* गोपाष्टमी : गोष्ठाष्टमी
या दिवशी पहाटे गाईंना आंघोळ घालावी. गंधफुलांनी त्यांची पूजा करावी व वस्त्रालंकारांनी त्यांना सजवावे. शिवाय गोपाळां (गुराख्यां) चे पूजन करून गाईंना गोग्रास द्यावा. प्रदक्षिणा घालावी व गाईंबरोबरच थोडा काळा चालत जावे. असे केल्याने इच्छित फळ मिळते. याच दिवशी सायंकाळी गाई चरून येताच त्यांना नमस्कार करून, त्यांची पंचोपचार पूजा करावी. त्यांना पंचपक्वान्ने खावयास घालून त्यांची पायधूळ मस्तकी धारण करावी. यायोगे सौभाग्यवृद्धी होते.