Dictionaries | References

वितंड

   
Script: Devanagari

वितंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
contrarily, perversely, wrongly, fruitlessly, vainly. As abridged from वितंडवाद, वितंड occurs alone as a noun masculine and also adverbially. Ex. भार्गव म्हणे हें वि0 ॥ सीतेवेगळें उचलेना ॥.

वितंड     

वि.  १ प्रचंड ; विशाळ ; मोठें ; प्रशस्त . तैशी तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखे । - ज्ञा ११ . ३७५ . भव्यरूप वितंड । - दा १ . २ . १० . शिवधनुष्या ऐसें वितंड । - ह २६ . ७८ . २ मिथ्या ; खोटें . नियोजिलीं वितंडें । ताळासि येती । - ज्ञा १३ . २१ . अवघें मायामय वितंड । स्वप्नवत् ‍ क्षणिक हें । - ह ६ . ६५ . ३ विचित्र ; अघटित ; चमत्कारिक . यम वर देतसे वितंड कीं तूं सुख पावसी उदंढ । - कथा ६ . १६ . १०५ . [ सं . वि + तड् ‍ ] - क्रिवि . कुटिल बुध्दीनें ; विनाकारण ; अट्टाहासानें . येणें मांडिलेसे पाखांड । ऐसा निर्भर्त्सितां वितंड । - एभा २३ . ५१९ .
०वाद  पु. अट्टाहासानें खोटा पक्ष स्थापन करण्यासाठीं वादविवाद ; मिथ्या वाद ; दुराग्रहपूर्वक वाद . ( समासांत ) वितंड - मत - भाषण - कथा - प्रलाप . वितंडा - स्त्री . ( न्याय ) व्यर्थ काथ्याकूट , वादविवाद ; अट्टाहासाचा वादविवाद . ( प्रतिपक्षस्थापनाहीनो जल्पः वितंडा ). [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP