मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीकरवीर माहात्म्य| खंड ४ श्रीकरवीर माहात्म्य मंगलाचरण खंड १ खंड २ खंड ३ खंड ४ खंड ५ करवीर माहात्म्य - खंड ४ करवीरे माहात्म्य पोथीचे पठन केल्याने साक्षात महालक्ष्मीची कृपा होते. Tags : karveerpothiकरवीरपोथीमराठी खंड ४ Translation - भाषांतर पराशर मुनींनीं केलेली करवीरयात्रा.अगस्ती मुनीनें सांगितलेलें करवीरमाहात्म्य ऐकून लोपामुद्रेस फार आनंद झाला व अगस्तीस तिनें प्रश्न केला कीं, पराशर मुनीनें करवीरांत राहून तप केलें याचें कारण काय तें मला कथन करा. हें ऐकून अगस्ती ह्मणाले, लोपामुद्रे ! नैमिषारण्यांत पराशर मुनी तप करित असताम त्याम्नीं ऐकिलें कीं, श्रीविष्णूंनी काशीक्षेत्र व करवीरक्षेत्र यांची तुलना केली त्यांत करवीर थोर ठरलें. त्यांच्या मनांत एकदां असा विचार आला कीं, कलियुग सुरु होणार आहे, त्यांत जनास बल व आयुष्य कमी असून ते मंद बुद्धि होतील. वेदाच्या शाखा हजारों आहेत त्यांचा अर्थ लोकांस समजणार नाहीं, तर स्मृति, पुराणें, इतिहास वगैरे करण्यास कोण समर्थ होईल ? हें करण्यास श्रीविष्णूच समर्थ आहेत ! हीं सर्व कार्यें करणारा पुत्र मला प्राप्त व्हावा असा वर मी विष्णूपाशीं मागतों व तो कृपाघन ही माझी इच्छा निश्चयानें पूर्ण करील. तपाशिवाय नारायण वश होणार नाहीं व तप करण्यास करवीरापेक्षां भुक्तिमुक्तिदायक असें अन्य क्षेत्र नाहीं, असें जाणून पराशर मुनी आपल्या पत्नीसह नैमिषारण्यांतून निघून करवीरास आले. अगस्ती मुनी ह्मणाले, लोपामुद्रे ! त्या करवीरक्षेत्रांत रत्नें व स्फटिकांनीं बांधलेलीं उत्तम देवालयें असून सर्व देव, तीर्थे व रमणीय उपवनें तेथें होतीं. त्या ठिकाणीं असलेल्या पाचेच्या जमिनी व पोंवळ्याच्या पायर्या त्या क्षेत्रास फार शोभा आणत असत. क्षेत्राच्या चारी दिशेस दोन दोन नद्या वहातात. त्यांचीं नांवें सांगतों ती ऐक. उत्तरेस कृष्णा, व वारणा, पूर्वेस कृष्णा व गणिका, दक्षिणेस वेदा, व यक्षा आणि पश्चिमेस शिवा व मयूरी.चार महाद्वारावर चार लिंगें आहेत तीं :-पूर्वद्वारीं डोंगरावर रामेश्वर; दक्षिणद्वारीं चक्रेश्वर; पश्चिमेस कलहेश शंकर; **** श्रीगुप्तमल्लिकार्जुनहर.चार द्वारांच्या दरम्यान देवता आहेत त्या :-पूर्वेस उज्वलांबा; दक्षिणेस कात्यायनी; पश्चिमेस सिद्धबटुकेश्वर; उत्तरेस केदार. क्षेत्राच्या आठ दिशेस अष्ट लिंगें आहेत तीं :-पूर्वेस कृष्णातीरीं अमरेश; अग्नयेस कोपेश; दक्षिणेस वीरभद्र; नैऋत्येस सिद्ध **** ; पश्चिमेस भोगेश; वायव्येस वटेश; उत्तरेस रामेश्वर; ईशान्येस संगमेश्वर. स्तोत्र नमाम्यहं देवि परां पवित्रां जगत्कृतिस्थाननिरोधसंभवाम् ॥भुक्तिप्रदामज्ञकुलस्य सर्वदा मुक्तिप्रदां प्राज्ञकुलस्य सर्वतः ॥१॥तव प्रभावं सुनिरुपितुं शुभे पराक्रमं वा न हि देववृंदं ॥अलं प्रसीदेश्वरि सर्वदेहिनां कामप्रदा त्वं भव सर्वकामिनां ॥२॥नूनं स्थिता त्वं करवीरके पुरे मुक्तिं प्रदातुं खलु सर्वदेहिनां ॥तथाप याचे भवंतीं सुरार्तिहां मनोरथं सुंदरि पूरयाशु मे ॥३॥या वैरिणां वितनुते भवती विमुक्तिं सा किं ददाति न हि सज्जनभक्त ॥सर्वात्मना तव पदाब्जकथासु तृप्ते भृंगे भवच्चरणपंकजवासदक्षे ॥४॥धन्योऽस्मि कृतकृत्योऽस्मि तव पादाब्जदर्शनात् ॥संसारभयभीतोऽस्मि पाहि मां सर्वशर्मदे ॥५॥सुदिनं चाद्य संजातमाप्तं जन्म फलं मया ॥मातस्त्वद्दर्शनादेव जातः सर्वमनोरथः ॥६॥न याचे वरमन्यं हि पूर्णचंद्रनिभानने ॥त्वत्क्षेत्रवसतिं देहि सर्वकामप्रपूरिणीं ॥७॥(क.म. ८-८)A N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP