-
अ. १ पक्षांतरबोधक अव्यय ; हे दोन शब्दांच्यामध्ये योजतात व त्याचा अर्थ दोन्हीचा नकार दर्शविणे असा होतो . उदा० बाप ना माय ; दिवस ना रात्र ; गांवात घर ना रानांत शेत . २ द्विरुक्त क्रियाविशेषण किंवा सर्वनाम यांच्यामध्ये योजिले असतां जर तर , ते नाही तर हे , हे नसले तर ते , असा अर्थ होतो . उदा० कांही ना कांही = कांही तरी ; कांही . कोणी ना कोणी = कोणीतरी , कोणी एक ( माणूस ). कधी ना कधी = कधी तरी ; एखादे वेळी . कसा न कसा ; केव्हा ना केंव्हां ; कोठून इ० . ३ नकारार्थी क्रिवि . जसेः - तो देईना , येईना - घेईना इ० . सर्वम हृदयकल्हारी । तेथ कारुण्यवेळच्या भरी । लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना । - ज्ञा २ . ७१ . ४ कांही संशयावरुन उत्पन्न झालेल्या आश्चर्यांचे द्योतक ; प्रश्नाच्या निश्चित कथनाच्या शेवटी येणारे अवधारणोच्चारित अव्यय . उदा० तूं येतोस ना ? देतोस ना ? तूं येतोस , होय ना ? मी जातोंना , वाचतोंना . ५ वर्तमान कृदंतापाठीमागून येणारे अतिरिक्त अव्यय . उदा० असतांना , खाताना , बसतांना = न खांता , नबसता इ० ६ कालवाचक क्रियाविशेषणानंतर अतिरिक्त अव्यय म्हणूनहि येते . जसेः - एव्हांना , तेव्हांना , केव्हांना = आंता , या क्षणी इ० . ७ नामांच्या व सर्वनामांच्या द्वितीयेचा व चतुर्थीच्या अनेकवचनांस लागणारा प्रत्यय . उदा० झाडांना , त्यांना . ८ नकारार्थी फारशी प्रत्यय . हा शब्दांच्या प्रारंभी लागतो . उदा० नाखूष ; ना पसंत ; नापीक . - स्त्री . १ नाकारणे ; नाही म्हणणे . ( क्रि० करणे ; म्हणणे ; बोलणे ). नाना करणे - म्हणणे = वारंवार अथवा पुष्कळदां नाकबूल करणे . २ नकार ; मनाई ; असंमती . माझी कांही त्या गोष्टीस ना नाही . - उअ . १ किंवा अथवा , असे नाही तर . ना ते आनंदाचे रसायणु । भवरोगियांसी । - शिशु ५८ . पूर्वी क्षीरसिंधूची बाळा । नेसली क्षीरोदक पाटोळा । ना तो पहावया कृष्णसोहळा । कांसे लागला क्षीराब्धी ॥ - एरुस्व ७ . ४४ . २ परंतु ; की . [ सं . न , ना ]
-
ind A disjunctive particle, Nor. It occurs significantly as a disjunctive between numerous adverbs and pronouns reduplicated. Not, i.e. if not that then (this)
-
कांहीं ना कांहीं Something or other, or some; some quantity more or less, great or little;
-
कोण्ही ना कोण्ही Some one; some person or other;
Site Search
Input language: