मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|लळित| पदे ५० ते ५५ लळित पदे पद आणि श्लोक पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ४९ पदे ५० ते ५५ लळित - पदे ५० ते ५५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaपदरामदाससमर्थ पदे ५० ते ५५ Translation - भाषांतर ॥५०॥ अंजनीगीत ॥ लंकेहूनि अयोध्ये येतां राम लक्षूमण सीता । हनुमंतें अंजनी माता । दाखविली रामा ॥१॥चवघें केला नमस्कार । काय बोले रघूवीर । तुझ्या कुमरें आम्हां थोर । उपकार केला ॥२॥सीताशुद्धी येणें केली । लक्षुमणाची शक्ति हरिली । लंका जाळूनि निर्दाळीली । राक्षससेना ॥३॥अहिरावण महिरावण ॥ घात करिती आमुच्या प्रारणा । देवीरूपें दोघांजणां । रक्षिलें माते ॥४॥अठरा पद्में वानरभार । श्रमें युद्ध केलें फार । शिळा सेतू सागर । समाप्त केला ॥५॥माते तुझ्या उदरीं जाण । हनुमान जन्मल रत्न । एवढें माझें रामायण । याचेनि योगें ॥६॥ऐकून पुत्राची ही स्तुति । माता तुच्छ मानी चित्तीं । व्यर्थ कां बा रघुपती । वाहसी भार ॥७॥हा कां माझ्या उदरीं आला । गर्भाहूनि नाहीं गळाला । आपण असतां कष्टविला । श्रीराम माझा ॥८॥माझिया दुग्धाची प्रौढी । कळिकाळाची नरडी मुरडी । रावणादिक हे बापुडीं । घुंगुरटीं तेथें ॥९॥असत्य रामा वाटेल बोली । दुग्धधारा सोंडियेली । शौला उदरीं खोचविली । त्रिखंड तेव्हां ॥१०॥वेणी दंड परताळिला । लंकेलागीं वेढा दिधला । आणुनी रामासी दाखविला । अंजनी मातें ॥११॥सींता बोले अंजनीसी । कां कोपशी बाळकाशीं । रामें आज्ञा हनुमंतासी । दिधली नव्हती ॥१२॥आश्चर्य वाटलेंसें रामा । म्हणे माते धन्य महिमा । पादपद्में चवघांजणां । वंदिलें भावें ॥१३॥अत्यंत जिवलग सख्या । हनुमंत भक्त निका । रामदास-पाठीराखा । महारुद तो ॥१४॥॥५१॥ गणपति गणराज धुंडिराज महाराज । चिंतामणि मोरेश्वर याविण नाहीं काज ॥ध्रु०॥ अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार । ब्रह्मा विष्णु महेश हे तरि तुझेच अवतार ॥१॥त्रिगुण तूं गुणातीत नामरूपाविरहित । पुरुषनाम प्रकृतींत अंत नाहीं हा ॥२॥सच्चिनदानंद देवा । आदि अंत तुलचि ठावा । दास म्हणे वरट भावा । कृपादृष्टीं हा ॥३॥॥५२॥ प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे । आगमनिगम संतसमागम सद्रुरुवचनें पाहे ॥ध्रु०॥ आत्मविचारें शास्त्रविचारे गुरुविचारें बोध । मीपण तूंपण शोधूनि पाहतां आपणा आपणा शोध । प्रगट० ॥१॥जडासि चंचळ चालविताहे चंचळ स्थिर न राहे । प्रचीत आहे शोधूनि पाहे निश्चळ होऊनि राहे ॥२॥भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवणमनन साधा । दास म्हणे निजगुज शोधितां होत नसे भवबाधा ॥३॥॥५३॥ पाहा पाहा या जगांत राम आहे । राम आहे राम आहे राम आहे ॥ध्रु०॥ जग हें अवघें रामच सारा । अंतरीं पाहे करी विचारा ॥१॥एक सुवर्णीं बहु अळंकारा । तद्बत पाही सर्व पसारा ॥२॥विना कच्छू नाहीं थारा । रामच रामही घे घे सारा ॥३॥दास म्हणे हा रामच भरला । भरला उरला बोलच खुंटला ॥४॥॥५४॥ गुरुदातारें दातारें । अभिनव कैसें कैसें केलें ॥ध्रु०॥ एकचि वचनें न बोलत बोलूनि । मानस विलया नेलें ॥१॥भूतसंगें कृत नैश्वर ओझें । निजबोधें उतरिलें ॥२॥दास म्हणे मज मीपणविरहित । निजपदीं नांदविलें ॥३॥॥५५॥ मिश्रित सारासार । अरे निवडी तोचि चतुर ॥ध्रु०॥ ब्रह्म निरंजन अद्वय सत्य । माया जनपर द्वैत अनित्य ॥१॥पारखीवीण खरें निवडना । मूढ कसें जनहित कळेना ॥२॥मेळविलें जळ अमृत दोनी । हंस जसें पय घे निवडोनी ॥३॥दास म्हणे निज कौतुक मोठें । अनुभव बोलतां शाब्दिक खोटें ॥४॥ एकूण पदें ॥२३१॥ N/A References : N/A Last Updated : April 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP