मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|अनन्वय अलंकार| लक्षण ३ अनन्वय अलंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ अनन्वय अलंकार - लक्षण ३ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण ३ Translation - भाषांतर लुप्त अनन्वयाच्या प्रकारांत धर्मलुप्त अनन्वयाचे ( उपमेप्रमाणें ) पाचही प्रकार संभवतात; उदाहरणार्थ, वरील दीड श्लोकांतील धर्मवाचक शब्द काढून टाकून, त्याचे जागीं दुसरा ( अर्थवाचक नसलेला ) शब्द घातल्यास, धर्मलुप्त अनन्वयाचे पाचही प्रकार होतील.आतां वाचकलुप्त अनन्वयाचें उदाहरण :-“ रामासारखा असलेला श्रीराम व सीतेसारखी मनोहर असलेली सीता हे जगाचे आईबाप, माझ्या अंत:करणांत नित्य विहार करोत. ”वरील श्लोकांत क्यड् प्रत्ययांत व समासांत वाचकाचा लोप झाला आहे, अशाच रीतीनें-“ अत्यंत चवताळलेल्या सर्पाप्रमाणें आपल्या सेनापतीसह बाहेर पडणार्या क्तुद्ध रावणानें, रणांगणामध्यें एकदम खळवळलेल्या रामाप्रमाणें दिसणार्या क्तुद्ध रामाला पाहिले. ”कर्तरिणमुल् इत्यादींच्या बाबतींतही उदाहरणें शोधून काढावीं.“ ज्याप्रमाणें आकाश आकाशासारखें असतें, ज्याप्रमाणें समुद्र समुद्रासारखा असतो, त्याप्रमाणें हे किक्तमार्कराजा, तूं विक्तमार्क रजासारखा आहेस. ” या श्लोकांतील वाक्याच्या अवयवांत ( भागांत ) असलेल्या अनन्वय अलंकारांत धर्म व उपमावाचक यांचा लोप झाला आहे. पण सबंध श्लोकांतील मुख्य वाक्यार्थांत अनन्वयालंकाराचे निरुपमत्वरूपी जें फळ तद्रूप साधारणधर्म असलेली मालोपमाच आहे. अनन्वयाचें सोप्या रीतीनें ज्ञान व्हावें, म्हणूनच, ( अनन्वयालंकारांनी उत्पन्न केलेल्या ) मालोपमेचें या ठिकाणीं निरूपण केलें आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP