मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|मार्च मास| प्रपंच मार्च मास प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच प्रपंच मार्च ३० - प्रपंच महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. Tags : brahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेप्रपंचब्रह्मचैतन्य महाराज ज्या घरात शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥ Translation - भाषांतर गृहस्थाश्रमासारखा आश्रम । दुसरा नाही खास ॥ नीतीधर्माचे रक्षण । यासाठीच विवाहाचे कारण ॥ ज्या घरात राहते शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥ कृतीवर मनुष्याची परीक्षा । जैसी वासावर पदार्थाची परीक्षा ॥ कोणाचा न करावा घात । ऐसे वागावे जगात । आपले आपण करुन घ्यावे हित । त्यालाच म्हणतात संभावित ॥ न कधी व्हावे आपण निराश । व्यवहार हात देईल खास ॥ व्यवहारातील करावा प्रयत्न । प्रपंचात न पडू द्यावे न्यून ॥ रोगाची भीति । न ठेवावी चित्ती ॥ रोगाला उपचार करावे जरी बहुत । तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त ॥आप्त इष्ट सखे सज्जन । यांचे राखावे समाधान । परि न व्हावे त्यांचे अधीन ॥ सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥ आपलेपणा ठेवला जेथे । प्रेम लागत असे तेथे ॥ ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले । तेथे समाधानाचे मान कमी झाले ॥ मन राखता आले । तरच प्रत्येकाला सुख लागले ॥ सुखाने नांदावे नवरा-बायकोंनी । राम आणावा ध्यानी ॥ दोघांनी रहावे प्रेमाने । सदा वागावे आनंदाने ॥ एकमेकांनी दुसर्यास दु:ख होईल असे न करावे । काळजी वाटेल असे न वागावे ॥ घरांतील माणूस मार्गाने चुकले । त्यास प्रायश्चित हवे खरे । पण ते नसावे जन्माचे । तेवढ्यापुरते असावे साचे ॥ एखाद्याचे हातून करु नये असे कर्म झाले । तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे ॥ आचरण शुध्द असावे । एकपत्नीव्रत सांभाळावे । प्राण गेला तरी परद्वार करु नये ॥ कोणतेही व्यसन करु नये । नीच संगत धरु नये ॥ भलते काम करु नये ॥ गृहछिद्र कोणा सांगू नये । आपला बोज आपण घालवू नये । विश्वासघात कोणाचा करुं नये ॥ परदु:खे हसू नये । देहदु:खे त्रासू नये । केला उपकार बोलूं नये ॥ मुलाबाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात कधी उदास न व्हावे ॥ प्रेमाने वागावे सर्वांशी । सुख राहे नि:स्वार्थापाशी ॥ आईवडिलांची आज्ञा पाळावी । चांगल्याची संगत धरावी ॥ अभ्यासांत लक्ष ठेवून राहावे । भगवंताचे नामस्मरण करावे ॥ नामापरते न माना दुजे साधन । जैसे पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरते न मानावे सत्य । ज्याने राम होईल अंकित ॥ हेच साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥ N/A References : N/A Last Updated : May 19, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP