मानसपूजा - प्रकरण १
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥
संगीत स्थळें पवित्रें । तिकटया वोळंबे सूत्रें । निवती विस्तीर्ण स्वतंत्रें । उपसहित्याचीं ॥१॥
तुलसीवनें वृंदावनें । सुंदर सडे संभार्जनें । ओटे रंगमाळा आसनें । ठांई ठांई ॥२॥
गवाक्षें खिडक्या मोर्या । बकदरबार पाहिर्या । सोपे माडया ओहर्या । ठांई ठांई ॥३॥
ध्वज गोपुरें शिखरें । भुयारें तळघरें विवरें । मंडप राजांगणें गोपुरें । दोखंटे ढाळजा ॥४॥
देवालयें रंगशिळा । चित्रविचित्र दीपमाळा । पोहिया पादुका निर्मळा । आड बावी पुष्करणी ॥५॥
विशाळ तळीं सरोवरें । मध्यें तळपती जळचरें । ब्रह्मकमळें मनोंहरें । नाना रंगें विकासती ॥६॥
गोमुखें पाट कालवे । साधूनि बांधूनि आणावे । स्थळोस्थळीं खळवावे । नळ टांकीं कारंजीं ॥७॥
पुष्पवाटिका वृक्ष वनें । नानाप्रकारचीं धनें । पक्षी श्वापदें गोधनें । ठांई ठांई ॥८॥
सभामंडप चित्रशाळा । स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा । मठ मठया नेटक्या ॥९॥
एकांतगृहें नाटयशाळा । देवगृहें होमशाळा । नाना गृहें नाना शाळा । नाना प्रकारीं ॥१०॥
ऐसीं स्थळें परोपरी । नाना युक्ती कळाकुसरी । नि: कामबुद्धीं जो करी । धन्य तो साधू ॥११॥
इति श्रीमानसपूजा । मनें पूजावें वैकुंठराजा । साधनें अगत्य आत्मकाजा । करीत जावी ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP