मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|करुणाष्टकें| अष्टक ७ करुणाष्टकें अष्टक १ अष्टक २ अष्टक ३ अष्टक ४ अष्टक ५ अष्टक ६ अष्टक ७ अष्टक ८ सवाया करुणाष्टकें - अष्टक ७ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ अष्टक ७ Translation - भाषांतर उदासीन हा काळ जातो गमेना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना । उठे मानसी सर्व सोडोनि जावें । रघूनायका काय कैसें करावें ॥१॥जना बोलतां वीट वाटे । नसे अंतरीं सूख कोठें न कंठे । घडीनें घडी चित्त कीर्तीं धरावें । रघूनाय० ॥२॥बहू पाहतां अंतरीं कोंड होतो । शरीरास तो हेत सांडोनि जातो । उपाधीस देखोनि वाटे सरावें । रघूनाय० ॥३॥अवस्था मनीं होय नानापरींची । किती काय सांगूं गती अंतरींची । विवेकेंचि या मानसा आवरावें । रघूनायका० ॥४॥म्हणे दास ऊदास झालों दयाळा । जनीं वयर्थ संसार हा वायचाळा । तुझा मी तुला पूसतों प्रीय भावें । रघूनायका० ॥५॥॥ जयजय रघुवीर समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP