तुल्ययोगिता अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“केवळ सर्व प्रकृतच अथवा केवळ सर्व अप्रकृतच अशा पदार्थांचा गुण, क्रिया वगैरे कोणत्याही एका धर्माशीं अन्वय म्हणजे तुल्ययोगिता.”
तुल्ययोगितेंत साद्दश्य हें (स्पष्ट सांगितलेलें नसतें. तें) सूचित असतें; कारण, त्या साद्दश्याला कारण जो साधारण धर्म तो येथें शब्दानें सांगितलेला असतो. (स्वत: साद्दश्य हें शब्दानें सांगितलेलें नसतों.) शिवाय साद्दश्याचा वाचक शब्द येथें नसतो. यावरून हें दिसून येतें कीं आलंकारिकांच्या मतेंही, साद्दश्य हा निराळा पदार्थ आहे, तें साधारणधर्मरूप नाहीं. असें नसतें तर, साद्दश्य ह्या अलंकारांत गम्य आहे, असें येथें म्हणणें जुळलें नसतें. कुणी असें म्हणतात, “साद्दश्य हे साधारणधर्मरूपच असते; (तो स्वतंत्र पदार्थ नाहीं); साद्दश्यभाव (साधश्यत्व) हा मात्र साधारणधर्माहून निराळा पदार्थ आहे. आणि तो (साद्दश्यभाव) इव वगैरे पदांचा शक्यार्थ जें साद्दश्य त्याचा अवच्छेदक धर्म (म्ह० साद्दश्यत्व) आहे. आतां त्या त्या साधारणवाचक शब्दांनीं त्या त्या साधारणधर्माचा (उदा० सौंदर्य ह्या पदाने सौंदर्य ह्या साधारण धर्माचा) त्या धर्माच्या अवच्छेदकधर्मरूपानें (सौंदर्यत्व या रूपानें) जरी बोध होत असला तरी,
त्या साधारणधर्माचा साद्दश्यत्व या रूपानें बोध, मात्र व्यंजनेनेंच होतो.
(तुल्ययोगितेचें) उदाहरणम् :---
“हे प्रिये ! दु:ख सोड’, असें त्या प्रियेचा प्रियकर प्रेमानें बोलत असतांना, तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा घळघाळ गूळ (वाहू) लागल्या, व मनांतूनही मान गळू लागला (ओसरत चालला),”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP