Dictionaries | References

मृत्य

   
Script: Devanagari
See also:  मृत्यु

मृत्य     

पु ( काव्य )
मरण ; अंत . शोकार्णवीं नाना पडून , नित्य रडरडून पावले मृत्य । - ऐपो ४१९ .
यम ; अंतक . [ सं . मृत्यु ; मृ = मरणें ] ( वाप्र . )
०पावणें   मरणें . मृत्यूचा फांसा पडणें मरणोन्मुख फांसे । - मोआदि ४ . ८२ . सामाशब्द -
०कळा  स्त्री. मरणाच्या वेळीं तोंडावर दिसणारी कळा ; मरणकळा ; प्रेतकळा ; मरणाच्या वेळचा तोंडावरील फिक्कटपणा ; निस्तेजपणा .
०गंडांत  न. जीवावरचें संकट ; मृत्युप्राय संकट ; जीवावरचा प्रसंग ; गंडांत शब्द पहा .
०गोदान  न. 
( प्र . ) मृतगोदान ; मेलेल्या गाईचें दान . एका चिक्कू गृहस्थानें मेलेल्या गाईला नेऊन टाकण्याचा खर्च वांचावा म्हणून तिचें मरणप्राय स्थितींत एका ब्राह्मणाला दान केलें यावरुन वरील संप्रदाय प्रचारांत आला .
( ल . ) मरतुकडा प्राणी ; अत्यंत कृश व अशक्त असलेला मनुष्य किंवा पशु .
( ल ) निर्वीर्य मनुष्य ; पुचाट मनुष्य ; पुळचट इसम , मेमलतोंड्या .
०चिन्ह  न. मरणाचें चिन्ह ; मृत्युकाल समीप आल्याची खूण ; मरणकाळचें लक्षण ; महत्संकटाची सूचना . ( क्रि० उमटणें ; दिसणें ; होणें ).
०पंचक  न. ( ज्योतिष ) एक अशुभ योग ; या योगावर जन्म झाल्यास मरणाची भीति असते . पंचक पहा . अगे हा रुक्मिया दुर्बुद्धि । न पाहेचि लग्नसिद्धी । मृत्युपंचकाचे संधी । लग्नसिद्धी मांडिली । - एरुस्व १२ . ८ .
०पत्र  न. आपल्या मरणानंतर जिंदगीची व्यवस्था कशी व्हावी यासंबंधीं लिहिलेला लेख , दस्तऐवज .
०पत्र   - पु . मृत्युपत्राप्रमाणें जिंदगीची सर्व विल्हेवाट लावणारा .
चालविणारा   - पु . मृत्युपत्राप्रमाणें जिंदगीची सर्व विल्हेवाट लावणारा .
०पंथ   मार्ग - पु . मरणाची वाट ; मानवी जीवित ; मर्त्यलोक . मनुष्याचा जन्म हा मृत्युपंचक आहे आणि हें भूमंडल हें मृत्युपंथ नव्हे तर काय ?
०मुखीं   क्रिवि . ( मूळ शब्द मृत्युमुख ) मृत्यूच्या तोंडांत ; काळाच्या जबड्यांत .
०योग  पु. ( ज्योतिष ) एक कुयोग . रविवारीं अनुराधा , सोमवारी उत्तराषाढा , मंगळवारीं शततारका , बुधवारी अश्विनी , गुरुवारीं मृगशीर्ष , शुक्रवारी आश्लेषा , व शनिवारीं हस्त याप्रमाणें त्या त्या वरीं तीं तीं नक्षत्रें आलीं असतां त्या दिवशीं मृत्युयोग असतो .
०लोक  पु. पृथ्वी ; भूलोक .
०वेळ   वेळा - स्त्री . दिवसांतील एक अशुभ काळ ; काळवेळ . वेळ शब्द पहा . [ सं . वेला ]
०षडाष्टक  न. ( ज्योतिष ) मेष - कन्या , तूळ - मीन , मिथुन - वृश्चिक , सिंह - मकर , कर्क - कुंभ , वृषभ - धन ; या दोन दोन राशींतील अंतर सहा व आठ आहे . म्हणून यास षडाष्टक म्हणतात . या दोन राशींपैकीं एक वधूची व एक वराची असल्यास विवाहकार्यास हें वर्ज्य मानलें जातें . मृत्युंजय पु .
शंकर ; शिव . तात तुझा तेजस्वी मृत्युंजयसचिव होय अजित रणीं । - मोभीष्म ३ . २९ .
( वैद्यक ) एक मात्रा ; औषध . बचनाग , गंधक , मिरीं , टांकणखार , पिंपळी हीं औषधें एकेक भाग व हिंगूळ दोन भाग घेऊन आल्याच्या रसांत खलून त्याच्या गोळ्या करतात . हें औषध सर्व ज्वरांचा नाश करितें . [ सं . मृत्यु + जि = जिंकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP