आरती मारुतीची - जय जया । प्रियजानकीकांता ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जय जया । प्रियजानकीकांता ।
आरती वोवाळीन । कपिराज समर्था ॥ध्रु.॥
अठरा पद्में कपिराजे । तयामधें रुद्र साजे ।
सिंधु हा वोलांडूनी । अशोकवृक्षीं वीराजे
मुद्रिका देऊनीयां । सुखी केलें विश्व बीजें ।
लंकापुर जाळुनीया । भुभुकारें घोष गाजे ॥१॥
द्रोणागिरी आणुनीया । कपिवीर उठवीले ।
भुभुकारें गर्जोनीया । मृत्य मारूनि ठेले ।
मुख्य तूं प्राणनाथ । प्रेम प्रीती राम बोले ।
लक्षुमणा प्राणदाता । यश अद्भूत आलें ॥२॥
अहिरावणें१ महिरावणें । राम चोरुनीया नेले ।
पुष्टिभागीं उडी आली२ । निमिषार्ध सोडवीले ।
दृष्ट पापी संव्हारूनी । जयत गुढीसी आलें ।
कपिवीर गर्जिन्नले । सर्व कल्याण जालें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 03, 2017
TOP