मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|हरिपाठ| श्री नामदेव महाराज हरिपाठ हरिपाठ श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ श्री एकनाथ महाराज हरिपाठ श्री नामदेव महाराज हरिपाठ श्री निवृत्ति महाराज हरिपाठ श्री तुकाराम महाराज हरिपाठ श्री नामदेव महाराज हरिपाठ Shri Namadeva Haripatha - श्री नामदेव महाराज हरिपाठ Tags : haripathanamdevstotraनामदेवस्तोत्रहरिपाठ श्री नामदेव महाराज हरिपाठ Translation - भाषांतर १नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावें श्रीरामा एका भावें ॥१॥न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें । वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ॥२॥अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत ॥३॥नामा म्हणें नाम महाजप परम । तो देह उत्तम मृत्युलोकीं ॥४॥ २जन्माचें कारण रामनामपाठीं । जाइजे वैकुंठीं एकीहेळा ॥१॥रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल आपैसा इहलोकीं ॥२॥दो अक्षरीं राम जप हा परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ॥४॥ ३विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥सर्वही लटिकें जाण तूं बा निकें । रामाविण एकें न सुटिजे ॥२॥मायाजाळ मोहें इंद्रियांचा रोहो । परि न धरेचि भावो भजनपंथें ॥३॥नामा म्हणे देवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहो घनगर्जना ॥४॥ ४कांसवीचे दृष्टी जैं येईजे भेटी । तैं अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥१॥तैसें हें भजन श्रीरामाचें ध्यान । वाचे नारायण अमृतमय ॥२॥धन्य त्याचें कुळ सदा पैं सुफळ । दिननिशीं पळ रामनाम ॥३॥नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम ॥४॥ ५सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदी कळिकाळ शास्त्र सांगे ॥१॥ब्रह्मांडनायक ऐसें जें कौतुक । तेंचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें ॥२॥आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा । परिपूर्ण सरिता अमृताची ॥३॥नामा म्हणे अनंत कां करिशी संकेत । उद्धरिले पतित युगायुगीं ॥४॥ ६गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥१॥नारायण नारायण हेंचि पारायण । उद्धरले जन इहलोकीं ॥२॥तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवउद्धारणा नाम स्मरा ॥३॥नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नाना कोटी ॥४॥ ७तीर्थ जपराशी जप हृषीकेशी । मुखीं अहर्निशीं रामनाम ॥१॥तीर्थाचें पैं तीर्थ नाम हें समर्थ । होईल कृतार्थ रामनामें ॥२॥होईल साधन तुटेल बंधन । वाचे जनार्दन सुफळ सदा ॥३॥नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारीं इहलोकीं ॥४॥ ८पाहतां ये परिपाटी आणिक नाहीं सृष्टी। नामेंविण दृष्टीं न दिसे माझ्या ॥१॥नमचि समर्थ नामचि मथित । शंकरासी हेत रामनामीं ॥२॥भरती सर्व काम वाचे रामनाम । न लगती ते नेम कर्मजाळ ॥३॥नामा म्हणे उच्चार न करीं तूं विचार । तुटेल येरझार नाना योनी ॥४॥ ९तपाचें हें तप राम हें अमूप । करीं का रे जप रामनामीं ॥१॥रामकृष्ण म्हणे वाचे नारायण । तुटेल बंधन यमपाश ॥२॥साधेल साधन होती कोटी यज्ञ । राम जनार्दन जपे करीं ॥३॥नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी । म्हणे नरहरी एक्या भावें ॥४॥ १०हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥ ११करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥२॥तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥ १२मायेचीं भूचरे रज तम सात्त्विक । रामनाम एक सोडवणें एक ॥१॥राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामें घडती यज्ञ कोटी देवा ॥२॥न लगती साधनें नाना मंत्र विवेक । रामनामीं मुख रंगवी कां रे ॥३॥नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां। नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥४॥ १३माझें मी करितां गेले हे दिवस । न धरीच विश्वास राम नामीं ॥१॥अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥कां करिशी सांठा प्रपंच विस्तार। न तुटे येरझार नामेंविण ॥३॥नामा म्हणे ऐसें रामनामीं पिसें । तो उद्धरेल आपैसें इहलोकीं ॥४॥ १४नको नको माया सांडीं लवलाह्या । पुढील उपाया झोंबें कां रे ॥१॥राम नाम म्हणे तुटेल बंधन । भावबंधमोचन एक्या नामें ॥२॥स्मरतां पतित उद्धरेल यतार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला ॥३॥नामा म्हणे हा जप करी तूं अमूप । नामें चुके खेप इये जनीं ॥४॥ १५स्मरण करितां रामनामध्वनी । ऐकतांचि कर्णीं पळती यम ॥१॥नामपाठ करा राम कृष्ण हरी । होतील कामारी ऋद्धि सिद्धि ॥२॥साध्य तेंचि साधीं न करी उपाधी । जन्मांतरीच्या व्याधी हरती नामें ॥३॥नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाहीं आणिक देव रामेंविण ॥४॥ १६रामकृष्णमाळा घालितां अढळ । तुटेल भवजाळ मायामोह ॥१॥होशील तूं साधु न पावती बाधु । पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टेल तुज ॥२॥जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नेम साधेल तुज ॥३॥नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ । न लगती ते अर्थ मायापाश ॥४॥ १७शरीर संपत्ती मायेचें टवाळ । वायांचि पाल्हाळ मिरवितोसी ॥१॥नाम हेचि तारी विठ्ठलनिर्धारीं । म्हणे हरी हरी एक वेळां ॥२॥स्मरतां गोपाळनामा वंदितील यम । न लगती नेम मंत्रबाधा ॥३॥ नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरें कां रे ॥४॥ १८कृष्णकथा संग जेणें तुटे पांग । न लगे तुज उद्योग करणें कांहीं ॥१॥समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दनीं एक ध्यायी ॥२॥नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥३॥ १९भवाब्धीतारक रामकृष्ण नांव । रोहिणीची माव सकळ दिसे ॥१॥नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठीं बिढार रामनामें ॥२॥राम हे निशाणी जपतांची अढळ । वैकुंठ तात्काळ तया जीवा ॥३॥नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल । अंतीं तुज पावेल राम एक ॥४॥ २०जळाचा जळबिंदु जळींच तो विरे । तैसें हें विधारे पांचाठायीं ॥१॥जीव शिव विचार नाम हें मधुर । जिव्हेसी उपचार रामनाम ॥२॥रामनाम तारक शिव षडक्षरी । तैची वाचा करीं अरे मूढा ॥३॥नामा म्हणे ध्यान शिवाचें उत्तम । मंत्र हा परम रामनाम ॥४॥ २१करितां हरिकथा नाम सुखराशी । उद्धरी जीवासी एका नामें ॥१॥तें हें रामनाम जपे तूं सप्रेम । जप हा सुगम सुफळ सदा ॥२॥ नामेंचि तरले नामेंचि पावले । नाम म्हणतां गेले वैकुंठासी ॥३॥नामा म्हणे एका नामेंसी विनटे । ते वैकुंठींचे पेठे पावले देखा ॥४॥ २२नामावांचूनि कांहीं दुकें येथें नाहीं । वेगीं लवलाहीं राम जपा ॥१॥गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ । पावसी केवळ निजपद ॥२॥धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामेंचि चित्पद पावले देख ॥३॥नामा म्हणे राम वाचे जपा नाम । संसार भवभ्रम हरे नामें ॥४॥ २३म्हणतां वाचे नाम वंदी तया यम । काळादिक सम वंदी तया ॥१॥ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारितां नीट वैकुंठ गाजे ॥२॥तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा। न कळे तया उपमा आदिअंतीं॥ ३॥नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटें । तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी ॥४॥ २४विष्णुनाम श्रेष्ठ गाती देवऋषी । नाम अहर्निशी गोपाळाचें ॥१॥हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि । असे चराचरीं जनार्दना ॥२॥आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी । उमेप्रति करी उपदेश ॥३॥नामा म्हणे नाम महाजप परम । शंकरासी नेम दिनदिशीं ॥४॥ २५कां करतोसी सीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥१॥राम कृष्ण हरी नारायण गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥वंदील तो यम कळिकाळ सर्वदा । न पावसी आपदा असत देही ॥३॥नामा म्हणे ओळंग शीण झाला संगें । प्रपंच वाउगे सांडी परते ॥४॥ २६नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥ २७सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्ता ॥४॥ २८तूं तव नेणता परि हरि तो जाणता । आहे तो समता सर्वां भूतीं ॥१॥सर्वब्रह्म हरि एकचि निर्धारी । होशी झडकरी ब्रह्म तूंचि ॥२॥अच्युत माधव अमृताच्या पाठें । लागतांचि वाते वंदी यम ॥३॥नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता ॥४॥ २९कां करिसी सोस मायेचा असोस । नव्हे तुझा सौरस नामेंविण ॥१॥नामचेचि मंत्र नामचेचि तंत्र । नामविण पवित्र न होती देखा ॥२॥तिहीं लोकीं काहीं नामेंविण सर्वथा । अच्युत म्हणतां पुण्यकोटी ॥३॥नामा म्हणे ब्रह्म आदि अंतीं नेम । तें विटेवरी सम उभें असे ॥४॥ ३०पवित्र परिकर हा उच्चार । उद्धरण साचार जगासी या ॥१॥गोविंद केशव उच्चारीं श्रीराम । न लगती नेम अमूप जप ॥२॥तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरीं । नाम चराचरीं विठ्ठल ऐसें ॥३॥नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल । उच्चारितां मोल न लगे तुज ॥४॥ ३१पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा । शेखीं तें आपदा करील तुज ॥१॥नव्हे तुझें हित विषय पोषितां । हरी हरी म्हणतां उद्धरसी ॥२॥वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी । परी नाम न म्हणसी अरे मूढा ॥३॥नामा म्हणे हेचि पंढरीये निधान । उच्चारिता जन तरले ऐसें ॥४॥ ३२विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठल न म्हणसी अरे मूढा ॥१॥पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ॥२॥ न लगे सायास करणें उपवास । नामाचा विश्वास ऐसा धरीं ॥३॥नामा म्हणे प्रेम धरीं सप्रेम । विठ्ठल हाचि नेम दिनदिशीं ॥४॥ ३३नव्हे तुज हित म्हणतां विषय पोषिता । हरी हरी म्हणतां तरशील ॥१॥माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वेगीं हें उच्चारीं लवलाहीं ॥२॥घडतील यज्ञ पापें भग्न होत । प्रपञ्च सर्वत्र होईल ब्रह्म ॥३॥नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी ॥४॥ ३४उपदेश सुगम आइके रे एक । नाम हें सम्यक विठ्ठलाचें ॥१॥जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ॥२॥साधेल निधान पुरेल मनोरथ । नामेंचि कृतार्थ होसी जनी ॥३॥नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी । पावशी निर्धारीं वैकुंठपद ॥४॥ N/A N/A Last Updated : August 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP