कूटस्थदीप - श्लोक ४१ ते ७६

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


"तर मग जीवापेतं वावकिल" श्रुतीवरुन शरीर मेलें तरी जीव मरत नाहीं. असें दिसतें तेव्हा आमच्या बोलण्यास विरोध येतो असं कोणी ह्मणेल तरत्यास श्रुतीचा भाव समजला नाहीं आहे स्पष्ट दिसतें कारण श्रुतीचा अर्थ जीवाला अत्यन्त नाश होतो असें नाहींचः तर त्यांचा अर्थ असा कीं, जीव हेंशरीर जीवाच अत्यन्त जातो म्हणजे शरीराबरोबरच याचा नाश होत नाहीं ॥४१॥

यावर आणखी अशी एक शंका आहे कीं, जीव जर विनाशी आहे तर अहंब्रह्मा असं तादत्म्यज्ञान त्याला कसें होईल ? कारण विनाशी आणि अविनाशी यांमध्यें विरोध आहे तर यांचे समाधान हेंच कीं दोहोंपैकी एकाची बाधा झाली असतांही सामानाधिकरण्य होऊं शकतें ॥४२॥

बाधा समानाधिकरण्यानें वाक्यार्थ कसा होतो एतद्विषयीं वार्तिककरांनीं दृष्टांतर्पुर्वक सांगितलें आहे एक मनुष्य मार्गानें जात असतां त्यांच्या पुढें एक पुरुष उभा होता, तो खुट आहे असं त्यास वाटतें पुढें जवळ येऊन जो पाहतो तों त्यांची स्थाणू बुद्धि जाऊण पुरुष बुद्धि झाली त्याचप्रमाणें मी ब्रह्मा असें ज्ञान होतांच मी जीव हें ज्ञान नष्ट होतें ॥४३॥

नैष्कर्म्यसिद्धिविनामक ग्रंथामध्यें आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्यें बाधेचा संभव आहे असें स्पष्ट सांगितलें आहे. त्यावरुन आचार्यांनी समानाधिकरण्यामध्यें बाधेचा संभव आहे असें स्पष्ट सांगितलें आहे त्यावरुन ब्रह्मास्मि या वाक्यालाही तो नियम लागु करण्यास कोणचीच हरकत दिसत नाहीं ॥४४॥

श्रुतीमध्यें " सर्व ब्रह्मा" या वाक्यांनें ब्रह्मा आणी जग या दोहोंचें सामानधिकरण्य ह्मणजे ऐक्य होतें. तसेंच अहंब्रह्मा या वाक्यानें जीव आणी ब्रह्मा यांचें ऐक्य होतें ॥४५॥

विवरणनामक ग्रंथामध्यें आचार्यांनी सामनाधिक करण्यामध्यें बाधा करण्याची गरज नाहीं असें ह्मटले आहे तें केवळ अहं शब्दांचा अर्थ कूटस्थ असं समजुन ह्मटलें आहे ॥४६॥

ह्मणजे बुधयादिकांपासुन विवेचन केलेला जो त्वंपदवाच्या कुटस्थ त्याला ब्रह्माची सत्यवादि लक्षणें लागतात म्हणुन कुटस्थाच ब्रह्म आहे असं विवरणांत व दुसर्‍या ग्रंथांत ठरविले आहे ॥४७॥

देहेंद्रियादियुक्त जो चिदाभास तो ज्या अधिष्ठान चैतन्यावर आह्माला भ्रमानें दिसतो. त्या चैतन्याला कुटस्थ असें आम्हीं नांव ठेविलें ॥४८॥

आणि ज्या अधिष्ठानावर भ्रमानें सर्व जग दिसत आहे त्या अधिष्ठानास वेदांतांत ब्रह्मा असं नांव ठेविलें आहें ॥४९॥

ह्मा ब्रह्माचैतन्यावर सर्व जगाचा आरोप जर आहे तर त्या जगाचा एक अंश जो जीवाभास त्याचाही आरोप असलाच पाहिजे ॥५०॥

जग आणि जीव या दोन उपाधींमध्यें भेद असला तरी त्यांचें अधिष्ठान जें ब्रह्माचैतन्य तें एकुच आहे ॥५१॥

भ्रमामध्यें कांहीं अधिष्ठानाचें व कांहीं आरोप्याचें असे दोहींचेंहीं धर्म भासलेपाहिजेत हें भ्रमाचें लक्षण चिदाभासास बरोबर लागु पडते तें कसें ? तर कर्तृत्वादि बुद्धिधर्म आणि स्फुरणरुप आत्म्याचा धर्म हे दोन्हीं त्याचेंमध्यें आहेत म्हणुन चिदाभास हा भ्रम आहे. ॥५२॥

या भ्रमाला कारण हेंचा कीं , बुद्धि म्हणजे काय ? चिदाभास कशाला म्हणावे ? आत्म्याचें स्वरुप कोणतें ? आणि त्यामध्यें जग कसें झालें ? या प्रश्नाचा उलगडा न होणें तोच मोहः आणी यालाच संसार असं म्हणतात ॥५३॥

वर सांगितलेंलें जें बुद्धायादिकांचें स्वरुप त्याचें विवेचन ज्याणें उत्तम केलें तोच तत्त्ववेत्ता आणि तोच मुक्त असा वेदातांचा ठराव आहे. ॥५४॥

असें असुन बंधमोक्ष कोणाला ? इत्यादिक तार्किक लोक पुष्कळ तर्क करितात . इतके आम्हाला पोरकट वाटतात की त्यांची उत्तरें देत बसणें हें केवळ व्यर्थ वेळ घालविणें आहे त्यांचें तोंड हर्षमिश्राचार्यांनीं आपल्या खंडन ग्रंथात चांगलें बंद करुन टाकिलें आहे. ॥५५॥

हें कुटस्थ विवेचन शैव पुराणांत केलेलें दृष्टींस पडतें. तेथें असें ह्मटलें आहे कीं, हा कुटस्थ सर्व काळीं सारखा आहे. मनाच्या वृत्ती असतांना तो त्या वृत्तीचा साक्षी होऊन असतो. वृत्ती उप्तन्न होण्यापुर्वी त्यांच्या प्रागभावाच साक्षी होऊन असतो. मुमुक्षु दशेंत जिज्ञोंसेंचा साक्षीं होऊन असतो. आणि अज्ञान दशेंत मी नेणतां आहे गा अज्ञानात साक्षी होऊन राहतो ॥५६॥

तो साक्षीं सच्चिदानंदरुप आहे त्यांची सिद्धता अशी जें असत्याचें अधिष्ठान असतें तें सत्य हा साक्षी असत्य जगांचे अधिष्ठान आहे ह्मणुन तो सद्र्गुप आहे जो जाडास भासविणारा तो चिदुप साक्षी जडास भसवितो म्हनुन तो चिदुप आहे ज्याजवर सदां सर्वदां प्रेम जडलेलें आसतें तो आनंदरुप साक्षीरुप नेहमीं आमचे प्रेम आहे म्हणून तो आनंदरुप आणि ज्याच्या योगानें सर्व पदार्थाची सिद्धि होऊन ज्याचा सर्व पदार्थांशी संबंध असतो. तो पुर्ण आमचा साक्षीही तसाच आहे म्हणुन तोही पुर्ण आहे. ( त्याप्रमाणें आत्मा हा सच्चिदानंद परिपुर्ण शिवरुपी आहे हें सिद्ध झालें ) ॥५७॥ ॥५८॥

याप्रमाणें शैव पुराणामध्यें जीवेश कल्पनारहित स्वयंप्रकाश शिव स्वरुपी कुटस्थाचें विवेचन केलें आहे ॥५९॥

माया ही प्रतिबिंबाच्या योगानें जीव आणि इश या दोघांना करिते. असें श्रुतीत सांगितले आहे. त्यावरुन ते दोघेही मायिक ठरतात. त्यामध्यें आणि देहादिकांमध्यें अंतर म्हणुन इतकेंच कीं तें स्वच्छ आहेत आणि देहादिक मळीण आहेत कीं जसें कांचेचा घट आणि मातीचा घट ॥६०॥

ज्याप्रमाणें मन आणि देह हींदोन्हीं अन्नापासुन झालेलीं असुन मन स्वच्छ आहे आणि देहमलीन आहे त्याप्रमाणे जीव आण ईश ही मायीक असुनही इतर पदार्थापैक्षा ते स्वच्छ आहेत ॥६१॥

त्यांत चैतन्यही आमच्या अनुभवास येतें म्हणुन तें चिदुप आहे हें कसें म्हणुन कोनी विचारुं नये. कारण पाहिजें ती कल्पना करण्यास समर्थ अशी जी माया तिलाकोणती गोष्ट अशक्य आहे ॥६२॥

किंबहुना आमचि निद्रा देखील स्वन्पाचेठायीं चेतनरुप जीवेश उप्तन्न करील मग ती महामाया त्यांस करितें यांत आश्र्चर्य तें काय ? ॥६३॥

त्या ईशाचेठायीं सर्वज्ञत्वादि धर्माची कल्पनाहीं ती मायाच करितें कारण जिणें धर्मीची कल्पाना केली तिला धर्माचें कल्पनेचे श्रम कितीसे होणार ? ॥६४॥

एथें कुटस्थ हा कल्पित आहे अशी फाजील शंका कोणी घेऊं नये. कारण त्याविषयीं श्रुतीमध्यें प्रमाण कोठेंही आढळत नाहीं. ॥६५॥

कुटस्थ हीच खरी वस्तु असा वेदातांत जिकडे तिकेड डांगोरा वाजत आहे. त्यावांचुन दुसर्‍या कोणत्याही पदार्थास सत्यता देणें म्हटलें म्हणजे वेदांतांस अगदीं खपत नाहीं ॥६६॥

आम्हीं एथें केवळ श्रुत्यर्थ स्पष्ट करुन दाखविन्याचें काम पत्करलें आहे आमच्या पदरच्या तर्कीनें आम्हीं कांहींचें बोलत नाहीं म्हणुन तार्किकांच्या शंकेस जागाच राहिली नाहीं ॥६७॥

याकरितां कुतर्क टाकुन देऊन मुमुक्षुनें श्रुतीचाच आश्रय कराया .आतां श्रुति तर असें सांगिते कीं माया हीजीव आणि ईश यांना करिते ॥६८॥

आरंभी ईक्षण आणि शेवटीं प्रवेश आहे जिच्या अशी सृष्टी ईश्वरानें केली, आणि आरंभी जागदावस्था आणि अंती मोक्ष असा संसार जीवानें केला आहे. ॥६९॥

आणि कुटस्थ अगदीं असंग आहे. त्यात कमजास्तपणा कधीही होत नाही. तर मनुष्यानें यांचा विचार चांगला मनामध्यें करावा ॥७०॥

कुटस्थास जन्ममरणादि भाव नाहीत याविषयीं श्रुति प्रमाण असें आहे कीं त्यास निरोध नाही; उप्तत्ति नाही; तो बुद्धही नाहीं; सांधकही नाहीं; तो मुमुक्षुही नव्हें; मुक्तहीं नव्हें; असें जें समजणें तोच परमार्थ ॥७१॥

जीव ईश आणि जग आणि जग यांचें जें श्रुतींनें प्रतिपादन केलें आहे तें केवळ आत्म्याचा बोध व्हावा. म्हणुन कारण तो वाणी व मनास अगम्य असल्यामुळे जीबादिकांस घेऊन त्यांचें वर्णन केल्याशिवाय त्याचा यथार्थ बोध व्हावयाचा नाहींच ॥७२॥

आतां श्रुतींमध्यें जें निरनिराळें सांगणें आढळतें, तें केवळे निरनिराळ्या विद्यार्थ्यास त्याच्या समजुतीप्रमाणें निरनिराळी प्रक्रिया सांगितली आहे. ती आपल्याला ठिकाणीं चांगलीच आहे असं आचार्यांनी म्हटलें आहे. ॥७३॥

सर्वे श्रुतीचे ताप्तर्य न समजल्यामुळें मुढास भ्रांति होते; परंतु विचारी मनुष्याची गोष्ट तशी नाही. तो तें तात्पर्य चांगलें जाणुन आनंदाच्या दोहांत बुडी देऊन बसतो ॥७४॥

त्या विचारी मनुष्याचा निश्चय असा बाणुस गेलेला असतो कीं हा मायारुप मेघ जगद्रुप पाण्याचा पाहिजे तितका वर्षाव करो. त्यापासुन या ब्रह्माकाशाला लाभ किंवा हाणि मुळींच नाहीं. ॥७५॥

आतां याची फलश्रुति सांगुन हें प्रकरण आटपतों, जो मनुष्य या कुटस्थ दीपांचें निरंतर अनुसंधान करितो तो स्वतः कुटस्थच बनुन जाऊन निरंतर प्रकाशतो ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP