वास्तुशांती - क्षेत्रपाल वंदन
वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.
While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu.
मंगलस्नान करुन उत्तम वस्त्र नेसून स्वच्छ व शुद्ध भूमीवर रांगोळी काढून सुशोभित केलेल्या आसनावर, पत्नीसह, कर्त्याने प्राडमुख बसावे.
कार्यासाठी बसलेल्यांना सुवासिनी कुंकुम तिलक करीत असताना गुरुजींनी मंगलसूचक मंत्रघोष करावा. शांतिसूक्त म्हणावीत -
ॐ स्वस्ति न इंद्रोवृद्धश्रवाः । स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः । स्वस्तिनस्तार्क्ष्योअरिष्टनेमिः । स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु । ॐ अष्टौदेवावसवः सोम्यासः । चतस्त्रोदेवीरजराश्रविष्ठाः । ते यज्ञं पांतुरजसः परस्तात् । संवत्सरीणममृत स्वस्ति ॥ ॐ देवींवाचमजनयंत देवाः । तां विश्वरुपाः पशवोवदंति । सानोमंद्रेषुमूर्जंदुहाना । धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ॥ ॐ नमो ब्रह्मणे नमोअस्त्वग्नये, नमः पृथिव्यैः, नम ओषधीभ्यः, । नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे बृहते करोमि । ॐ सहनाववतु । सहनौभुनक्तु । सहवीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तुमाविद्विषावहै । ॐ शांतिः शांतिः शांतिः । ॐ तच्छंयोरावृणीमहे... शं चतुष्पदे ।
कुंकुम तिलक झाल्यावर यजमान पत्नीने कुंकुम तिलक करणार्या सुवासिनीला हळद कुंकू लावावे. कर्त्याने विडा नारळ द्यावा मानाप्रमाणे लहानाने नमस्कार करावा.
कर्त्याने गुरुजींच्या सूचनेप्रमाणे आचमन करुन पवित्रके धारण करुन प्राणायाम करावा. हातात अक्षता घेऊन देवादिकांना हात जोडून वंदन करावे, आणि त्यांचे स्मरण करावे. प्रथम गणपतीचे स्मरण करुन गणपतीला विडा ( नारळ ) ठेवावा. प्रत्येक विडयावर नारळ ठेवावा असे शास्त्र आहे. शक्य नसेल तर कुलदेवतेला व क्षेत्रपाल देवतेला नारळ अवश्य ठेवावा. ) उजव्या हातात अक्षता घेऊन व हात जोडून पुढीलप्रमाणे देवादिकांना वंदन आणि त्यांचे ध्यान करावे.
ॐ गणानां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन् नूतिभिः सीदसादनं । ॐ भूर्भुवः सुवः महागणपतये नमः । प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेलफलं, समर्पयामि ।
हातातील अक्षता विडा व नारळ यावर वाहाव्यात. पुनः हातात अक्षता घेऊन आपल्या कुलस्वामी व कुलदेवतेचे स्मरण करुन हातातील अक्षता विडा व नारळ यांवर वाहाव्यात व पत्नीने तेथे हळदीकुंकू वाहावे.
ॐ जातवेदसे सुनवाम सोममराती यतो निदहाति वेदः । स नः पर्षदतिदुर्गाणि विश्वानावेव सिंधुं दुरितात्यग्निः ॥ ॐ भूर्भुवःसुवःकुलस्वामी कुलदेवतायै नमः । प्रार्थनापूर्वकम् ताम्बूलं नारिकेलफलं च समर्पयामि ।
पुनः हातात अक्षता घेऊन क्षेत्रपालाचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्यात.
ॐ क्षेत्रस्य पतिना वयं हि तेनेव जयामसि । गामश्चं पोषयित्न्वा स नो मृडातीदृशे ॥ ॐ भूर्भुवःसुवःक्षेत्रपालाय नमः । प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेल फलं समर्पयामि ।
पुनः हातात अक्षता घेऊन वास्तुदेवतेचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्या.
ॐ वास्तोष्पते प्रतिजानीह्यस्मान्त्स्वावेशो अनमीवो भवानः । यत्त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥ ॐ भूर्भुवःसुवःवास्तोष्पतये नमः । प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेलफलं सर्मयामि ।
सर्व विडयांवर, नारळावर पाणी वाहून नमस्कार करावा. कुलदेवतेचा विडा नारळ घरातील देवांसमोर ठेवून नमस्कार करावा. घरातील वडील मंडळींना व गुरुजींना नमस्कार करुन कार्य करणार्यांनी आपल्या आसनावर बसावे. हातात अक्षता घेऊन देवतांना वंदन करावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP