चाळीस प्रकारचा काळा बाजार १ अगोदरची रक्कम मागून मांडणें,
२ कांहीं काळानें वसूल करावयाचा तो आजच मांडून टाकणें
३ वसूल होण्यासारखा असून न करणें,
४ वसूल करावयास नको तें करणें,
५ झालेला वसूल न मांडणें,
६ झालेला वसूल न दाखविणें,
७ थोडा असेल तो पुष्कळ दाखविणें,
८ पुष्कळ असेल तो थोडा दाखविणें,
९ एका सदराखालील वसूल भलत्या सदरांत दाखविणें,
१० एकाकडून आलेला दुसर्याचे नांवावर दाखविणें,
११ देणें तें न देणें,
१२ द्यावयास नको तें देणें,
१३ जेव्हां द्यावयास पाहिजे तेव्हां न देणें,
१४ जेव्हां द्यावयास नको असते तेव्हां देणें,
१५ थोडें देऊन पुष्कळ दिलें असें दाखविणें,
१६ पुष्कळ देऊन थोडें दाखविणें,
१७ एक वस्तूऐवजीं दुसरीच देणें,
१८ एकाचे दुसर्यास देणें,
१९ भरणा न करणें,
२० भरणा व करतां केला असें दाखविणें,
२१ किंमत आली नाहीं असा कच्चा माल नोंदून टाकणें,
२२ वसूल झालेली नोंद न करणें,
२३ ठोक वसूल होण्यासारखा हप्त्यानें वसूल करणें,
२४ हप्त्यानें द्यावयाचें तें एकदम वसूल करणें,
२५ हलकी वस्तु देऊन भारी किंमतीची घेणें,
२६ भारी किंमत, देऊन हलकी वस्तु घेणें,
२७ किंमती वाढविणें,
२८ किंमती उतरविणें,
२९ दिवस वाढविणें,
३० दिवस कमी करणें,
३१ वर्ष व वर्षांतील महिने यांतील मेळ घालवून टाकणें,
३२ महिना व महिन्यांतील दिवस यांतील मेळ नाहींसा करणें,
३३ गैरहजर मनुष्याची मजुरी काढून घेणें,
३४ उत्पन्नाचे सदरांत विरोध दाखविणें,
३५ धर्मादायांत लबाडी,
३६ तयार झालेल्या कामांत लबाडी करणें
३७ रक्कम अथवा माल यांत लबाडी,
३८ सोन्यारुप्यांत लबाडी,
३९ सवलती देतांना लुच्चेगिरी,
४० वजनमापांत फसविणें,
असे चाळीस प्रकारचे काळा बाजार कौटिल्य अर्थशास्त्रांत नमूद आहेत. (
[कौटिल्य अर्थशास्त्र अधि. २ अ. २९])