मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास| नाम जानेवारी मास नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम नाम जानेवारी १० - नाम महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल. Tags : brahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेब्रह्मचैतन्य महाराज नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥ Translation - भाषांतर संसारातील सार । आपला करावा रघुवीर ॥ कलि अत्यंत मातला । नीतिकर्तव्याचा विसर पडला ॥ अनाचार होतसे फार । आता नाही रामावाचून दुजा ठाव ॥ चोराने घरफोड केले । मग जागृतीचे कारण नाही उरले ॥ म्हणून असावी सावधान वृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥ भगवंतासी अनन्य होता । दु:खाची नाही तेथे वार्ता ॥ अभिमानवृत्ति सोडावी बरी । त्यास घडे रामसेवा खरी ॥ सरे मीपणाची उरी । ब्रम्हरुप दिसे चराचरी ॥ म्हणून ज्याने जन्माला घातले । ज्याने आजवर रक्षण केले । तो माझा धनी हे ठेवून चित्ती । भावे भजावा रघुपति ॥ रामाचे व्हावे आपण । राम जोडावा आपण । हेच जन्माचे, प्रपंचाचे, मुख्य कारण ॥ म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता । धन्य त्याची माता पिता ॥ प्रपंच तसा परमात्म्यावाचून । हे जसे अलंकार सौभाग्यावाचून ॥ अलंकार सर्व घातले । पण सौभाग्यतिलक न लावले । तैसे रामाविण राहणे आहे खरे ॥ ऐहिक आणि पारमार्थिक । न जाणावे एकाहून एक परते ॥ ऐहिक आणि पारमार्थिक सुख । रामावाचून नाही देख ॥ म्हणून शुध्द असावे आचरण । तसेच असावे अंत:करण । त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥ रामचरणावर ठेवावा विश्वास । हेच परमार्थाचे भांडवल खास ॥ ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण । हीच परमार्थाची खरी शिकवण ॥ माझे हित भगवंताचे हाती । हीच ठेवावी मनाची प्रवृत्ति ॥ राम कर्ता ही असावी भावना । तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा ॥ भाव ठेवावा रामापायी । पण व्यवहार चुकू न देई ॥ परमात्म्याचे राखणे अनुसंधान । हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण ॥ बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ती असावा एक रघुपति ॥ प्रयत्न करणे आपल्या हाती । यश देणे भगवंताचे हाती ॥ प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे । परि परमात्मा उभा आहे मागे । ही ठेवावी जाणीव मनामध्ये ॥ प्रपंचात दक्षतेने वागत जावे । धीर सोडू नये । भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे ॥ सर्व कामधंदा घरी करी । पण चित्त लेकरांवरी । ऐसे जैसे करी जननी जाण । तैसे वागावे आपण ॥ काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥ नीतिधर्माचे आचरण । पवित्र असावे अंत:करण । त्यात कर्तव्याची जोड पूर्ण । त्या सर्वात राखता आले अनुसंधान । तर याविण दुजा परमार्थ नाही जाण ॥ व्यवहार उत्तम प्रकारचा केला । पण परमात्मा विसरला । तो व्यवहार दु:खच देता झाला ॥ N/A References : N/A Last Updated : April 20, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP