|
पु. बाजार ; मंडई ; विशेषत : फिरता बाजार , जत्रा . [ सं . हट्ट ] म्ह० १ हटीं जेवण मर्ठी निद्रा . ( स्वैराचार दाखविण्यासाठी योजतात ). २ हट गोड आहे परंतु हात गोड नाही . ( बाजारी माल चांगल आहे पण तयार करणारा चांगला नाहीं ). हटास ओघळ जाणें --- रेलचेल , समृद्धि असणॆं . पु . १ हेका ; दुराग्रह ; खणपट . २ मत्सर ; चुरस ; आकस ३ ( सामा .) आग्रह . [ सं . हठ ] ०जिरणें हट्टीपणा जाणें ; समजूत होणें पडणें ; ( एखाद्या गोष्टीस ) वळणें . हटा ( ट्टा ) स पेटनें हट्ट करुन बसणें ; जिद्दीस येणें ; अटीस पेटणें हटणें अक्रि . हट्टी बनणें ; हट्ट करणें ; न ऐकणें . कालपासून पोर हटला . ०करीकरीण पु. स्त्री ; दुकानदार . ०कोर खोर --- वि . हट्टी ; हेकाड ; हेकेखोर ; न जुमानणारा . ०कोरी पु. हटकरी पहा . राम्याराम्या लांब दोरी , हटकोर्याच्या भाकर्या चोरी . ०तट पु. १ अतिशय हट्टीपणा ; हेका ; आपलें खरें करण्यासाठी भांडण , धडपड , हटातटानें पटा रंगवुनि जटा घरिशी कांशिरीं। मठाची उठाठेव कां तरी . - राला २ चिकाटी ; अत्यग्रह . हटातटाचा , हटातटानें , हटातटीं असे प्रयोग रुढ आहेत . ०बाजार पु. बाजारहाट . कुटुंबवत्सळ खर्च पदरीं। म्हणवूनि घावे हटबाजारी। ०तटी क्रिवि . तडकाफडकीं . - शर . ०वट स्त्री. फळें ; भाजीपाला विकण्याची जागा ; भाजीबाजार . ०विलासिनी स्त्री. वेश्या ; बाजारबसवी . [ सं .] हटाऊ वि . १ बाजारांसंबंधी ; बाजारी . २ हलका ; क्षुद्र ; नीच . म्ह० हटाऊ गुरु आणि शिटाऊ - पटाऊ - भेटाऊ चेला . ०निग्रह पु. अत्यंत चिकाटी ; आग्रह ; हेका . ०वाद पु. अतिशय हट्ट ; हेकेखोरपणा . ( क्रि० करणें ; घेणें , धरणें ) ०वादी पु. अत्यंत हेकेखोर ; हट्टी . हटा ( ठा ) तू क्रिवि . जबरींने ; जुलमानें ; बळेंच [ सं .] हटिया वि . १ हट्टी . २ हटयोगी . म्हणूनि हटियांते जिणिजे। इहींचि जगीं। - ज्ञा ३ . २६६ . हटी वि . हट्टी पहा . हटु वि . १ हट्टी ; आग्रही . २ ( महानु .) न हटणारा . तया शौर्यंसीं तटु। बळेंसी हटु। - भाए ३५८ . हटूनतटून क्रिवि . १ हट्टांनें . २ चिकाटीनें ; निश्चयानें . हटेंच वि . १ हट्टानें बळेंच ; कोणाचें न ऐकतां . नको जाऊं म्हणत असतां इटेंच गेला २ हटात् पहा . हटेंतटें क्रिवि . १ झटकून . २ जबरीनें . हटेला वि . हट्टी ; दुराग्रही . हट्टी , हट्टीबाज - खोर वि . हटेला ; हेकेखोर ; दुराग्रही .
|