.
प्रतिवस्तूपमेचें उदाहरण :---
“उदार ह्रदयाच्या लोकांमध्यें श्रेष्ठ असा पुरुष, विपत्तींत सांपडला तरी अपूर्व उदारता पसरवितो. (उदा०) अग्नींत पडलेला ऊद चोहोंकडे अपूर्व सुगंध दरवळवितो.”
येथें पसरविणें (विस्तार) दरळविणें (प्रकटविणें) हे दोन दिसणारे धर्म वस्तुत: एकच आहेत, असा वक्त्याचा अभिप्राय आहे.
अथवा हें दुसरें उदाहरण :---
“जगाला सुंदर वाटणार्या श्रेष्ठ गुणांनीं युक्त अशा शुद्ध अंत:करणाच्या पुरुषांचा राग सुद्धां सुंदर असतो. जगांत चोहोकडे दरवळणार्या सुगंधानें भरलेल्या उदाचा कठिणपणा सुद्धां अत्यंत रम्य असतो.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP