स्फुट कविता - मागणी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( वृत्त : मालिनी )
ऋतुशिल जलवृष्टी, तुष्टिपुष्टी असों दे ।
सुखमय करि सृष्टी, दुःख दृष्टी नसों दे ।
हरि - हर - परमेष्ठी, पृष्ठिं रक्षोत मागें ।
जयजय जय वंदे, मातरं - मातरं गे ॥१॥
हरशिल भय चिंता, संकटें माउली तूं ।
करिशिल स्वकरांची, सर्वदा साउली तूं ।
म्हणवुन गुण गायी, विष्णुस्वामी अभंगे ।
जयजय जय वंदे, मातरं - मातरं गे ॥२॥

( वृत्त : वसंततिलका )
शक्ती असो जग - हितास्तव अंगिं बाकी ।
यावीण कांहिं नलगे, मजलागि बाकी ।
हे विष्णुदास विनवी, मृगराज - यानी ।
तूं एकवेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥
बोल भवानी की जय
श्रीदत्त महाराज की जय !!
श्रीसदगुरुनाथार्पणमस्तु

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP