|
संबोधन . ( खा . ) अहो . [ सं . भो - भात्रै ७ . १ ते ४ . ] पु. बंधु ; भ्राता . मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विनवावयासि भाउ निघे । - मोउद्योग ७ . ३४ . ( सांकेतिक ) चुलतबंधु , मामेबंधु , आतेबंधु , मावसबंधु इ० जवळचा नातेवाईक . एकच धंदा , संस्था , व्यवसाय इ० तील माणसें ; दोस्त ; सहकारी . एक बहुमानार्थी उपपद . जसें - हरीभाऊ , बाळाभाऊ इ० सदाशिवराव पेशवे . - पया १४८ . परशुराम त्रिंबक पटवर्धन . - पया ४९५ . [ सं . भ्रातृ ; प्रा . भाउ ] ०गर्दी स्त्री. ( पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें त्यावरुन ल . ) निकराचें युद्ध ; सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली . - भाब १ . ( ल . ) अंदाधुंदी ; धामधूम . सवेचि झाली भाऊगर्दी । - अफला ६५ . [ भाऊ + फा . गर्दी = नाश ] ०पण पणा बंद बंदकी बंदी - नपुस्त्री . बंधुत्वाची वागणूक . बंधुत्वाची स्थिति , संबंध . ( यावरुन ल . ) मित्रत्वाचें , सलगीचें नातें ; सख्य . भावाभावांतील वितुष्ट , तंटा . ०बंद पु. नातेवाईक ; दायाद ; आप्त . ०बहिणी स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २९६ . ०बीज स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया . या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि ओवाळणी घालतो . [ भाऊ + बीज = द्वितीया ] ०वळ स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा . [ भाऊ + आवलि ] भाऊवळीनें असाहि प्रयोग रुढ आहे . भाऊजी , भाओजी , भाऊ , ओ पु . नवर्याचा भाऊ ; दीर . बहिणीचा नवरा . नवर्याचा मित्र ; दीराप्रमाणें असणारा इसम . ( कों . ) बायकोचा भाऊ ; मेहुणा . [ भाऊ + जी = आदरार्थी प्रत्यय ]
|