बालाजी माहात्म्य - भाग ५

ब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आहे.


त्यावर श्रीनिवास म्हणाले:- “ बकुळमालिके मी तेच तुला सांगतो. श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी जी हकीकत सांगतो तीच तू ऐक
त्रेतायुगात मी जेव्हां रावणाचा वध केला तेव्हां वेदवती कन्येने लक्ष्मीला सहाय्य केले होते. ती लक्ष्मी राजा जनकाला सीतेच्या रुपाने भूमीपासून प्राप्त झाली. आम्ही वनवासात असताना मारीच मृगाला मारण्यासाठी म्हणून मी आश्रमाचे बाहेर पडलो असतांना सीतेच्या सांगण्यावरुन लक्ष्मणपण माझ्या पाठोपाठ आश्रमाबाहेर पडला. आम्हां दोघांची अनुपस्थिती पाहून राक्षस रावण सीतेच हरण करण्याच्या हेतूने कपट वेष धारण करुन तेथे येऊन पोहोचला. तेवढ्यात अग्निदेवांनी रावणाच्या हा कपट हेतू अळखून झटकन त्यांनी सीतेला उचलून पाताळात नेले व तिच्या ऐवजी यापूर्वी रावणाने स्पर्शिलेली पण नंतर अग्निमध्ये प्रवेश करुन शुद्ध झालेल्या वेदवतीस सीतेसारखे रुप देऊन तेथे आणुन ठेवले.
तिचेच मग रावणाने हरण केले. व त्याचा वध झाल्यानंतर तिने अग्निप्रवेशकेला त्यावेळी अग्निदेवांनी माझ्या हातात. लक्ष्मी म्हणजेच माझी प्रिय जानकी हिचे हात दिला. व ते मला म्हणाले की “ हे रामचंद्रा सीतेचे कल्याण करणारी ही वेदवती आहे. सीते ऐवजी तीच लंकेत सीतेच्या रुपाने बंदिवान होऊन पडली होती. तिला आता आपण वरप्रदान करा. सीतेने पण मला नेहमी प्रसन्न ठेवणारी वेदवती हीच आहे. तिलाही पण आपण वर द्या असे मला सांगितले.
तेव्हां मी म्हणालो “ हे देवी ! कलियुगात असेच घडून येईल तोपर्यंत आपण ब्रह्मलोकांतच निवास करा. नंतर आपण भूमीकन्या होऊन आकाशराजाची राजकुमारी व्हाल ” मी व लक्ष्मीने यापूर्वीच सुंदरीस वरदान दिलेले होते. तीच वेदवती श्री पद्मावती या नावाने जन्मास आली आहे माझे वचन खरे व्हायचे असेल तर तिचेशी माझा विवाह झाला पाहिजे. पद्मावतीचा जन्मवृत्तांत ऐकून बकुलादेवीला भारी आनंद झाला. व असे जर आहे तर मी पद्मावतीला पाहण्यासाठी तिच्याकडे जरुर जाईन असे ती म्हणाली.
बकुलादेवीचे बोलणे ऐकून श्रीनिवासांना धीर आला व मग त्यांनी स्वस्थचित्ताने भोजन केले.
ठरल्याप्रमाणे बकुलादेवी अश्वरुढ होउन पद्मावतीकडे निघाली सुवर्णमुखी नदी ओलांडून ती अगस्ती ऋषीच्या आश्रमात आली. तेथे असलेल्या शिवालयात पद्मावतीच्या सख्यांना पाहून तिने त्यांच्याकडे तुम्ही कोण कोठल्या ” वगैरे चौकशी केली तेव्हां त्या म्हणाल्या आम्ही पद्मावतीच्या सख्या आहोत. परंतु तुम्ही कोण व कशासाठी येथे आला आहात ते कळविल्यास आम्ही अंतःपुरात जाऊन तुमच्या बदल राणीकडे माहिती देऊ. तेव्हां बकुलादेवीने स्वतः बद्दलची माहिती सख्यांना सांगण्यास सुरवात केली.
जेव्हां रामाने वानरसेनेसह लंकेवर चाल केला तेव्हां सीतेची रावणा पासून सुटका झाली. रावणासहित इतर राक्षसाचा पण नाश झाला. व नंतर विभिषण गादीवर आला. व त्यांनी वेदवतीच्या रुपात असलेली सीता अशोकवनातून सोडवून आणली. परंतु जनमताप्रमाणे रामानी सीतेचे पातिव्रत्य खरे आहे जाणण्याकरीता सीतेला अग्निप्रवेश करण्यास सांगीतला व तीने वेदवती खरी अशोकवनात असून सीतेला अग्निदेवानी नेल्याचे सांगीतले व वेदवतीने अग्नित उडी घेतल्यावर अग्निची स्वतःचीच मुलगी म्हणून तेला काहीही त्रास झाला नाही. म्हणुन सीतेने वेदवतीला जो अशोकवनात त्रास झाला तो पाहून रामानी वेदवतीची प्रशंसा करुन रामावतारात एकपत्नीव्रत घेताल्यामुळे कलीयुगात वेदवती आकाशराजाची मुलगी बनून मी स्वतः विष्णु बनून तिच्याशी लग्न करीन अशी सर्व हकिकत बकुलमालिकेने तिच्या सख्यांना सांगीतली. व हे सर्व पूर्वजन्मी मी बकुलादेवीचे श्री भगवान विष्णूची माता बनून व पद्मावती विवाह त्यांच्या बरोबर लावून देण्याकरीता ह्या जन्मी बकुलमालीका म्हणून जन्म पावले आहे. पूर्वजन्मीची सेवा अश्या तर्‍हेने पूरी करण्याचे भाग्य मला लाभते आहे. असे सांगून मी राणी धारणादेवीला भेटावयास आले आहे असा निरोप तुम्ही पोहोचता करा, म्हणून सांगीतले.
अश्या तर्‍हेने वेदवतीची सर्व हकीकत ऐकून व ह्याजन्मी वेदवती हिच पद्मावती आहे असे समजून श्रीनिवास तिला भेटण्यास आले. व त्याच्या तपोसामर्थ्यानी त्यांना हिच पद्मावती आहे असे समजले परंतु तिच्या सख्यांनी कोणी शिकारी समजून त्यांना दगडांनी प्रहार करुन पळवून लावले परंतु हे सर्व कपट माहित असून सुद्धा श्रीनिवासांनी शिकारी वेषात पद्मावतीला पहाण्यास जाण्यास काय हेतू होता त्यांना प्रत्यक्ष जावून मागणी घालून लग्न करता येण्यासारखे होते परंतु हि चाल त्यांनी खेळुन पाहिली परंतु ती फसल्यामुळे त्यांनी हि सर्व हकीकत बकुलमालीकेला सांगून व तिकडे पद्मावतीकडे जावून त्यांचे लग्न ठरवून येण्याबद्दल विनंती केली. तेव्हां बकुलमालीकेला कळले की त्याकरीता श्रीनिवास वैकुंठ सोडून इथे ह्या कारणास्तव रहावयास आले व हे नाटक खूप लांब चालणार नाही लवकर लग्नरुपात संपेल असे सांगीतले.
लवकरच मी तुम्हां दोघांना वधुवराच्या रुपात पाहिन व ह्याजन्मी तरी तुमच्या जागी मी तुमची आई बनुन आकाशराजाकडे आपल्याकरीता मागणी घालण्यास जाईन म्हणून सांगीतले. व आकाशराजाकडे जाण्याकरिता आकाशराजाचे प्रमुख गाव नारायणपूरला कसे जावयाचे रस्ता कोणता म्हणून विचारले.
ह्या डोंगराच्या खाली उतरुन कंपीलेश्वर स्थानात करुन तु लवकरच आकाशराजाच्या राज्यात पोंहोचशील व वाटेत तुला कोणीही राजाच्या रस्ता दाखवेल म्हणून उत्साहित होऊन श्रीनिवास बोलले. न बकुळमालिका जाण्याची तयारी करुन निघाली.
ती गेल्यानंतर श्रीनिवासांनी एक क्षणभर विचार केला की आकाशराजानी आपल्याला दाखवायला सांगीतले तर आपण तेथे इजर रहाणे आवश्यक आहे असे समजून व पद्मावतीची खुशाली जाणून. घेण्याकरीता श्रीनिवासानी जोतिष्यीचे रुप घेतले व ब्रह्मदेवाला मुलाचे रुप घ्यायला सांगीतले. व दोघे नारायणपूराच्या गल्लीबोळातून हिंडून ज्योतिष्य पाहीचचे कां? आई माय बाप ऽऽऽ म्हणुन ओरडून हिंडू लागले.
पद्मावतीची स्थिती
पद्मावती ज्यावेळेस महालात पोहोचली तेव्हां तिला नारदानीं बोलून आपण पाहिलेला नवयुवकच श्रीनिवास आहेत हे समजले. व आपल्या सख्यांनी त्यांना दगडांनी मारहाण केलेली तिला पाहावली नाही. व ती बेशुद्ध होऊन पडली.
तीच्या सख्यांनी बरीच शुश्रुषां करुन तिला महालातल्या अतःपुरात आणुन ठेवले परंतु ती शुद्धीवर आल्यावर तिला सर्व ठिकाणी सुंदर असा श्रीनिवासच दिसालया लागला. त्यांचे वर्णन करणेच कठिण ज्याचा रंग श्यामल आहे. ज्याचा सुंदर चेहरा कमळासारखे मुख असे तिला त्याचे मुखकमल वारंवार दिसु लागले तत्क्षण ती पुन्हां जमीनीवर पडली तिचे खाण्यापिण्यात लक्ष लागेनासे झाले. तिला कोणत्याही गोष्टी रसहिन वाटू लागल्या तिला वारंवार त्याच्या आठवणी येऊन सर्वकाही नकोसे वाटू लागले. व ती गप्प गप्प राहू लागली.
आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून तिची आई राणी धरणीदेवी तिला तिच्या तब्बेती विषयी चिन्ता वाटू लागली. तिने अनेक राजवैद्यांना बोलवले व औषधपाणी केले परंतु कुणाचा इलाज चालेना तिच्यावर काय जादूटोणा झाला व ती आजारी पडली तेच कोणाला कळेनासे झाले. धरणीदेवीने कपिलेश्वराचे दर्शन घेऊन नवस केला माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारे बरे वाटू दे. असे करता करता रोज आकाशराजा कपिलेश्वर तिर्थस्थानास जाऊन स्वतःहाच्या मुली करीता देवाजवळ बरी करण्याची भिक मागत असे असे असतानांच एक दिवस तिच्या सख्यानी धांवत येऊन एक बातमी राजाला दिली की. गावांत एक ज्योतिषीण आली आहे तिला विचारुन पाहिल्यास काय आहे. ते कळू शकेल ते ऐकल्यावर राणीने लगेच त्या ज्योतिषीणीला बोलवणे पाठवले व ज्योतिषीण दरबारात आली तेव्हा राणीने सूपभर मोती आणून तिच्या पुढे ठेवले ते पाहून ज्योतिषीणीने आई मला हे कशाला माझ्या मुलाला थोडेफार खायला द्या म्हणून सांगीतले तेव्हां राणीने दासीकरवी खायला आणून दिले. नंतर खाऊनपिऊन ती ज्योतीष सांगायला तयार झाली. व तिने गाणे रुपी कथा सांगीतली खाली दिली आहे.
ताई, शंकरी लवकर ये !
गौरीदेवी ! आज तुझे भविष्य सांगते !
माझ्या तोडांत चुकून खोठे सांगीतले जात नाही.
जे सांगणार ते खरे ठरणार !
प्राणप्रिय मुली तुझ्या मनांतली गोष्ट सांग !
तुला कोणते दुःख सतावते ते आम्ही सांगतो !
आई ! तुमची मुलगी खाणेपीणे करीत नाही. रात्रभर झोपत नाही आणि माझी गोष्ट खोटी असेल तर तसे सांग महादेवीला खोटे सांगू नको.
रोग नाही तब्बेत छान आहे.
मुलीची तब्बेत अगदी उत्तम आहे.
परंतु मुलीची मनःशांती ठिक नाही !
नंदनवनांत तिने एका नवयुवकाला पाहिले आहे.
तो दूसरा कोणी नसून स्वःत श्री भगवान विष्णु आहे.
तो लवकरच इथे येईल तेव्हां त्याचे लग्न राजकुमारीशी
लवकर लावून देणे योग्य त्याकरीता एक म्हातारी येथे येईल.
तिचा चांगला आदर सत्कार करुन तिची गोष्ट मानून घेणे योग्य.
नंदवनाचा स्वामी कृष्ण देवकीचा मुलगान इंद्र आणि चंद्र यांचे त्याला हात अद्वितीय आहेत. तो पराक्रम शाली आहे. त्याची माहिती सांगायला एक म्हातारी येथे येत आहे.
लगेच धरणीदेवीने पद्मावतीच्या सख्यांना हि गोष्ट खरी आहे कां. विचारले तेव्हां त्यांनी हो म्हणताच धरणीदेवीने ज्योतिषिणीला एक जरीची साडी देऊन तिची पाठवणी केली.
बकुलादेवीचे आगमन
बकुलादेवी श्रीनिवासाच्या सांगण्याप्रमाणे कपिलतीर्थाच्या खाली उतरुन गावात प्रवेशती झाली तेथे असलेल्या पुष्करणीमध्ये स्नान करुन खाऊन पिऊन आराम करताच तिला बरे वाटले. तिथेच तिला कोणी रस्ता दाखवण्यास मिळतो कां म्हणून ती चौफेर पाहू लागली तेव्हां तिला जवळच्याच मंदिरात बरीच माणसे ये जा करीत असलेली दिसली तेव्हां तिने जवळ जाऊन गावाबषर्या चौकशी करायला सुरवात केली. तिने काही बायकांना विचारले तेव्हां त्याच्या कडून राजकुमारीची तब्बेत ठिक नसल्याचे तिला समजले. ताबडतोब तिने देवाजवळ तिच्या तब्बेत ठिक होण्याविषयी याचना केली.
बकुलादेवीने राणी धरणीदेवीला भेटण्याची इच्छा त्या कडे प्रदर्शीत केली. त्यांनी तुम्ही त्याच्यां नान्यातल्या आहात कां म्हणुन विचारणा केली तेव्हां तिने हो म्हणुन सांगीतले. त्या बायका पद्मावतीच्या सख्यांच होत्या.
त्यांनी बकुलमालिकेला स्वतःबरोबर येण्याची विनंती केली. व आम्ही आपल्याला राणी धरणीदेवीचे दर्शन करवतो म्हणून सांगीतले तेव्हा बकुळमालिकेला धीर आला आता आपले कार्य साध्य होणार अशी आशा तिला आली. त्यांनी सर्वांनी अंतःपुरात प्रवेश केला व राणीकडे निरोप पोहोचवीला की. आपल्या भेटीसाठी एक म्हातारी आली आहे. तेव्हां धरणीदेवीला ज्योतिषीणीने सांगीतलेल्या गोष्टीची आठवण झालीं व तिने तुरंत भेटीसाठी म्हातारीला आत घेऊन येण्याविषयी दासीनां सांगीतले. आत पोहोचल्यावर धरणीदेवीनी म्हातारीला येण्याचे कारण विचारले तेव्हां तिने सर्व हकीगत सविस्तर सांगण्यास सुरवात केली.
मी एक अत्यंत आनंददायी कामा करीता आले आहे माझा मुलगा वेणुगोपाल आहे. त्याच्या करीता आपल्या पद्मावतीला मागणी घालण्याकरीता मी आले आहे. माझ्या रुपरंगावर गरिबीवर आपण जाऊ नका माझा मुलगा सर्वगुणसंपन्न आहे सुंदर आहे. चंद्रसूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्याचे कुलगोत्र सर्व चांगले आहे. तो तो खूप शूर साहसी आहे. त्याच्या हातुन हिरण्याक्ष दशकंठरावणाचा अन्त झाला आहे. पूर्वजन्मीच्या कारणास्तव तो आपल्या पद्मावतीशी विवाह करु इच्छित आहे. असे आलेले चांगले स्थळहातचे घालवून देऊ नका.
हे ऐकून धरणीदेवीचे मन चिंताग्रस्त होऊन गेले. तिला काय करायचे सुचेनासे झाले. तिला खरेच आहे की. नाही याची काळजी वाटू लागली. परंतु ज्योतिषीणीने सांगीतल्या प्रमाणे सर्व घडत असल्यामूळे तिला धीर आला व तिने म्हातारीला बसवून राजाकडे विचारावयास गेली.
आकाशराजाचे विचार:- आकाशराजानी सर्व वृत्तांत ऐकला व तो कुलगुरुना सांगीतला “ हे गुरुदेव ! माझ्यामुलीला सर्वगुणसंपन्न असा वर कुठे मिळेल मी त्याच्या शोधार्थ आहे थोड्या दिवसापूर्वी नंदनवांतएका वृद्ध ब्राह्मणाने पद्मावतीचा हात पाहिला व तिला वरण्याकरीता साक्षात श्रीमन्नारायण स्वामी येणार असल्याचे सांगीतले
तेवढ्यात एक म्हातारी येऊन सांगत आहे. की तिचा मुलगा म्हणेच राम कृष्णसारखा आहे व त्याच्याशीच आपल्या मुलीचे लग्न लावून देणे योग्य होईल. ऐकीवात आहे की, खुद्द वैकुंठवासीच आजकाल तिरुपति पर्वतात येऊन रहात आहे. तरी असे असतांना आपणच मी काय करावे ते सांगावे ”
सर्व देवदेवतांचा गुरु सर्व कालांमध्ये पारंगत बुद्धिशाली चतुर असा बृहस्पती थोडावेळ विचार करीत राहिले. व फिरुन राजाला म्हणाले “ हे राजा ! कपट करणार्‍याचे सगळेच विचीत्र असे असते कोंणाला काय समजून येणार. पूर्वकाळी खांब झालेल्या नृसिंहाला आतांच्या वारुळाज्ञालेल्या देवाला कोणतीही गोष्ट करुन दाखविणे आश्चर्याची गोष्ट नाही. एकदा आपण खूप विचार करुन पहा की. पद्मावती तरी आपल्याला कशी मिळाली. जसे त्रेतायुगात जनक राजाला जानकी मिळाली तरी मी विचारकरतो की. ही स्वतःतर महालक्ष्मी नसावी विष्णुच्या शिवाय तिला दुसरा कोणताच वर योग्यतेचा नाही. प्रथम आपण लक्ष देऊन पाहिले पाहिजे की. तिरुपती पहाडावर वारुळात रहाणारा कोण आहे? तरी तिरुपती पहाडाजवळ शुकमहर्षी रहतात. तरी त्याच्या कडून घेण्यास सोपे जाईल तरी आपण शुकमहर्षीच्या कडे जाऊन विचारावे.
आकाशराशानी आपल्या छोट्या भावाला तोंडमानला आज्ञा केली तेवढ्यात शुकमहामुनी तेथे येऊन पोहोचले. त्यांनी अत्यंत आनंदानी आकाशराजाला भेट दिली त्याच्याकडुन राजाला तिरुपतीपहाडावर जे निवास करीतात ते खूद्द श्री भगवानविष्णू असल्याचे समजले. व व त्यांना त्या अत्यंत पवित्र स्थळी इतर अगस्त व इतर मुनीपण तपश्चर्या करीत असत असे देवदेवतागण जाऊन येऊन असल्याचे कळले.
तेव्हां एक आकाशवाणी झाली “ सारा आसंमत आनंदीत झाला. साक्षात लक्ष्मी आपली मुलगी झाली व नारायण आपले होणाऐ जावई आहेत तेव्हां लवकरात लवकर चांगला मुहूर्त पाहून त्या दोघांचे लग्न लावून देणे चांगले होईल. ” अशी आकाशवाणी राजाने ऐकली तेव्हां राजाने सर्व मंत्रीमंडळ बोलावून दरबार भरवीला सर्वएकमत होऊन पद्मावतीचे लग्नाकरीता चांगला मुहूर्त काढू लागले लग्नपत्रिका  पाहून लिहून तयार ठेवली. व ती शुकमुनीच्या हाती देऊन आकाशराजानी ती नेऊन श्रीनिवासांना देण्यास पहाण्यास सांगीतली
तेव्हां शुकांनी राजाची जाण्यासही अनुमती घेऊन बकुलादेवीला बरोबर घेऊन तिरुपती पहाडावर गेले.

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP