भूपाळी श्रीमारुतीची - उठोनिया प्रात: काळीं । चि...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
उठोनिया प्रात: काळीं । चिंतन करीती भीमाचें ।
सकळ ही दुरितें नाशन । दंडण चुके यमाचें ॥ध्रु.॥
ठकार ठाण मंडित काया । कास कनकाची ।
प्रतापशक्ती पहातां । तुळणा नसे जनकाची ॥१॥
राघवसुग्रिवसख्य करुनी । राहो पुछें दंडिला ।
तेहतीस कोटी मघवा त्याचा । मान खंडिला ॥२॥
कल्याण राघव चौघे बंधु । जनकदुहिता ।
पुढें सन्मुख मारुती । संरक्षी आपुल्या दूता ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 03, 2017
TOP