|
पु. १ नवरसांपैकीं एक रस . संसाराची निःसारता , उपरति , सत्समागम इ० वर्णनांत हा योजतात . देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । - ज्ञा १० . ४२ . २ ( नृत्य ) डोळयाच्या पापण्या अर्धवट मिटणें , हा शांतरसाचा अभिनय आहे . - स्त्री , शांति ( ७ , १२ ) पहा . - वि . १ शांतियुक्त ; क्षुब्ध नसलेला ; निर्विकार ; निर्द्वेषी . २ संतुष्ट ; समाधानी . ३ सत्त्वगुणी ; सुशील . ( माणूस , स्वभाव , वागणूकसंबंधीं ). ४ थंड ; गार ; शमलेला ; विझलेला ( अग्नि , दिबा , इ० ). [ सं . शम् - शांत होणें ] ०दांत वि. १ अगदीं शांत ; थंड ; सौम्य . २ संयमी ; मनावर ताबा असणारा . शांतवन - न . १ शांति ; उपशमन . २ सांत्वन . करी पुत्रांचें समाधान । शांतवन कुंतीचें । - मुआ २८ . १०३ . शांतता - स्त्री . १ शांति ; संतोष ; समाधान . २ स्थिरस्थावर ; राग , क्षोभ , इ० चें प्रदर्शन नसणें . ३ निवांतपणा ; गडबड नसणें . शांति पहा . शांतविणें - क्रि . शांत करणें ; सांत्वन करणें . शांति - स्त्री . १ थांबणें ; शमन ; उपशमन . रोग - क्रोध - ज्वर - शांति २ शांतता ; स्थिरता ; स्वस्थता . ४ मंदता ; सौम्यत्व ; मृदुता . ५ वैराग्य ; विरागीपणा ; निर्विकारता . ६ समाधान ; संतुष्टापणा . ७ दुष्ट पिशाच्च , ग्रह वगैरेची पीडा दूर व्हावी म्हणून करावयाचीं जप , पूजा , मंत्रपठण वगैरे कर्मे . अरिष्ट शांति . ८ धार्मिक समारंभातील आकस्मिक उद्भवणारीं संकटें व अशुभ गोष्टी टळाव्यात म्हणून आगाऊ केलेलें कर्म . ९ ( ल . ) संसारापासून मुक्तता ; जीवितकष्टापासून सोडवणूक ; मृत्यु . १० शांत रस . जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । - ज्ञा ४ . २१८ . ११ मोक्ष ; ब्रह्म ; अंतिम साध्य . तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावे निश्चित । जयामाजी अचुंबित । शांति असे । - ज्ञा ४ . १८९ . १२ पीडा त्रास वगैरेपासून सुटका ; एखाद्या पीडाकारक मनुष्याची केलेली समजूत ; तृप्ति ; पीडेचें निवारण ; शांत . ( क्रि० करणें , होणें ). [ सं . ] शांतिक , शांतिकर्म - न . १ अरिष्ट ; त्रास ; पीडा ; यांच्या निवारणासाठीं शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें करावयाचा विधि ; शांति ; अरिष्ट - निवारक - कर्म . २ ( व . गो . ) ऋतुशांतीचा विधि ; गर्भाधान . - वि . १ शांतिकारक ; शांतता प्रस्थापक ; प्रशमन , उपशमन करणारे . २ आराधणारा ; आळवणारा ; आराधक ; प्रसन्नकारक ; शांतिकर - प्रद - कारक - दायक . [ सं . ] शांतिक पौष्टिक - न . अनिष्ठ निरसनार्थ केलेलीं कर्मे . [ सं . ] ( अप . ) शांतिपुष्टिक , शांतिपाठ - पु . १ बाळ बाळंतिणीला कसलीहि बाधा होऊं नये म्हणोन किंवा एरव्हींहि मांगल्यासाठीं करतात तो वेदमंत्रांचा पाठ ; मंत्रांचें पठण . २ ( ल . ) संकटें , अडचणी किंवा त्रास दूर करण्याची युक्ति , कला . ३ ( ल . ) एकसारखें जोरजोरानें रागें भरणें ; शिव्या देणें . [ सं . ] शांतिब्रह्म , शांतिमैंद - न . १ अतिशय शांतवृत्तीचा मनुष्य , धीर , गंभीर आणि शांत असा माणूस . २ वरून शांतवृत्ती दाखवून आंतून द्वेष मत्सरानें जळणारा . [ सं . ] शांतिरस - पु . ( साहित्य ) नऊ रसांपैकीं एक रस . नवरस , शांत पहा . [ सं . ] शांतिहोम - पु . अनिष्ट गोष्टी टाळण्याबद्दल केलेलें हवन . [ सं . ] शांतोदक - पुन . और्ध्व देहिकांत तेराव्या दिवशीं ज्या जाग्यावर मृत्यु घडला असेल त्या जागेच्या शुध्यर्थ व मृत्युशमनार्थ केलेली शांति , विधि . [ सं . ]
|