मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|हरिपाठ| श्री तुकाराम महाराज हरिपाठ हरिपाठ श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ श्री एकनाथ महाराज हरिपाठ श्री नामदेव महाराज हरिपाठ श्री निवृत्ति महाराज हरिपाठ श्री तुकाराम महाराज हरिपाठ श्री तुकाराम महाराज हरिपाठ Shri Tukarama Haripatha - श्री तुकाराम महाराज हरिपाठ Tags : haripathastotratukaramतुकारामस्तोत्रहरिपाठ श्री तुकाराम महाराज हरिपाठ Translation - भाषांतर १नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥३॥तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥४॥ २पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ॥१॥केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ॥२॥माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥३॥नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥४॥तुका म्हणे एका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ॥५॥ ३अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ॥१॥मोक्ष पुर्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥२॥नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ॥३॥तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ॥४॥ ४यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥१॥नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ॥२॥जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ॥३॥तुका म्हणे नामीं एकनिष्ठ भाव । तेथें वासुदेव सर्व काळ ॥४॥ ५प्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावें । तेणें विसरावें जन्ममृत्यु ॥१॥नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणेंचि धन्य होती प्राणी ॥२॥न करा आळस नाम घेतां वाचे । नाहीं भय साचें प्राणियांसी ॥३॥तुका म्हणे वाचें गाईल गोविंद । होईल परमानन्द नामें एका ॥४॥ ६कश्यप गौतम भारद्वाज अत्री । ऋषि विश्वामित्र नाम थोर ॥१॥जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला । तिन्हीं लोकीं झाला वंद्य एक ॥२॥नाम घेतां नुरे पाप ताप दैन्य । होय थोर पुण्य उच्चारितां ॥३॥तुका म्हणे ऐसी उच्चारितां वाणी । तेथें अंतःकरणीं सुख होय ॥४॥ ७ अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी । मुख्य मंदोदरी पतिव्रता ॥१॥नामें घेतां त्यांची वाणी हे पवित्र । होय कुळगोत्र उद्धरण ॥२॥संकल्प विकल्प सांडोनियां दुरी । वाचे हरि हरी उच्चारावे ं ॥३॥नाहीं बद्धकता तया संसाराची । जाचणी यमाची मग कैंची ॥४॥ ८व्यास अंबरीष वसिष्ठ नारद । शौनक प्रल्हाद भागवत ॥१॥नित्य स्मरण करी यांचें जरी प्राणी । पुन्हां नाहीं खाणी चौंर्याशींची ॥२॥शुक पराशर मुनि पुंडलीक । अर्जुन वाल्मीक नाम गाती ॥३॥बली बिभीषण भीष्म रुक्मांगद । बकदाल्भ्य शुद्ध महाऋषि ॥४॥तुका म्हणे यांचीं नामें येतां वाणीं । प्रत्यक्ष तो प्राणी देवाऐसा ॥५॥ ९गीता भागवत वेद उच्चारितां । पापाची तों वार्ता कोठें राहे ॥१॥सकळ वासना नामीं जे रंगली । साधनें राहिली मग कैंची ॥२॥म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा । होय तोचि देवा आवडता ॥३॥उगवला दिवस जाय तो क्षणांत । विचारूनि हित वेगीं करा ॥४॥तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी । न धरा मानसीं दुजें कांहीं ॥५॥ १०तीर्थांचें जें मूळ व्रतांचें जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये ॥१॥तें आम्हीं देखिलें आपुले नयनीं । फिटलीं पारणीं लोचनांचीं ॥२॥जिवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥३॥जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ॥४॥सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥५॥तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ॥६॥ ११राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ॥३॥कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ॥४॥सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥ १२आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥४॥ १३शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ॥१॥मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ॥२॥रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ॥४॥ १४नेणें जप तप योग युक्ति ध्यान । करितां चिंतन रात्रंदिवस ॥१॥नेणें कांहीं देवा झालों उतराई । मागें लागों पाहीं बाळ जैसा ॥२॥भाव-गंगोदकें आम्ही शुद्ध पाहें । प्रक्षाळिले पाय विटेसहित ॥३॥जन्मली जान्हवी ज्या ठायीं उत्तम । हारावया श्रम भाविकांचे ॥४॥तुका म्हणे आम्ही झालों पुण्यवंत । सेविलें अमृत रामतीर्थ ॥५॥ १५परिमळमिश्रित करूनि उटणें । नारायण तेणें तोषविला ॥१॥पय घृत दहि मधु ते शर्करा । गोशृंगधारा अखंडित ॥२॥करोनि संयुक्त ओपियली ईशा । पंचामृतें तैशी पंचविधि ॥३॥तुका म्हणे जेथें गंगे जन्म झाला । प्रसाद दिधला आम्हालागी ॥४॥ १६आपुलिया घरीं कष्ट तरी करीं । आणोनि घागरी गंगोदक ॥१॥करोनि विनंती विनवितो तुम्हां । स्नान पुरुषोत्तमा करा वेगीं ॥२॥उत्तम वस्त्रानें पुसावें तें अंग । करोनि अभ्यंग सर्वांगासी ॥३॥परिधान वस्त्रें केलें पीतांबरें । तेणें हें साजिरें रूप दिसे ॥४॥तुका म्हणे नेत्र पाहतां निवाले । ध्यान संचारलें हृदयामाजीं ॥५॥ १७मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणें नाहीं ॥१॥मन हें सेवंती अर्पूनी भगवंतीं । पुनरपि संसृती येणें नाहीं ॥२॥मन हें तुळसी अर्पूनी हृषीकशी । पुनरपि जन्मासी येणे नाहीं ॥३॥तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ॥४॥ १८नामपुष्प शुद्ध गळां घाला हार । विवेक सारासार तुरा लावूं ॥१॥बोध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ । वाहतां गोपाळ संतोषतो ॥२॥गाइलीया गुण संतोषें तयानें । करितां कीर्तनें आल्हादे तो ॥३॥आल्हादे हा देव कीर्ति वाखाणितां । पवाडे सांगतां याचे यास ॥४॥याचे यास करूं सर्व निवेदन । वारील हा शीण संसारींचा ॥५॥संसाराचा वारा लागों नेदी अंगा । भावे पांडुरंगा आळवितो ॥५॥तुका म्हणे आतां उजळली आरती । भावें तो श्रीपती ओंवाळूंया ॥७॥ १९शब्दाचिया भावें केला उपचार । तेणें सर्वेश्वर संतोषला ॥१॥शब्दाचिया करें करविलें भोजन । धाला नारायण तेणें सुखें ॥२॥शब्दाचिया करें करविले आचमन । तांबूल अर्पून फळें पुष्पें ॥३॥तुका म्हणे अन्नाआधी धूपदीप । उपचार अल्प समर्पिले ॥४॥ २०मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड । वाचे घेत गोड नाम तुझें ॥१॥नेणतें लेकरुं आवडीचें नातें । बोले वचनातें आवडीनें ॥२॥भक्तिविण कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥३॥तुका म्हणे नाचूं निर्लज्ज होउनी । नाहीं मझे मनीं दुजा भाव ॥४॥ २१पूजूं नारायण शब्दाचे सुमनें । मंत्रपुष्प तेणें वाहियेलें ॥१॥भावाचे पैं हातीं जोडुनी ओंजळ । समर्पिलें जळ शुद्ध भावें ॥२॥मुखशुद्धी तांबूल दिलें तुळसीदल । आनंद सकळ ओसंडला ॥३॥तुका म्हणे आतां उरलें नाहीं । नामाविण कांहीं बोलावया ॥४॥ २२समाधान चित्ताचें चरणा आलिंगन । पायावरी मन स्थिरावलें ॥१॥जैसें केलें तैसें घालूं लोटांगणा । करूं प्रदक्षिणा नमस्कार ॥२॥प्रार्थितों मी तुज राहें माझें पोटीं । हृदयसंपुटीं देवराया ॥३॥क्षेम आलिंगन दिली पयीं मिठी । घेतलीसे लुटी अमूप हो ॥४॥तुका म्हणे आतां आनंदीआनंद । गाऊं परमानंद मनासंगें ॥५॥ २३काय उपचार करूं पांडुरंगा । हेंचि मज सांगा विचारूनी ॥१॥कोणता पदार्थ उणा तुजपासी । बोलाया वाचेशीं मौन पडे ॥२॥शंकर-शेषादि करिती स्मरण । तेथें माझें मन गाऊं शके ॥३॥इंद्र सुरवर वाहती सुमनें । तेथें म्यां वाहणे ं काय एक ॥४॥परीं आवडीनें जोडूनी ओंजळ । बुका वाहूं माळ तुळसीची ॥५॥उणें पुरें तुम्ही करूनियां सांगा । जिवालागीं मग सुख तेव्हां ॥६॥तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना । तुम्ही नारायणा सेवकाची ॥७॥ २४कैसें करूं ध्यान कैसा पाहूं तुज । वर्म दावी मज याचकासी ॥१॥कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥२॥कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षीं जाणूं । जाणुं हा कवणूं कैसा तुज ॥३॥कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिति मति न कळे मज ॥४॥तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणीं मज ॥५॥ २५काय तुज कैसें जाणावें गा देवा । आणावे अनुभवा कैशापरी ॥१॥सगुण निर्गुण स्थूल कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ॥२॥कोणता निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तारावया ॥३॥तुका म्हणे कैसें पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥४॥ २६स्तुती करूं तरी कोण माझी मती । वेदां पडे भ्रांति हें आश्चर्य ॥१॥परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी । बैसवीं लौकरी यातीगुण ॥२॥रूप गुण कीर्ति कृपाळू उदार । वर्णावया पार ब्रह्मा नेणे ॥३॥रूपीं नामीं शिव होऊनिया वेडा । वर्णिला पवाडा रामनामीं ॥४॥तुका म्हणे मज नेणवेचि शिव । नाहीं राहिला वाव बोलावया ॥५॥ २७नामाचा प्रताप न वर्णवेचि मज । सांग गरुडध्वज राहे तेथें ॥१॥मम वाचा किती परतल्या श्रुती । वेद मुखें श्रुती मौन ठेले ॥२॥वर्णूं नेणें शेष नामाचा पवडा । चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या ॥३॥अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी । पायांची किंकरी होऊनि ठेली ॥४॥तुका म्हणे आम्ही मानव किंकर । वर्णावया पार न कळे तुझा ॥५॥ २८आम्हीं मानवानी वर्णावें तें काय । सुरवर पाय वंदिताती ॥१॥गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ॥२॥जयाच्या गायना तिष्ठतो शंकर । तयासी पैं पार न कळे तुझा ॥३॥तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची ती मती नागविली ॥४॥ २९अगा महाविष्णु अनंत भुजांच्या । आम्हां अनाथांच्या सोयरीया ॥१॥न कळे महिमा वेद मौनावती । तेथें माझी मति कोणीकडे ॥२॥काय म्यां वर्णावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना शक्ति नव्हे ॥३॥रविशशी जेथें तेजें सामावती । तेथें माझी मती कोणीकडे ॥४॥तुका म्हणे आम्ही बाळ तूं माऊली । करावी साउली करुणेची ॥५॥ ३०नमो विश्वरूपा अगा मायबाप । अपारा अमूपा पांडुरंगा ॥१॥विनवितो रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावे ॥२॥तुझी स्तुती वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥३॥ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥४॥तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ॥५॥ ३१विनविजे ऐसे भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥धीटपणे पत्र लिहिलें आवडी । पार नेणें थोडी मति माझी ॥२॥जेथें वेदां तुझा न कळेचि पार । तेथें मी अपार काय वानूं ॥३॥जैसे तैसे माझे बोल अंगिकारी । बोबड्या उत्तरी गौरवितो ॥४॥तुका म्हणे विटेवरी जीं पाऊलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥५॥ ३२त्रिगुण आटीव वाचेचा पसारा । पडेल विचार सर्व रस ॥१॥आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळुनी गेलें ॥२॥रामकृष्ण नाम माळ ही साजिरी । ओंविली गोजिरी कर्णीं मनी ॥३॥तुका म्हणे तनु झाली हे शीतल । आवडी सकळ ब्रह्मानंदें ॥४॥ ३३इतुकें करीं देवा ऐकें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥इतुकें करीं देवा आइकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥२॥इतुकें करीं देवा विनवितों तुज । संतचरण रज वंदी माथां ॥३॥इतुकें करी देवा आइकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥४॥भलतियां भावें तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥५॥ N/A N/A Last Updated : August 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP