भूपाळी श्रीरामाची - उठी उठीरे सखया । गाया राघ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


भूपाळी श्रीरामाची
उठी उठीरे सखया । गाया राघवराया ।
क्षणभंगुर हे काया । कां रे वायां दवडीसी ॥ध्रु.॥
प्राचीभाग उजळला । भ्रमतम निवळत निवळला ।
श्रीगुरुस्वामी आठवला । वाचे आला श्रीराम ॥१॥
जंवरी समुदाये आपुला । मेळा दशक साह्यें जाला ।
तंवरी नरदेहे लाधला । विनटला भजनासी ॥२॥
नाम जगाचें जीवन । जन वन भुवन पावन ।
हरीजन कल्याण स्मरण । जन्ममरण नीवारी ॥३॥

Translation - भाषांतर

Last Updated : 2014-03-22T06:10:49.6200000