मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे| श्लोक १९६ ते २०३ श्रीगणेशाची सहस्त्र नामे श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५ सहस्त्र नामे - श्लोक १९६ ते २०३ श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ. Tags : ganapatiganeshगणपतीगणेश श्लोक १९६ ते २०३ Translation - भाषांतर निष्काम: तु जपन् नित्यं भक्त्या विघ्नेशतत्पर: ।योगसिद्धिं परां प्राप्य ज्ञानवैराग्यसंस्थित: ॥१९६॥निरन्तर उदितानन्दे परमानन्द संविदि ।विश्वोत्तीर्णे परे पारे पुनरावृत्ति-वर्जिते ॥१९७॥लीन: वैनायके धाम्नि रमते नित्य-निर्वृत: ।य: नामभि: यजेत् एतै: अर्चयेत् पूजयेत् नर: ॥१९८॥राजान: वश्यतां यान्ति रिपव: यान्ति दासताम् ।मन्त्रा: सिध्यन्ति सर्वे सुलभा: तस्य सिद्धय: ॥१९९॥पण जो भक्तिभावाने विघ्नेश्वराचे ठायी लीन होऊन या स्तोत्राचा सदा जप करतो, तो श्रेष्ठ योगसिद्धी प्राप्त करून विश्वाहून विलक्षण व पुनर्जन्मरहित अशा अव्यक्ताहूनही पलीकडे असलेल्या विनायकांमध्ये लीन होऊन नित्य तृप्त होऊन स्वस्वरूपभूत तेजामध्ये निमम्न होतो. जो पुरुष या सहस्रनामाने हवन करतो व पूजन करतो त्याला राजे वश होतात व शत्रू त्याचे दास होतात. त्याचे सर्व मन्त्र सिद्ध होतात. त्याला सर्व सिद्धी सुलभ होतात. ॥१९६-१९९॥मूलमन्त्रात् अपि स्तोत्रम् इदं प्रियतरं मम ।नभस्ये मासि शुक्लायां चतुर्थ्यां मम जन्मनि ॥२००॥दूर्वाभि: नामभि: पूजां तर्पणं विधिवत् चरेत् ।अष्टद्रव्यै: विशेषेण जुहुयात् भक्तिसंयुत: ॥२०१॥तस्य ईप्सितानि सर्वाणि सिध्यन्ति अत्र न संशय: ।इदं प्रजप्तं पठितं पाठितं श्रावितं श्रुतम् ॥२०१॥व्याकृतं चर्चितं ध्यातं विमृष्टं अभिनन्दितम् ।इह अमुत्र च सर्वेषां विश्वम्-ऐश्वर्यं-प्रदायकम् ॥२०३॥(श्रीगणेश सांगतात) - मूलमन्त्रापेक्षाही हे सहस्रनाम स्तोत्र मला अधिक प्रिय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस, माझ्या जन्मदिनी दूर्वांसह सहस्रनाम अर्पण करून यथाविधी पूजा व तर्पण करावे. भक्तिभावाने विशेषत: आठ द्रव्यांनी हवन करावे म्हणजे या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतील यात शंका नाही. सहस्रनाम स्तोत्र नित्य जपावे. पठन-पाठन करावे, दुसर्यास ऐकवावे व आपण ऐकावे, व्याख्यान, विवरण करावे, चर्चा करावी, ध्यान करावे, विचार आणि अभिनंदन करावे. हे केले असता हे स्तोत्र इहलोकी सर्वांस सर्व ऐश्वर्य देणारे आहे. ॥२००-२०३॥ N/A References : N/A Last Updated : July 21, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP