मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|लळित| पदे १ ते १० लळित पदे पद आणि श्लोक पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ४९ पदे ५० ते ५५ लळित - पदे १ ते १० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaपदरामदाससमर्थ पदे १ ते १० Translation - भाषांतर ॥१॥ कृपाळू रघुवीरें खादलीं भिलटी बोरें । उच्छिष्ट आदरें अंगिकारीं रे ॥ध्रु०॥ वैभवीं नाहीं चाड । देवातें भावचि गोड । पुरवितो कोड । अनन्याचे रे ॥१॥दुर्लभ ब्रह्मादिकांसी । सुलभ वानरांसी । काय तयापासीं । भावेंवीण रे ॥२॥ रामीं रामदास म्हणे । देव हा दयाळूपणें । उठवितो रणें । वानरांचीं रे ॥३॥॥२॥ जन्मलचि नाहीं तो मरेल काई । जीणें मरणे दोन्हीं नाहीं रे ॥ध्रु०॥ जनीं जीवन्मुक्त वर्ततात हरिभक्त । सद्रुरुबोधें ते अच्युत रे ॥१॥जिणें आणि मरणें येणें आणि जाणें । साधू तो अचळ पूर्णपणें रे ॥२॥सेवितां साधूचे चरण बाधीना दक्षिणायन । रामीं रामदासीं निजखूण रे ॥३॥॥३॥ रघुवीर सुरवरदानीं । भक्तांचा अभिमानी । योगी मुनिजन ध्यानीं । राहाती समाधानीं ॥धृ०॥ भूषण मंडित माळा । तेजाचा उमाळा । सुंदर सुमनमाळा । भोंवतां मधुकरपाळा ॥१॥पीतवसन घन साजे । मुरडीव वाक वाजे । वर तोडरी ब्रीद गाजे । कीर्ति विशाळचि माजे ॥२॥अभिनव कार्मुक पाणी । निगम गाती पुराणीं । विगलित होते वाणी । समजतसे शूळपाणी ॥३॥राम सकळ जन पाळी । भक्तांला सांभाळी । जन्म-मरण दु:ख टाळी । अगणित सौख्य नव्हाळी ॥४॥दास म्हणे मज हित । माझें कुळदैवत । जे जन होती रत । ते सकळहि ॥५॥॥४॥ समर्थाचा गाभा । भीम भयानक उभा । पाहतां सुंदर शोभा । लामचावें मन लोभा ॥धृ०॥ हुंकारे भुभु:कारे । काळ म्हणे अरे बारे । विघ्र तगेना थारे । धन्त हनुमंता रे ॥१॥दास म्हणे वीर गाढा । घर्षित घनसर दाढा । अभिनव हाचि पवाडा । पाहतां दिसे जोडा ॥२॥॥५॥रावण सीता दडवी । भीम निशाचर बडवी । अघटित तें घडवी । वर रजनीचर ते रडवी ॥ध्रु०॥जाउनि सीता शोधी । सकळांचा विरोधी । वानर मोठा क्रोधी । त्रिकुटीं जन रोधी ॥१॥मोठी आली धाडी । पुच्छानें पछाडी । होती ताडातोडी । कंठीं झोडाझोडी ॥२॥दैत्यीं केले चाळे । सुरवर बंदीशाळे । त्या रागें उफाळे । वन्हाचे उबाळे ॥३॥बनीं बनें कडकावी । बळकट शिक्षा लावी । भुजाबळें भडकावी । लंकेतें धडकावी ॥४॥सीता शोधून गेला । हलकल्लोळ केला । भेटे राघवाला । दास्यत्वें निवाला ॥५॥॥६॥ एकतालपंचक ॥ वेध लागला रामाचा । सुरवर विश्रामाचा ॥धृ०॥ तेथेम सुर-वर नर किन्नर विद्याधर गंर्धांचा मेळा । तेथें न्यूनें कोकिळा मंजुळकिळ । झुळकी रम्य रसाळा ॥ तेथें गायनकळा रंग आगळा । बाहे अमृतवेळा । तो सुखसोहळा । देखुन डोळा । लाचावें मनमेळा ॥१॥एकताल मृदांगें श्रुतिउपांगें । गाती नवरसरंगें ॥ एकरंग सुरंगें दाविती संगें । सप्तस्वरांचीं अंगें ॥ एक अनेक रागें आलापयोगें । बिकट ताल सुधांगें ॥ एक झकिट किटकिट थरिक थरिक वाजती चपळांगें ॥२॥तेथें खणखणखणखण टाळ वाजती । झणझणझणझण यंत्रें ॥ तेथें दणदणदणदण मृदंग मंजुळ । तालबद्ध परतंत्रें ॥ तेथें चणचणचणचण शब्द बोलती । वानी चपळ सत्पात्रें ॥ तेथें घणघणघणघण घंटा वाजती । अनुहातें शूळमंत्रें ॥३॥तेथें झगझगझगझग झळकति रत्नें । खचित बैसे शोभा ॥ तेथें धगधगधगधग तेज आगळें लावण्याचा गाभा ॥ तेथें घमघमघमघम सुगंध परिमळ । षट्पद येति लोभा ॥ पवनतनुज-दासाचें मंडण । निकट राहिला उभा ॥४॥॥७॥ रामा चाल रे झडकरी । त्रिभुवन हरुषे भारी ॥ध्रु०॥ शरयूनदीतिरीं अयोध्या-पुरी । रमणीय रचिली भारी । तीसीं प्रतिमल्ल सरी ऐसीच दुसरी । नाहीं पृथ्वीवरी ॥ ते वैकुंठ मंदिरीं गमन सुंदरीस । सुंदरीस । त्यामध्यें थोरी ॥ ऐसें जाणोनी श्री कौसल्योदरीं । आनंद सचराचरीं ॥१॥तेथें ऋषिकूळ सकळ नांदति निर्मळ । उत्साहाचेनि उसळे ॥ तेथें धोत्रें सोज्वळें झेलिती करतळें विभूतीचे गोळे ॥ ते ध्यानीं नाकळे मना नाढळे । तें रूप पाहती डोळे ॥ आणि क्रूर विशाळें वधिलीं ढिसालें । पावोनि यत्नें फळें ॥२॥तेथें ब्रह्म नंदिनी श्रापबंधिनी । असतं निजपति वचनीं ॥ ते रामा गमनीं ऐकत क्षणीं । हरुषत अंत:करणीं ॥ म्हणे त्या श्रीचरणीं होतां मिळणी । पालटेन पाषाणीं । ऐसें चिंतुनि दिवसरजनीं । पथा पाहतां लोचनीं ॥३॥तेथें सुरवर नाचति वाद्यें वाजती पुष्पें जमुनि वरुषति ॥ तेथें बंध वातगती नेत दिगंतीं घ्राणा होतसे तृप्ती ॥ तेथें दिशा झळकती । सकळ वनस्पती । पद शुभ बोलती ॥ आला म्हणती राम सीतापती । जयजयकारें गर्जती ॥४॥तेथें दशरथमानसीं । रामश्रवणशशी । तुंबळ सुखसिंधुसी ॥ तेथें जनकसरितेसि मिळणी कैसी । होताहे गजरेंसि ॥ तेथें भक्तचकोरासी आनंद अहर्निशीं पाहताती उदयासी ॥ ऐसें देखुनी भक्ती नवमीसी । प्रगट रामदासीं ॥५॥फरफरफरफरफरफर वोढिती कुंजर । धनुष्य आणिलें भूपें । हरहरहरहर अति पण दुष्कर । सुंदर रघुपति रूपें ॥ वरवरवरवर रघुपति वोढित । दशमुख संतापे ॥ करकरकरकर शर करारे । थरथरथरथर भू कंपे ॥६॥॥८॥ रामें सज्जीलें वितंड परम प्रचंड । रामें उचलिलें त्र्यंबक कौशिकऋषि पुलकांक ॥ रामें ओढिले शिवधन सीतेचें तनुमनु । रामें भंगिलें भवचाप असुरां सुटला कंप ॥१॥कडकडकडकड भग्र कडाडे । तडतडतडतड फुटे ॥ गडगडगडगड गगन कडाडी । धडधडधड धडक उठे ॥ भडभडभडभड रविरथ चुके । घडघडीत अव्हाटे ॥ खडखडखडखड खचित दिग्गज । चळितकूळाचळ कुटे ॥२॥ दुमदुमदुमदुमदुमित भुगोले । स्वर्ग मृत्यु पाताळें ॥ धुमधुमधुमधुम धुमकट कर्णीं । विधीस बैसले टाळे ॥ हळहळहळहळ अतिकोल्हाळ । हरसी पंचक डोले ॥ खळखळखळखळ उचंबळत । जळसिंधूसी मोहो आंदोळे ॥३॥धकधकधकधक धकीत धरणी । धराबधिर झाले नयन ॥ चकचकचकचक चकीत निशाचर । करविलें दीर्घ शयन । थकथकथकथक थकीत सुरवर वरुषती पुष्पें तसे ॥ लखलखलखलखलख रत्नमालिका । जनवकालिक लग्र ॥४॥जयजयजयजय जयति रघुराजबीरा गर्जती जयकारें । धिमधिमधिम-धिम नृपदवदुंदुभि । गगन गर्जलें गजरें । तरतरतरतर मंगळतुरें । विविध वाद्यें सुंदरें । समरसरसरस दासा मानसीं रामसीता वधूवरें ॥५॥॥९॥ रंगीं नाचतो त्रिपुरारी लीलानाटकधारी । मंदरजावर त्रिपुरसुंदर अर्धनारी नटेश्वर । नाचे शंकर । झुकळ कळाकर । विश्वासी आधार ॥धृ०॥ झुळझुळझुळझुळ शिरीं गंगाजळ । झळझळ मुगुटीं किळ । लळलळलळलळ लळित कुंडलें । भाळीं इंदुज्वाळा । सळसळसळसळ सळकती रसना । वळवळवळिती व्याळ । हळहळहळहळ कंठीं हळाहळ । गायनस्वर मंजुळ ॥१॥थबथबथबथब गळती सद्या रुंडमाळिका कंठीं । चपचपचपचप हस्तक लवती । दस्तक धरी धूर्जटी । खडखडखडखडखड व्याघ्रांबर गजचर्म परवंटी । भडभडभड-भडभड धूसर उधळत । चित्ताभस्त निजउटी ॥२॥किणिकणिकणिकणिकणि वाजति किंकिणि । घणघणघणघण खणाणी । झणझणझणझण वाकी चरणीं । दणदणदण धरणी । खण-खणखणखण टाळ उमाळे रुणुझणु वेत्रें पाणी । गुणगुणगुणगुण वर्णिती वाणी । खुणखुणखुण निर्वाणीं ॥३॥टिमिटिमिटिमिटिमि मृदंग गंभीर डिमिडिमिडिमिडिमि डिमर । धिमि-धिमिधिमिधिमि दुंदुभि गर्जे । झिमिझिमिझिमिझिमि झल्लर । घुमघुमघुमघुम येवजगमकत दुमदुमदुम अंबर । ततथै ततथै धिकिट धिकिट । म्हणती विद्याधर ॥४॥थरथरथरथर कंपित गमके । गरगरगरगर भ्रमर । सरसरसरसर कंपित चमके । धुरधुरधुरधुर गंभीर । परपरपरपर म्हणती सुरवर । हरहर हरहर शंकर । वरवरवरवर दासा दिधला । तरतरतरतर दस्तुर ॥५॥॥१०॥ आठवे मनीं आठवे मनीं । आठवे मनीं सदा राम चिंतनीं ॥धृ०॥ मुगुटी किरीटी । वक्रभुकुटी । रम्य गोमटीं । नयनंबुजें ॥१॥मुकरकुंडलें । क्षण दंडलें तेंज खंडले । मेघदामिनी ॥२॥बाणली उटी । कास गोमटी । किंकिणी कटीं । क्षूद्र घंटिका ॥३॥पदक मेखळा । फांकती किळा । रुळती गळा । मुक्तमाळिका ॥४॥ ते सुलक्षणें । रत्नभूषणें । वीरकंकणें । शोभती करीं ॥५॥रम्य रंगलें । चाप चांगलें । सैन्य भंगलें । त्रिकूटाचळीं ॥६॥आंदु नेपुरें वांकी गजरें । तीं मनोहरें । पाउलें बरीं ॥७॥ हदय कवळी । मूति सांवळी । दास न्याहळी । कुळदैवत ॥८॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP