कार्तिक शु. पंचमी

Kartika shudha Panchami


* जया पंचमी किंवा जयाव्रत

कार्तिक शु. पंचमीस हे व्रत करतात. गंगादी तीर्थांचे स्मरण करून तिलोद्वर्तन करून स्नान करून शुद्धासनी बसून भगवान 'हरी' व त्याच्या डाव्या बाजूस 'जया' ची स्थापना करावी. गंध व विविध फुलांनी प्रेमपूर्वक त्यांची पूजा करून हरीच्या विविध अंगांची (उदा पावले, गुडघे, छाती, पोट, वक्ष:स्थळ, कंठ, मुख, मस्तक इ. ) पूजा पद्मनाभ, नरसिंह, मन्मथ, दामोदर इ. नावांनी करावी.

'जयाय जयरूपाय जय गोविंदरूपिणे । जय दामोदरायेऽति जय सर्व नमोऽस्तु ते ॥'

या मंत्राने अर्घ्य द्यावे व सात तर्‍हेची धान्ये टोपलीत घालून त्यावर लालवस्त्र झाकावे व

'यथा वेणुफलं दृष्ट्‌वा तुष्यते मधुसूदन: । तथा मेहस्तु शुभं सर्वं वेणुपात्र प्रदानत: ॥

या मंत्राने टोपलीतील धान्ये ब्राह्मणांना द्यावीत. मग एका वस्त्रात गंधाक्षता, फुले, मोहर्‍या व दूर्वा घालून 'राखी' तयार करून 'येन बद्धो बलोराजा दानवेन्द्रो

महाबल: । तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'

या मंत्राने रक्षाबंधन करावे. हे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येसारख्या पापापासून मुक्ती मिळते व सर्व सुखांचा लाभ होतो.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP