मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|शिवाजी राजांचा पोवाडा| भाग ६ शिवाजी राजांचा पोवाडा भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ६ शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले. Tags : mahatma jyotiba phulepovadaपोवाडामहात्मा ज्योतिबा फुले भाग ६ Translation - भाषांतर सर्व तयारी केली राजपद जाडी नांवास ।शिक्का सुरु मोर्तबास ॥अमदानगरी नटून पस्त केलें पेठेस ।भौती औरंगाबादेस ॥विजापूरची फौज करी बहुत आयास ।घेई कोकणपटीस ॥सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस ।ठोकून घेई सर्वास ॥जळीं फौज लढे भौती मारी गलबतास ।दरारा धाडी मक्केस ॥माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस ।पुकारा घेतो मोगलास ॥जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास ।लुटलें बारशिलोरास ॥जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास ।लुटलें मोंगल पेठांस ॥पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटीस ।आज्ञा जावें रायगडास ॥स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास ।निघाला मुलखीं जायास ॥मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास ।लागले अखेर कडेस ॥औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास ।दुसरे दिलीरखानास ॥ठेविले मोगल अमीर येऊन पुण्यास ।वेढिलें बहुतां किल्ल्यांस ॥मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस ।सुचेना कांहीं कोणास ॥बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास ।सोडिलें नाहीं धैर्यास ॥हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस ।संभाळी पुरंधरास ॥चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस ।फुरसत दिली शिवाजीस ॥फार दिवस लोटले पेटला खान ईर्षेस ।भिडला किल्ल्या माचीस ॥दुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडायास ।योजी अखेर उपायास ॥हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास ।पिडींले फार मोगलास ॥मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्विस ।चुकले सावधपणास ॥यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस ।चुकले सावधपणास ॥हेटक-यांचा थाट नीट मारी लुटा-यास ।मोगल हटले नेटास ॥बाजी मावळयां जमवी हातीं घेई खांडयास ।भिडून मारी मोगलास ॥मोगल पळ काढी पाठ दिली मावळयास ।मर्द पाहा भ्याले ऊंद्रास ॥लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस ।धीर काय देई पठाणास ॥सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास ।जाऊन भिडला मावळयास ॥बाजी मार देई पठाण खचले हिमतीस ।हटती पाहून मर्दास ॥पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास ।लावीला तीर कमानीस ॥नेमाने तीर नारी मुख्य बाजी परभूस ।पाडिला गबरु धरणीस ॥सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस ।भोगिती स्वर्गी मौजेस ॥बाजी स्वर्गी बसे मावळे हटले बाजूस ।सरले बालेकिल्ल्यास ॥मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस ।धमकी देती मावळयास ॥हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस ।वरती इशानी कोणास ॥वज्जगडाला शिडी लाविली आहे बाजूस ।वरती चढवी तोफांस ॥चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास ।आणले बहु खरावीस ॥हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास ।मोगल भ्याला पाऊसास ।मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस ।घेती यवनी मुलखास ॥कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास ।पाठवि थैलि शिवाजीस ॥शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस ।नजरकैद करी त्यास ॥धाडी परत सर्वं मावळें घोडेस्वारांस ।ठेविलें जवळ पुत्रास ॥दरबा-या धरीं जाई देई रत्न भेटीस ।जोडिला स्नेह सर्वांस ॥दुखणे बाहणा करो पैसा भरी हाकीमास ।गूल पाहा औरंगजीवास ॥आराम करुन दावी शुरु दानधर्मास ।देई खाने फकीरास ॥मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस ।जसा का मुकला जगास ॥दानशूर बनला हटवि हातिमताईस ।चुकेना नित्यनेमास ॥औरंजीवा भूल पडली पाहून वृत्तीस ।विसरला नीट जप्तीस ॥निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास ।चढला मोठया दिमाखास ॥जलदी करीती चाकर नेती टोकरास ॥करामत केली रात्नीस ॥दिल्ली बाहेर गेले खुलें केलें शिवाजीस ।नेली युक्ती सिद्वीस ॥मोगल सकाळी विचकी दांत खाई होटांस ।लावि पाठी माजमास ॥॥चाल॥औरंगजीवा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥मधीच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥माते चरणी लागला । हळूच फोडी शत्रूला ॥स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥॥चाल॥हैद्राबादकर । विजापूरकर ॥कापे थरथर । देती करभार ॥भरी कचेरी । बसे विचारी ॥कायदे करी । निट लष्करी ॥शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा ।बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥वेढा घालून जेर केला सिद्दी जंजि-याचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP