द्वैतविवेक - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


गू०- ही सर्व द्वैतसृष्टि द्विविध आहे. इचा कांहीं भाग अंतर्यामी परमेश्वरानें उप्तन्न केला आहे, व कांही भाग जीवानें केला आहे. त्या दोनही भागाचे विवेचन करुन तुला दाखवितों म्हणजे त्यांपैकी जीवानें कोणत्या भागाचा त्याग करावा हें तुला स्पष्ट समजेल. ॥१॥

शि०- ही सृष्टी इश्वरानें उप्तन्न केली याला प्रमाण काय ? गू०- या गोष्टीस श्रुतीचीं प्रमाणें पुष्कळ आहेत." माया ही प्रकृति आहे; आणि त्या प्रकृतीस धारण करणारा परमेश्वर होय, तो मायी परमेश्वरच या सृष्टीस उप्तन्न करतो, अशा अर्थाच्या श्रुति श्वेताश्वतरशाखेंत आहेत. ॥२॥

ऐतरेय उपनिषदांत ही यास प्रमाण आहे. " हें जगत पूर्वी आत्माच होतें त्याच्या ईक्षणानेंच हें जग उप्तन्न झालें तो संकल्पेकरुन लोकांप्रत उप्तन्न करता झाला इत्यादि." ॥३॥

तैत्तिरिय श्रुतीतही असें सांगितलें आहे आकाश वायू, अग्नि, जल, पृथ्वी, औषधी, अन्न, देह हीं कर्मेकरुन एकापासून एक अशीं मुळब्रह्मपासून उप्तन्न झालीं. ॥४॥

मी एकाचा अनेक होईन. अशा संकल्पेकरुन तप करुन करुन सर्व जग उप्तन्न करता झाला. ॥५॥

छांदोग्या श्रुतीतही असेच म्हटले आहे "हें जग पुर्वी एक सद्वस्तुच होतें. एकाचे अनेक व्हावें अशी त्यासच इच्छा झाली. तेच उदक अन्न, अंडज जरायुज आणि उद्धिज्ज अशी सृष्टी त्यांतुनच उप्तन्न झाली." ॥६॥

आतां अथर्ववेदाचें प्रमाण ऐक "ज्याप्रमाणें प्रज्वलित अग्नीपासून ठिणग्या ( किठा ) बाहेर पडतात, त्याप्रमाणें सचेतन व अचेतन पदार्थ अक्षर बह्मपासून उप्तन्न होतात." ॥७॥

बृह दारण्याकांतही असेच आहे हें जग पुर्वी अव्याकृत म्हणजे विकरारहित होते. तेंच पुढें नामरुपाहिं करुन सविकार झाले. तीं नामरुपें विरडादि देहांत स्पष्ट आहेत. ॥८॥

विराट, मनु, नर, गो, खर इत्यादीकांपासून तो पिपीलिकांपर्यंत सर्व दृद्वें ईश्वरानेंच उप्तन्न केली. असें वाजसनेयी म्हणतात. ॥९॥

या श्रुतीत आणखी असें सांगितलें आहे, की जीव संबंधीं एक विलक्षण रुप उप्तन्न करुन इश्वर देहाचेठायीं प्रवेश करता झाला . देहाचेठायी जें प्राणधारण तेंच जीवत्व समजावें. ॥१०॥

शि०- जो वाचे लक्षण चांगलें स्पष्ट करुन सांगावें. गू०- लिंगदेहकल्पनेस आधारभूत जें अधिष्ठान चैतन्य तें त्यावर कल्पिलेला लिंगदेह व त्या लिंगदेहाचेठायीं असणारा जो चिदाभास तो या तीहींस मिळुन जीव असं म्हणतात. ॥११॥

शि०- जर देहाचेठायीं जीवरुपानें ईश्वरच प्रविष्ठ झाला आहे, तर त्या जीवास अज्ञत्वदुःखित्वादि विरुद्ध धरम कोठुन आले? ॥१२॥

गू०- महेश्वरसंबधी जी माया आहे, तिचे ठायी सृष्टी उप्तन्न करण्याची जशी एक शक्ति आहे, तशीच तिच्या अंगी मोह घालण्याचीही पण आहे, ती शक्ति जीवास मोहपाशांत घालुन त्यास सच्चिदानंद स्वरुपाचा विसर पाडतें. त्या मायांमोहानें परतंत्र होऊन मी देह अशा अभिमानानें तो शोक करतो एथवर ईश्वरसृष्टीदैवतांचे संक्षेपत वर्णन झालें. ॥१३॥

शि०- आतां जीवसृष्टीविषयी कांहीं प्रमाण असेल तर कृपाकरुन सांगावे. गू०- सप्तान्न ब्राह्मणाचेठायीं जीवसृष्टी द्वैतांचेंवर्णन केलें आहे. तें असें कीं पिता, जीव ज्ञान व कर्म ईहींकरुन सात प्रकारची अन्ने उप्तन्न करिता झाला. ॥१४॥

शि०- सात अन्नें उप्तन्न करण्याचें कारण काय ? गू- त्यांचा विनियोग आसा आहे. मनुष्याकरतां एक अन्न, पशुकरतां एक, देवताकरतां दोन आणि आत्म्याकरता तीन. ॥१५॥

ब्रीह्मदिक मनुष्याकरतां; दर्शपुर्णमास देवाक रतो; क्षीर, पशुकरतां आणि मन, वाणी व प्राणे ही आत्म्याकरतां अशीं सात अन्नें समनावीं. ॥१६॥

शि०- मग ही अन्नें ईषनिमित्तच झाली, ती जीवनिम्मत कशी ? गू- ही अन्नें जरी स्वरुपतः इश्वरानें निर्माण केली. तथापि ज्ञानकर्मांच्या योगानें त्यास अन्नत्व जीवानेंच दिले आहे म्हणून त्याचें भोग्यत्व त्यानेच निर्माण केलें आहे असे समजावे. ॥१७॥

ईश्वराची कृती आणि जीवाचा भोग या दोहोंनी हें जग बनलें आहे म्हणजे ईश्वरानें सृष्टी करावी, आणि ती जीवानी भोगावी यास दृष्टांत पित्यांचे उप्तन्न केलेली कन्या जशी भर्त्यास भोग्य होते, तद्वत शि०- ईश्वर कोणत्या साधनानें सृष्टी करतो, व जीव कोणत्या साधनानें करतो. ॥१८॥

गू- मायवॄत्यात्मक जो संकल्प तो ईशसष्टीचे सधन होय आणि मनोवृत्त्याम्तक जो संकल्प तो जीवसृष्टीचें म्हणजे तो ईश्वरष्टीचें साधन होय आणि मनोवृत्यात्म जो संकल्प तो जीवसृष्टीचे म्हणजे भोगाचे साधन होय. शि०- ईश्वराने उप्तन्न केलेल्या पदार्थात जीवाने निर्माण केलेला भोग्यत्वाकार आहे म्हणतात तो कोठें आहे. ॥१९॥

गू०- ईश्वराने निर्माण केलेल्या एकाच रत्‍नादि पदार्थाचे ठायीं भोगत्याच्या मनाच्या नानाविध वृत्तीच्या योगें नानाप्रकारचे भोग घडतात. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP