मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|षड्रिपुविवेचन| प्रपंचनिरूपण षड्रिपुविवेचन कामनिरूपण कोपनिरूपण मदनिरूपण मत्सरनिरूपण दंभनिरूपण प्रपंचनिरूपण षड्रिपुविवेचन - प्रपंचनिरूपण समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ प्रपंचनिरूपण Translation - भाषांतर प्रपंच हा महा वैरी परत्र अंतरीं दुरी । अवघा तोचि तो जाला तेणें देव दुरावला ॥१॥पदार्थीं बैसली बुद्धि शुद्धि नाहीं परत्रिंची । प्रपंच शेवटीं कैचा गेल्या हा देह हातिंचा ॥२॥देव तो राहिला दूरीं ऐसा वैरी प्रपंच हा । बाळत्वीं छंद मायेचा खेळतां राहिला दुरी ॥३॥लागला छंद पोरांचा क्षणक्षण चुकावितो । सांगते माय मानेना लिहीना घरीं असे ॥४॥हाणिती मारिती पोरें रडतो पडतो बहू । सोशितो आपुल्या जीवें खेळासाठीं मुलांकडे ॥५॥कांहींसा शाहणा झाला शिकविला परोपरी । लोभानें लग्रही केलें वोढला सासर्याकडे ॥६॥नोवरी आवडे जीवीं नटावेंसें मनीं उठे । तारुण्य बाणतां अंगीं कामलोभेंचि भूलला ॥७॥खेळ तो राहिला मागें काम तो पडला पुढें । मोहिला शक्तिनें प्राणी तिजवांचोनि नावडे ॥८॥उदंड जाहलीं पोरें खर्च तो वाढला पुढें । उद्वेग लागला जीवा मेळवितां मिळेचिना ॥९॥उदंड करंटा जाला हिंडे चहुंकडे फिरे । प्रीति ते राहिली मागें अशक्त जाहला बहु ॥१०॥फिटेना ऋण तें वाढें ताडातोडी चहूंकडे । मिळेना अन्न ना वस्र वार्धक्यें खंगला बहू ॥११॥कष्टला शेवटीं मेला गेला प्रापंच हातींचा । घातला मागुती जन्मा ऐसा वैरी प्रपंच हा ॥१२॥जन्मासि घातलें देवें काय येऊनि साधिलें । भुलले चुकले देवा प्रपंच घातकी पहा ॥१३॥आधींच सर्व जाणावें काय येतें समागमें । निर्वाणीं अंतिचा देवो कोणी एकें चुकों नये ॥१४॥घर गांव स्थान माझें वाडे शेत मळे गुरें । पुत्र कन्या बंधु माझे सर्व सांडोनि चालिला ॥१५॥माझें माझें म्हणे वेडा स्वार्थबुद्धि बहूतची । सर्व सांडोनि गेला रे एकाएकीं उठोनियां ॥१६॥प्रपंचीं भुलला प्राणी व्यर्थ आयुष्य वेंचलें । देव ना धर्म ना कांहीं ऐसा हा साहवा रिपू ॥१७॥प्रपंचाकारणें कष्टीं सर्वस्वें वेंचला जिवें । कांहींच वेंचलें नाहीं शेवटीं हात झाडिला ॥१८॥अपेशी सर्वदा जाल मायाजाळेंचि भूलला। आपुलें मानिलें जें जें तें तें सर्वत्र राहिलें ॥१९॥जाहला खोत पापाचा सर्वांचें पाप घेतलें । यातना भोगणें लागे चूकला शाहणा कसा ॥२०॥आधींच जाणिजे सर्व विवेकी त्यास बोलिजे । प्रपंज लथिला बा रे वैरी हा सोडिला कसा ॥२१॥सर्वांस योग साधेना पुण्य ऊदंड पाहिजे । सहस्रांमाजिं तो एक ज्ञान वैराग्य नेटका ॥२२॥षड्रिपू जिंकिलें जेणें तोचि ज्ञानी महा भला । दीक्षेनें उद्धरी लोकां वैरागी तो उदासिनू ॥२३॥इति श्रीप्रपंचरिपू । जेणें वाढविला भवसंकल्पू । जाणिजे हा अमूपू दु:खसागर ॥२४॥॥ प्रपंचनिरूपण समाप्त ॥६॥ षड्रिपुविवेचन अनुष्ठुभ् छंद संख्या ॥१०३॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP