काव्यरचना - इंग्लिश राज्य
महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.
[जोतीरावांच्या कवनांतील स्तबकें उद्धृत करुन त्यांवर सटीक भाष्य कराणारा एक लेख विविधज्ञानविस्तारांत ‘नवीन शाईर’ या मथळ्याखालीं प्रसिद्ध झाला होता. त्यांतील टीका गाळून मूळ कवनांतील स्तबकें खंडित स्वरुपांत येथें देण्यात येत आहेत.]
इंग्लिश राज्य झालें ॥ ब्राह्मण मनामध्यें झुरती ॥ दोष पहा राणीला देती ॥ सर्व मलायी खाती ॥ इंग्लिशां दूध पाजिती ॥ डोईवर खापर फोडीती ॥ सर्व भ्रष्ट कामें करिती ॥ नीच सर्वांस मानीती ॥
[गांवचे कुलकर्णी]
++कज्जे लाविती ॥ पाटीला चित्न नाचविती ॥ तयारी रपोटाची करिती ॥
स्वजातीस मामलेदारी ॥ कुलकर्णी माजले भारी ॥
उभयंता नरोठ्या देती ॥ सरकारी आणि सावकारीं नातें ॥
+++रयत गांजली सारी ॥
सर्व जागा आप्तांला देती ॥ जमाव जातीचा करिती ॥
+++
लोडासी टेकून दिमाखानें बसती ॥ लंगोठ्या पाहून हसती ॥
बगले कानीं लागती ॥ स्वजाती कैंदीस ताजीम देती ॥
शूद्रावर फाडिती ॥
+++
[चिटणीस]
++मेजवान्या देतो ॥ पायर्थीं रांडांच्या पडती ॥
अर्जी वाचतां मजकूर गाळीती ॥ कलेक्टर ढेरे गणपती ॥
हातचलाखी करुन वरती ॥ सही त्याची घेती ॥ करिती अर्जाची माती ॥
+++
देतीं शूद्रास शिक्षा हटकुनी ॥ न्यायाधीश उठे झटकुनी ॥
पुस्ती कायदे कलम देउनी ॥
+++
महारमांगाचंची दाद घेतां सोवळें दाविती ॥ यवनी रांडा ठेवीती ॥
न्याय करितां--शिष्यानें समजूत उजरती ॥ राग येतां दुरुन
जोडे फेकून मारिती ॥ दयेला नाहीं जरा वस्ती ॥
+++
इंग्लिशां नांव ठेविती ॥ दोष राणीला देती ॥
+++
पार्लमेंटामधीं सभासद होऊं पाहती ॥ कलकटरी जागा मागती ॥
(केवढी) छाती ॥
+++
ज्याचा माल त्याचे हाल, मुलें भलत्याची शिकती ॥
माळीकुळंबी यांच्या पोरांना मिळेना लंगोटी पुरती ॥
जोडे नाहीं पाय पोळती ॥
थोडीशीं पोरें जमवून मोठी संख्या रपोटांत लिहिती ॥
म्हाराच्या पोरांचा विटाळ मानीती ॥ इंग्रजा शेकह्यांड करिती ॥
+++
ब्रह्यास मधीं वर्णिती हो ॥ इतर धर्मांस निंदिती हो ॥
शुद्र पोरां खोटा धर्मं हळूच शिकविती ॥ द्वेष राणीचा भर भरविती ॥
+++
शूद्र लेकरा मुका मार देऊन पळविती ॥
चापट्या गुद्दे मारिती ॥ जोरानें कान पीळिती ॥
परंतु स्वजातीला शिक्षा बोधानें करिती ॥
+++
गुणी म्हणी शाळामास्तर ॥ पंतोजी चढविला फार ॥
शूद्रांची जात वेदी हो ॥ लिहिण्याची नाहीं गोडी हो ॥
अशी खोटीच लिहितो चहाडी हो ॥
सिद्धसाधक होऊन जातीची बढती ॥ कोण घेईना ह्यांची झडती ॥
+++
आठ वाजल्यानंतर ॥ आणि मग खुर्ची आसनावर बसती ॥
हाजरीं पोरेंसोरे घेती ॥ ब्राह्मणांची मुलें शिकवितां दहा वाजविती ॥
अगदी थकल्यासारखे दाखविती ॥ सावली-घड्याळा पाहती ॥
शाळेला झटकन सोडिती ॥
+++
जेऊन झोपती गार ॥ नंतर न्यूजपेपर ॥ लिहिती पत्न अखेर ॥
थंडाई पडल्यावर ॥ शाळेंत जाती घडीभर ॥ शिकविती भावलें तर ॥
+++
शूद्राच्या शिकण्याची माती हो ॥
+++
माळ्याकुणब्या बोध करुन रात्नीं पोथ्या वाचिती ॥
भलतीच थाप देती ॥ सिध्यावर दक्षिणा घेती ॥ शूद्राला उघड नाडिती ॥
अशा तर्हेच्या ढोंगी लोकां शिक्षक नेमिती ॥
सुधारले मुडूक सर्पा ज्ञान शिकविती ॥
घरामधें दगडी पुजिती ॥ धर्म बुडाला म्हणती ॥ उगीच हाका मारिती ॥
+++
गव्हार खरें हें भोळें सरकार ॥ चहूंक।दे भटभाई ॥ कुणब्याची दाद नाहीं ॥
+++
नीति राव जोतीची, मतलबी मनामधीं झुरती ॥ दुसरे ख्रिस्ती तरफडती ॥
+++
सुचवितों राणीबाईला ॥ सोपूं नको ब्राह्मणाला ॥ फसूं नको त्यांच्या तर्काला ॥
जातजातीच्या संख्याप्रमाण कामें नेंमा ती ॥ खरी ही न्यायाची रीति ॥
+++
नेमा गुरु अन्य जातीचे ॥ नमूने सात्विक ज्ञानाचे ॥ निवळ माळ्या कुणब्याचे ॥
दुसरे महार मांगांचे ॥
+++
लोक तुला गाण्यामध्ये गातील हो । जगामधीं कीर्ती होईल हो ॥
+++
जोती म्हणे धाव घेई ॥ दुष्टापासून सोडवी ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP