मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण| अभंग १८६ ते १९० पंचीकरण अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते ११० अभंग १११ ते ११५ अभंग ११६ ते १२० अभंग १२१ ते १२५ अभंग १२६ ते १३० अभंग १३१ ते १३५ अभंग १३६ ते १४० अभंग १४१ ते १४५ अभंग १४६ ते १५० अभंग १५१ ते १५५ अभंग १५६ ते १६० अभंग १६१ ते १६५ अभंग १६६ ते १७० अभंग १७१ ते १७५ अभंग १७६ ते १८० अभंग १८१ ते १८५ अभंग १८६ ते १९० अभंग १९१ ते १९५ अभंग १९६ ते २०० अभंग २०१ ते २०५ अभंग २०६ ते २१० अभंग २११ ते २१६ पंचीकरण - अभंग १८६ ते १९० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ अभंग १८६ ते १९० Translation - भाषांतर ॥१८६॥ विश्वासिला जेथें कैलासाचा राव ।तेथें एक भाव दृढ धरी ॥१॥दृढ धरी भाव वाल्मिकाचे परी ।सर्व ऋषीश्वरीं जाणिजेती ॥२॥जाणिजे वाल्मीकऋषिरामायण ।तारिले पाषाण रामनामें ॥३॥रामनामें उद्धरिली ती गणिका ।नेली दिव्यलोका येचि देहीं ॥४॥येचि देहीं गति पावली कुंटणी ।रामनाम वाणी उच्चारितां ॥५॥उच्चारित राम पूर्ण सर्वकाम ।संसारींचा श्रम दूरी जाय ॥६॥दुरी जाय श्रम आनंद मानसीं ।रामीं रामदासीं दृढ भाव ॥७॥॥१८७॥ हरिभक्ति करी धन्य तो संसारीं ।जयाचा कैवारी देवराणा ॥१॥देवराणा सदा सर्वदा मस्तकीं ।तयासी या लोकीं चाड नाहीं ॥२॥चाड नाहीं जनीं राघवाचा दास ।सार्थक वयेस रामदासीं ॥३॥॥१८८॥ धन्य त्याचें कुळ धन्य त्याचा वंश ।जे कुळीं हरिदास अवतरे ॥१॥धन्य ते जननी धन्य तेचि कुशी ।जे हरिप्रियासी प्रसवली ॥२॥धन्य ते संबंधीं संतांचे सोईरे ।सत्संगें उद्धरे कुळ त्यांचें ॥३॥धन्य पैं तो ग्राम धन्य पैं तो देश ।जेथें रहिवास वैष्ण - वांचा ॥४॥धन्य त्यांचें सख्य वैष्णवीं सर्वदा ।त्ते संगें गोविंदा जीवलग ॥५॥धन्य ते भाविक वंदिती हरिदासा ।तया हषीकेशा वंदितसे ॥६॥धन्य ते निंदक निंदिती सज्जन ।येणें भावें व्यान घडे त्यांसीं ॥७॥धन्य दासी दास सज्जनसेवेसी ।ते सुरवरांसी वंद्य होती ॥८॥धन्य पशु श्र्वान वैष्णव घरींचें ।कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥९॥रामदास म्हणे तरी धन्य होणें ।जरी संग लाधणें वैष्णवांचा ॥१०॥॥१८९॥ हरिभक्तिवीण जाऊं नये क्षण ।या नांव लक्षण सार्थकाचें ॥१॥सार्थकाचें जिणें कथानिरूपणें ।श्रवण मननें काळ गेला ॥२॥काळ गेला हरिभक्तीचेनि योगें ।साधू-चेनि संगें दास म्हणे ॥३॥॥१९०॥ सुपुत्र संसारीं कुळाचें मंडण ।वंशउद्धरण हरिभक्त ॥१॥भक्ति तरताति बेताळिस कुळें ।भक्तीचेनि गुणें जगोद्बार ॥२॥जगोद्धार करी सुपुत्र संसारीं ।येरें अना -सारी पापरूप ॥३॥पापरूपी नर अभक्त जाणावे ।तयांसी नेणवे देवराणा ॥४॥देवराणा वळे देखोनियां भआव ।दास म्हणे माव कामा नये ॥५॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP