|
स्त्री. एका फळझाडाचे नांव . - न . या झाडाचें फळ ; सफरचंद . [ अर . सेब ] शेवीचे झाड - न . शेव . स्त्री. भाजीपाला वगैरे विकावयास आला असता त्यावर घ्यावयाचा ऐनजिनसी कर ( एक जुडी किंवा मूठभर ). शेवसबजी - स्त्री . भाजीपाल्यावरील कर . शेवसबजी व वानगी देशमुखाचे निमे करार केली असे . - वाडबाबा ३ . ३ . [ फा . ] स्त्री. एक खाद्यपदार्थ ; हरभर्याच्या डाळीचे पीठ छिद्रयुक्त पात्रांतून पाडून तळून करतात तो पदार्थ . क्रि.वि. १ उभ्या लंबरेषेत ; सरळ खाली ( क्रि० चालणे , ) धरणे . याच्या उलट करळ . २ ( व . ) हलकेच , सौम्यपणें . - वि . ( वि ) ठेंगणें . पु. १ टोक ; सीमा ; अखेरीस भाग ; कड ; शेवट ( गांव , शेत , जाळे , वस्त्र वगैरेचा ); शीव ; शिवरेचा आसमंतातचा भाग , २ पदर ; टोक ; शेवटचा भाग ( वस्त्राचा ). काही एक हसून शेवशिरीचा घेती कीं अलिंगना । - गंगाधर , रस कल्लोळ ८१ . ३ ( ल .) संबंध ; धागादोरा ; ( तपास , गुन्हा वगैरचा ) वादळाचा शेव हंयसर लागला . शहराचा शेव ४ माडी काढावयासाठी पोगीस जो छेद पाडतात तो . [ सं . सीमा ; शेप ] शेव घालणे - १ वस्त्राचा पदर हालवून बोलावणे . २ पदराने दिवा मालविणे . शेव घेणे - ओसरणे ; कमी होणे ; खाली जाणे , ( पूर , रोग , दुखणे वगैरे ). शेव देणे , पोहोचवणें - साथ करणे ; सूर धरणे ( गवयाची ). शेव बाधणें - ( कु . ) सहवासामुळे पीडा होणे ; वाईट संगति लागणे . शेव लावणे - अनुमोदन देणे , मदत करणें ; सहाय करणें ; हात देणे . शेव लावणे - जमीन उकरली न जातां वरवर खुरपणें , खरडणें . शेव येणें - पदर येणें ; स्त्री ऋतुमती होणे . ०कंड , कुंड , खंड - न . शेवेचा तुकडा . ०गांठी स्त्री. गुजराथी शेवेचा प्रकार .
|