|
न. १ मूळ , बीजभूत कारण ; प्रारंभीचे , आधीचे कारण . २ परिणाम ; अखेर ; शेवटची स्थिति , अवस्था ; निरुपाय , नाइलाजाची स्थिति ; निर्वाण . ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानींची । - ज्ञा २ . ८६ . हे दोन रुपये निदानास कामास येतील . ३ अगदी वरचे किंवा अगदी खालचे टोंक ; स्थिति ; अत्युच्च किंवा अति नीच परमावधि ; जास्तीत जास्त कमीतकमी ( रक्कम इ० ). त्या धोतरजोड्यास दाहा रुपये पडतील हे निदान सांगितले आहे , पाहिजे तर घ्या . ४ रोगपरीक्षा ; रोग कोणता याचे अचूक ज्ञान ; रोगनिरुपणविद्या . आयुर्वेदांत निदानाची पांच आंगे आहेत - पूर्वरुप , रुप , लक्षण , चिन्ह , अंत . तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचे । - ज्ञा ११ . ९० . राजवैद्याने राणीच्या आजाराचे निदान वर्तविले . ५ शेवट ; समाप्ति ; मरण . पै नित्य सेविला मी निदानी । सेवकु होय । - ज्ञा ८ . १३३ . - एभा १ . २३३ . [ सं . ] - क्रिवि . सरतेशेवटी ; अधिकांत अधिक किंवा कमीत कमी ( किंमत , अटी ); सर्वोपरांतिक ; किमानपक्षी . ह्या घोड्याला निदान शंभर रुपये घेईन . हे काम तुला लोटेल तंववर तूं लोट , निदान मी आहे . [ सं . ] ०चा वि. अडचणीच्या वेळेकरितां राखून ठेवलेला ; ऐन प्रसंगी उपयोगी पडणारा . नातरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानींची । - ज्ञा २ . ८६ . ( समासांत ) निदानचा - सोबती - मित्र - मात्रा - चिकित्सा - उपाय - वाट इ० २ अखेरचा ; शेवटचा ; मरण प्रसंगीचा . निदानचा = प्रसंग - समय - किंमत निदानी सरतेशेवटी ; निर्वाणीच्या प्रसंगी ; निदानपक्षी . ०निदानची , निदानबाजू - स्त्री . शेवटची , अखेरची स्थिति . बाजू , निदानबाजू - स्त्री . शेवटची , अखेरची स्थिति . ०पक्ष क्रिवि . निदान ; कमीतकमी ; किमानपक्षी , शेवटी ; अखेरची गोष्ट म्हणून ; अखेर . - पु . निदान अर्थ २ पहा . हा अगदी निदानपक्षाचा उपयोग सांगितला . नि ६० . ०मत न. शेवटचे मत , इच्छा , मागणी ( खरेदीविक्रीच्या व्यवहारांत ) कमीतकमी सांगितलेली किंमत , सवाल . ०वृद्धि स्त्री. अतिशय जबर व्याज .
|