आरती कृष्णाची - वोवाळा वोवाळा तूळसी । वृं...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


वोवाळा वोवाळा तूळसी । वृंदावनवासी ।
कमळावर वर राहे तेथें । क्षीरनीवासी ॥ध्रु.॥
सत्यभामा झकली चकली । बुद्धी वैभवा ।
कनक जोखितां तुकितां सिणल्या मुकल्या श्रीदेवा ।
भीमकनंदिनी राहे सदनीं । झडकरी बोलावा ।
त्वरीत येउनि तुळसी वंदुनी पसरी पल्लवा ॥१॥
रुक्मिणी बाळा भावें सबळा लक्षी६ गोपाळा ।
तन मन धन जन वाउनि तुळसी सोडवी कृपाळा ।
तुळसी गंगा भजन श्रीरंगा मंजुरीमाळा ।
धन कल्याण श्रीगुरुचरणा पूजन मनमाळा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP