सभापर्व - शिशुपालवध

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


तें यजनकर्म झालें पूर्ण सविधि परमशुद्ध रायाचें ।
उद्धरिलें भगवंतें भरताचें गोत्र उद्धरायाचें ॥१॥
तेव्हां देवर्षि मनी आणी की ' क्षत्र सर्व शुद्धरणें ।
उद्धरणार प्रभु, परि आधीं शिशुपाल आजि उद्धरणे ॥२॥
धर्मासि ह्नणे, ' राया ! आले यज्ञोत्सवार्थ नगरा जे ।
त्यांमध्ये पूजावा त्वां प्रथम श्रेष्ठ, सर्व मग राजे ' ॥३॥
धर्म ह्नणे भीष्मातें, ' सांगा जी ! मज तुह्मीच जें विहित, ।
सांगत आलां पूर्वी जैसे मद्भावुकार्थ जेंवि हित ' ॥४॥
भीष्म ह्नणे, ' वत्सा ! जरि पुससी सर्वात कोण पूज्य असें ।
तरि वासुदेव आधीं पूजावा त्वां विशुद्ध भक्तिरसें ॥५॥
ज्योतर्गणांत रविसा, तेजस्वी कृष्ण या सदांत पहा, ।
तेज अहा ! क्षिप्र बहां, अर्ध वहा, एक पूज्य वृष्णिप हा  
पूजी प्रभुला प्रेमें व्हाया दृककामपूर्ति सहदेव,
पूजित आले स्वस्थिरेचर त्या श्रीविश्वमूर्तिसह देव ॥७॥
नारद, भीष्म, प्रमुखां साधूंच्या होय दृष्टिलाभा जी ।
र्भा जीमूतश्यामा प्रभुची ती चैद्यदृष्टींला भाजी ॥८॥
भगवत्सत्कृति पाहुनि कोपे शिशुपाल सत्समाजांत ।
दुष्टी जशी पिशाची भरले दुर्बुद्धि तत्समा जांत ॥९॥
धर्मासि करी सज्जनवृंदी पाण्यापरीस पातळ, तें ।
वद्रवेन; सन्निंदावागनुवादेंहि पाप आतळतें ॥१०॥
गांजी पुष्कळ लावुनि मूर्खपण तशा सभेंत शांतनवा, ।
परि हांसे, कीं जन्मापासुन बहु शांत, तो न शांत नवा ॥११॥
त्रिजगत्पूज्यपद प्रभु गुरु पुण्यश्लोक सार्वभौम खरा, ।
त्या निंदी श्रीकृष्णा कीर्तिश्रीशांतिमूर्तिच्या मखरा ॥१२॥
बहु सांत्वन धर्म करी, न शमे, न वळे, परंतु तो चैद्य ।
मरणार्‍या रोग्याला काय करिल जाणता भला वैद्य ? ॥१३॥
भीष्म ह्नणे, ' खळसांत्वन कां करितो ? याचिया नसे कानें ।
हें ऐकिलें, निवे घृत कढलें तोयाचिया न सेकानें ॥१४॥
क्षोभे बहु या वचनें, त्याला उपमान दुष्ट कुतरेंच; ।
विस्तर असो; तयाच्या उतरी शिर हरुनि शौरिसुत रेंच ॥१५॥
सोसुनि शत अपराध प्रभुनें शिशुपाल मारिला चक्रें, ।
केला पात्र सुगतिला, जी प्रार्थावी गति स्वयें शक्रें ॥१६॥
शिरलें तद्देहोत्थित तेज प्रभुच्या मुखी पदा नमुनी ।
मानिति मनांत त्या वरचरितास महावरप्रदान मुनी ॥१७॥
देवर्षिप्रमुख सुजन ह्नणती, ' जीवासि एक हरि हित रे ! ।
अद्भुत महिमा याचा, भक्त तरे, करुनि वैर अरिहि तरे ' ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP