शेतकर्‍याचा असूड - पान ७

शूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.


आर्य ब्राह्यण इराणांतून कसे आले व शूद्र शेतकरी यांची मूळ पीठिका व हल्लींचें आमचें सरकार, एकंदर सर्व आपले कामगारांस मन मानेल तसे पगार व पेनशनें देण्याचे इराद्यानें नानाप्रकारचे नित्य नवे कर शेतकर्‍यांचे बोडक्यावर वसवून, त्यांचें द्र्व्य मोठया हिकमतीनें गोळा करूं लागल्यामुळें शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत.
या सर्व अगम्य, अतवर्य आकाशमय विस्तीर्ण पोकळींत नानाप्रकारचे तत्त्वांच्या संयोगवियोगानें अगणित सूर्यमंडलें त्यांच्या त्यांच्या उपग्रहासह निर्माण होऊन लयास जात आहेत. त्याचप्रमाणें हरएक उपग्रह आपापल्या प्रमुख सूर्याच्या अनुरोधानें भ्रमण करीत असतां एकमेकांच्या सान्निध्यसंयोगानुरूप या भूग्रहावरील एकाच मातापितरांपासून एक मुलगा मूर्ख आणि दुसरा मुलगा शहाणा असे विपरीत जन्मतात. तर यावरून मूर्खपणा अथवा शहाणपणा हे पिढीजादा आहेत, असें अनुमान करित येत नाहीं. तसेंच स्त्नीपुरुषाचा समागम होण्याचे वेळीं त्या उभयतांचे कफवातादि दोषात्मक प्रकृतीच्या मानाप्रमाणें व त्या वेळेस त्यांच्या मनावर सत्वर आदि त्निगुणांपैकीं ज्या गुणांचें प्रावल्य असतें, त्या गुणांच्या महत्त्वप्रमाणानें गर्भपिंडाची धारणा होते. म्हणूनच एका आईबापाचे पोटीं अनेक मुले भिन्न प्रकृतीचीं व स्वभावाचीं जन्मतात. असें जर्न म्हणार्वे, तर इंग्लंडांतील प्रख्यात गृहस्थांपैकीं टामस पेन व अमेरिकन शेतकर्‍यांपैकीं जार्ज वॉशिंग्टन या उभयतांनीं शहाणपणा व शौर्य हीं पिढीजादा आहेत म्हणून म्हणणार्‍या रूयालीखुशाली राजेरजवाडयांस आपाआपले कृतीनें लाजविलें असतें काय ? शिवाय कित्येक अज्ञानी काळे शिपायी केवळ पोटासाठीं कोर्ट मार्शलचे धाकानें काबूल व इजिप्टांतील जहामर्दाशीं सामना बांधून लढण्यामध्यें मर्दुमगिरी दाखवितात व त्याचप्रमाणें कित्येक अमेरिकेंतील समंजस विद्वानांपैकीं पारकर व मेरियनसारख्या कित्येकांनीं जन्मतः केवळ शेतकरी असूनही स्वदेशासाठीं परशत्नूशीं नेट धरून लढण्यामध्यें शौर्य दाखविलेलीं उदाहरणे आपलेपुढें अनेक आहेत. यावरून जहांमर्दी अथवा नामर्दी पिढीजादा नसून ज्याच्या त्याच्या स्वभावजन्य व सांसर्गिक गुणाबगुणांवर अवलंबून असते, असेंच सिद्ध होतें. कारण जर हा सिद्धांत खोटा म्हणावा, तर एकंदर सर्व या भूमंडळावरील जेवढे म्हणून राजेरजवाडे व बादशहा पहावेत, त्यापैकीं कोणाचे मूळ पुरूष शिकारी, कोणाचे मेंढके, कोणाचे शेतकरी, कोणाचे मुल्लाने, कोणाचे खिजमतगार, कोणाचे कारकून, कोणाचे बंडखोर, कोणाचे लुटारू व कोणाचे मूळ पुरुष तर हद्दपार केलेले राम्युलस आणि रीसस आढळतात. त्यातून कोणाचाही मूळ पुरुष पिढीजादा बादशहा अथवा राजा सांपडत नाहीं. आतां डारविनच्या मताप्रमाणें, एकंदर सर्व सूर्यमंडळांतील ग्रहभ्रमणक्रमास अनुसरून वानर पशूजातीचा पालट होऊन त्यापासून नूतन व विजातीय मानवप्राणी झाले असावेत, म्हणून म्हणावें, तर ब्रहादेवाचे अवयवांपासून उत्पन्न झालेल्या सृष्टीक्रमानुमत्तास बाध येतो. यास्तव आतां आपण बौद्ध अथवा जैन मताप्रमाणें जुगलापासून अथवा डारविनच्या मताप्रमाणें ब्राह्यणांच्या अवयवापासून चार जातीचे मानवी पुरुष मात्न निर्माण झाले असावेत, अशा प्रकारच्या सर्व निरनिराळया मतांविषयीं वाटाघाट करीत वसतां, त्यांतून कोणत्याहि एखाद्या मार्गानें मानवी स्त्नीपुरूष जातींचा जोडा अथवा जोडे निर्माण झाले असतील, व अशी कल्पना करून पुढें चालूं तर प्रथम जेव्हां स्त्नईपुरुष निर्माण झाले असतील, व अशी कल्पना करून पुढें चालूं तर प्रथम जेव्हां स्त्नीपुरुष निर्माण झाले असतील, तेव्हां त्यांस मोठमोठाल्या झाडांच्या खोडाशीं, त्यांचे ढोलींतील कंदमुळें व फळें यांवर आपले क्षुधेचा निर्वाह करावा लागला असेल व ते जेव्हां ऐन दुपारीं भलत्या एखाद्या झाडाच्या छायेखालीं प्रखरतर सूर्याच्या किरणांपासून निवारण होण्याकरितां क्षणभर विश्रांति घेत असतील, तेव्हां जिकडे तिकडे उंच उंच कडे तुटलेल्या पर्वत व डोंगरांच्या विस्तीर्ण रांगा, गगनांत जणूं काय, शुभ्र पांढर्‍या धुक्याच्या टोप्याच घालून उभ्या राहिलेल्या त्यांच्या दृष्टीस पडत असतील, तसेंच त्यांच्या खालच्या बाजूंनीं लहानमोठया दर्‍याखोर्‍यांच्या आसपास अफाट मैदानांत जुनाट मोठमोठाले विशाल वड, पिंपळ व फळभारानें नम्र झालेले फणस, आंबे, नारळी, अंजीर, पिस्ते, बदाम वगैरे फळझाडांचीं गर्दी होऊन, त्यांवर नानातर्‍हेच्या द्राक्षादि वेलींच्या कमानीवजा जाळीं बनून जागोजाग पिकलेल्या केळींच्या घडांसहित कमळें इत्यादि नानातर्‍हेचीं रंगीबेरंगी फुले लोंबत आहेत, त्यांच्या आसमंतात कमळें इत्यादि नानातर्‍हेचीं रंगीबेरंगी फुलें लोंबत आहेत, त्यांच्या आसमंतात जमिनींवर नानाप्रकारच्या पानांफुलांचा खच पडून त्या सर्वांचा भलामोठा चित्नविचित्न केवळ एक गालिचाच बनून त्यावर जागोजाग तर्‍हेतर्‍हेच्या पानांफुलांनीं घवघ्वलेलीं झाडें, जशीं काय आतांच नूतन लाविलीं आहेत कीं काय, असा भास झाला असेल. तसेंच एकीकडे एकंदर सर्व लहानमोठया झुत्न्या, खोंगळया, ओढे व नद्यांचे आजूबाजूचे वाळवंटांवर खरबुजें, टरवुजें, शेंदाडीं, कांकडया, खिरे वगैरे चहूंकडे लोळत पडलेले असून जिकडे तिकडे स्वच्छ निर्मळ पाण्याचे प्रवाह अखंडित खुळखुळ मंजुळवाणा शब्द करीत वहात आहेत. आसपास लहानमोठया तलावांच्या जलसमुदायांत नानातर्‍हेच्या चित्नविचित्न रंगांच्या कंमळांवरून भ्रमरांचे थव्याचे थवे गुंजारव करीत आहेत व जागोजाग तळयांच्या तटाकीं जलतंतू आपल्या आटोक्यांत येतांच त्यांना उचलून तोंडांत टाकण्याकरितां बगळे एका पायावर बकध्यान लावून उभे राहिले आहेत. शेजारचे अरण्यांत, जिकडे पहावें तिकडे जमिनीवरून गरीब बिचारीं हरणें, मेंढरें वगैरे श्वापदांचे कळपांचे कळप, लांडगे, व्याघ्र आदि करून दुष्ट हिंसक पशूंपासून आपाआपले जीव बचावण्याकरितां धापा देत पळत चालले आहेत. व
झाडांवर नानाप्रकारचें सुस्वर गायन करून तानसेनासही लाजविणारे कित्येक पक्षी, आपाआपल्या मधुर, कोमल स्वरानें गाण्यामध्यें मात करून चूर झाले आहेत, तों आकाशांत बहिरी ससाणे वगैरे घातक पक्षी त्यांचे प्राण हरण करण्याकरितां वरतीं घिरटया घालून, अकस्मात त्यांजवर झडपा घालण्याचें संधानांत आहेत, इतक्यांत पश्चिमेकडचा मंद व शीतल वायु कधीं कधीं आपल्या बायुलहरींबरोबर नानाप्रकारच्या फुलपुष्पांचा सुवासाची चहूंकडे बहार करून सोडीत आहेत. हें पाहन आपल्या बुद्ध, खिस्ती, मुसलमान, महार, ब्राह्यण वगैरे म्हणविणार्‍या मानच बांधवांच्या मूळ पूर्वजांस किती आनंद होत असेल बरें ! असो, परंतू त्यांस शस्त्नस्त्ने व वस्त्नेंप्रावणें तयार करण्याची माहिती नसल्यामुळें आपल्या दाढयाडोयांच्या झिपर्‍या जटा लोंबट सोडून हातापायांचीं लांब लांब नखें वाढवून निब्बळ नागचें रहावे लागत असेल नाहीं बरें ! ज्यांस मातीचीं अथवा धातूंचीं भांडी करण्याची माहिती नसल्यामुळें, पाण्याच्या कडेल गुडघेमेटी येऊन जनावरांप्रमाणें पाण्याला तोंड लावून अथवा हाताचे ओंझळींने पाणी पिऊन आपली तहान भागबाबी लागत नसेल काय ! ज्यांस तवे व जातीं घडण्याची माहिती नव्हती, अशा वेळीं भाकरीचपातीची गोडी कोठून ! ज्यांस मेंढराढोरांचीं कातडी काढण्याची माहिती किंवा सोय नसल्यामुळें अनवाणी चालावें लागत नसेल काय ? ज्यास बिनचूक शंकर अंकही मोजण्याची मारामार त्यास सोमरसाचे तारेंत यज्ञाचे निमित्तानें गायागुरें भाजून खाण्याची माहिती कोठून ? सारांश तशा प्रसंगी ते इतके अज्ञानी असतील कीं, जर त्यांचे समोर कोणीं भंड व धूर्तांनीं ताडपत्नावर खोदून लिहिलेल्या वेदाप्रमाणें एखादें पुस्तक आणून ठेविलें असतें तर, त्यांनीं तें हातांत घेऊन पाहतांच त्यांत कांहीं सुवास व रस नाहीं असें पाहून त्याची काय दशा केली असती, याविषयीं आतां आमच्यानें तर्कसुद्धां करवत नाहीं. कारण ते स्वतः फलाहारी असल्यामुळें या निशाचरांनीं केलेल्या वेदमतानुसार सोमरसाचे नादांत अगर पक्षश्राद्धाचे निमित्तानें दुसर्‍यांच्या गाया चोरून मारून त्यांच्यानें खावविल्या नसत्या, आणि तसें करण्याची त्यांस गरजही नसेल. कारण ते इतके पवित्न असतील कीं, त्यांना या सर्व मतलबी ग्रंथकारांस आपले वंशज म्हणण्याचें आवडलें असतें काय ? त्यांच्यापुढें यांच्यानें " तूं बुद्ध "," तूं खिस्तो ","तूं मुसलमान "," तूं महार म्हणून नीच " व " आम्ही ब्राह्यण म्हणून उंच आहोत " असें म्हणण्याची जुरत तरी झाली असती काय ? असो, पुढें कांहीं काळ लोटल्यावर आपल्या मूळ पूर्वजांची संतति जेव्हा जास्त वाढली, तेव्हां त्यांनीं आपल्या नातूपणतूस रहाण्याकरितां झाडांच्या फांद्यांचीं आढीमेढी उभ्या करून त्यावर नारळीच्या त्यांच्या भोवतालीं चोगर्दा बाभळी अथवा करवंदीच्या फांटयांचें कुंपण व आंत जाण्याच्या रस्त्यावर एक झोपा अथवा कोरडया दगडांचा गांवकुसू करून त्याला एक वेस ठेवून तिकडून रात्नीस रानांतलीं  दुष्ट जनावरें आंत येऊं नयेत, म्हणून तेथें त्यांनीं रखवालीकरितां वेसकर रक्षकांच्या नेमणुका केल्यावरून आंतील एकंदर सर्व गांवकरी लोक आपापल्या मुलांबाळांसह सुखांत आराम करूं लागले असतील व यामुळेंच आपण सर्व गांवकरी हा काळपावेतों आपाआपल्या गांवांतील वेसकरांच्या श्रमाबद्दल दररोज सकाळीं व संध्याकाळीं त्यांस अर्ध्या चोथकोर भाकरीचे तुकडे देतों ; आणि त्याचप्रमाणें हल्लीं आपण सर्व गांवकरी लोक एकंदर सर्व पोलीसखात्यांतील शिपायांसहित मोठमोठया कामगारांम भाकरीच्या तुकडयाऐवजीं पोलिसफंड देतों कां नाहीं बरें ? या उभयतांत अंतर तें काय ? महाराचे हातांत काठीदोरी व पोलीसचे हातांत वाद्यांचीं टिककोरीं, असो, इतक्यांत सदरच्या गांवीं त्यांच्यांत मुलाबाळांच्या क्षुल्लक अपराधावरून आपआसांत तंटेबखेडे उपस्थित झाल्यावरून व गांवातील सर्व लहानमोठे वडील जवळपास एखाद्या पाराचे छायेखाली बसून न्यायांतीं गुन्हेगारास शिक्षा करीत असतील. कारण त्या वेळीं आतांसारखें मोठमोठालीं टाऊनहालें अथवा चावडया बांधून तयार करण्याचें ज्ञान त्यांस कोठून असेल ? परंतु पुढें कांहीं काळानें त्या सर्वांचीं कुटुबे जसजशीं वाढत गेलीं असतील. तसतसें त्यांच्यांत सुंदर स्त्नियांच्या व जंगलांच्या उपभोगाच्या संबंधानें नानाप्रकारचे वादविवाद वारंवार उपस्थित होऊं लागले असतील व ते आपसांत जेव्हां गोडीगुलाबीनें मिटेनात, तेव्हां त्यांपैकीं वहुतेक सालस गृहस्थांनीं आपआपलें सामानसुमान व तान्हीं मुलें पाटयांत घालून एकंदर सर्व आपल्या जथ्यांतील स्त्नीपुरुषांस बरोबर घेऊन दूर देशीं निरनिराळे अंतरावर जाऊन जिकडे तिकडे गांवें बसवून त्यांत मोठया सुखानें व आनंदांत राहूं लागल्यामुळें, प्रथम ज्या ज्या गृहस्थांनीं हिव्या करून आपआपल्या पाटया भरून दूरदूर देशीं जाऊन गांवें वसविलिं, त्या त्या गृहस्थांस बाकी रार्व गांवातील लोक पाटील अथवा देशमुख म्हणून, त्यांच्या आज्ञेंत वागू लागले. व हल्लीचे अज्ञानी पाटील व देशमुख जरी भटकुळकर्ण्यांचे ओंझळीनें पाणी पिऊन गांवकरी लोकांत कज्जे लढवितात, तरी एकंदर सर्व गांवकरी, त्यांच्या सल्लामसलतीनेंच चालतात, दुसरें असें कीं, आपल्यामध्यें जेव्हा सोयरीकसंबंध करण्याचा प्रसंग येतो, तेव्हा आपणांस एकमेकांत विचारण्याची वहिवाट सांपडते.

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP