मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|ऑगस्ट मास| ऑगस्ट १० ऑगस्ट मास ऑगस्ट १ ऑगस्ट २ ऑगस्ट ३ ऑगस्ट ४ ऑगस्ट ५ ऑगस्ट ६ ऑगस्ट ७ ऑगस्ट ८ ऑगस्ट ९ ऑगस्ट १० ऑगस्ट ११ ऑगस्ट १२ ऑगस्ट १३ ऑगस्ट १४ ऑगस्ट १५ ऑगस्ट १६ ऑगस्ट १७ ऑगस्ट १८ ऑगस्ट १९ ऑगस्ट २० ऑगस्ट २१ ऑगस्ट २२ ऑगस्ट २३ ऑगस्ट २४ ऑगस्ट २५ ऑगस्ट २६ ऑगस्ट २७ ऑगस्ट २८ ऑगस्ट २९ ऑगस्ट ३० ऑगस्ट ३१ समाधान - ऑगस्ट १० महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल . Tags : brahmachaitnya maharajgondavaleparamarthaगोंदवलेपरमार्थब्रह्मचैतन्य महाराज अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत । हाच माझा परमार्थ ॥ Translation - भाषांतर ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥ जो झाला रामभक्त । तेथेंच माझा जीव गुंतत ॥ मला रामभक्तावीण कांहीं । सत्य सत्य जगीं कोणी नाहीं ॥ जीवाचें व्हावें हित । हाच मनाचा संकल्प देख ॥ तुम्हांस सांगावें कांहीं । ऐसें सत्य माझेजवळ नाहीं ॥ पण एक सांगावें वाटतें चित्ती । रघुपतीवीण शोभा नाहीं जगतीं ॥ मुलगी सासरीं गेली । तिची काळजी सासरच्यांला लागली । तैसें तुम्ही माझे झालां । आतां काळजी सोंपवावी मला ॥ सदा राखा समाधान । हाच माझा आशीर्वाद पूर्ण ॥ मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनीं विश्वास । आनंदानें राहावें जगांत ॥ अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥ व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाहीं दूर केला ॥ राम सखा झाला । नामीं धन्य मला केला ॥ मीं तुम्हांस म्हटलें आपलें । याचें सार्थक करुन घेणें आहे भलें ॥ नामापरतें न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥ माना माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥ मी असो कोठें तरी । मी तुम्हांपासून नाहीं दूर । याला साक्ष रघुवीर ॥ तुमचे आनंदांत माझें अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावें अप्रमाण ॥ तुम्ही माझे म्हणवितां । मग दुःखी -कष्टी कां होता ? ॥ उपाधिवेगळे झालां । ऐसे ऐकूं द्यावें मला ॥ माझें ज्यानें व्हावें । त्यानें राम जोडून घ्यावें ॥ दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीहि अपवाद नाहीं खास ॥ शेवटीं मागणें तुम्हां एकच पाहीं । नामावांचून दूर कधीं न राहीं ॥ अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत । नामीं प्रेम फार । त्याला राम नाहीं दूर ॥ मी सांगितल्याप्रमाणें वागावें । राम कृपा करील हें निश्चित समजावें ॥ आतां आनंदानें द्यावा निरोप । हेंच तुम्हां सर्वांस माझें सांगणें देख ॥ सदा राहावें समाधानीं । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश । हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी , मी तुम्हांपासून नाहीं दूर ॥ सर्वांचें करावें समाधान । जें माझे प्राणाहून प्राण जाण ॥ सर्वांनी व्हावें रामाचें । हाच माझा आशीर्वाद घेई साचें ॥ जगाचें ओळखावें अंतःकरण । तैसें आपण वागावें जाण ॥ नामापरतें दुजें न मानावें । एका प्रभूस शरण जावें ॥ हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥ विवेक -वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥ अखंड घडो भगवदभक्ति । आत्मज्ञानप्रतीति । ब्रह्मस्वरुपस्थिति । नामीं निरंतर जडो वृत्ति ॥ मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥ सुखानें करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥ N/A References : N/A Last Updated : September 01, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP