|
अव्य . विषयीं करितां ; तर्फे .- आफ . पु. १ राजाची कचेरी ; राजसभा ; राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा . २ ( ल . ) लोकांची सभा . ३ सरकारने कचेरी अथवा सभा भरविणे व भेटी इ० घेणे . ( क्रि० करणे ). ४ ( बडोदे ) संस्थानी सरकार . दरबारामार्फत जरुर ते अधिकार देण्यांत येतात . - स्वारीनियम १५ . [ फा . दर्बार ] ०खर्च पु. १ दरबारचे , सरकारचे अधिकार्यांना दिलेला पैसा . ०चा - दरबारी कुत्रे - पुन . ( व्यंगार्थी ) बक्षीस देऊन काम करुन घेण्यासारखे दरबारांतील चोबदार , वकील इ० अधिकारी . कुत्रा - दरबारी कुत्रे - पुन . ( व्यंगार्थी ) बक्षीस देऊन काम करुन घेण्यासारखे दरबारांतील चोबदार , वकील इ० अधिकारी . ०तोंड न. दरबारमधील ( लांचखाऊ ) अधिकारी . ( क्रि० भरणे ; दाबणे ; चेपणे ; धरणे ; संभाळणे ). ०महशूर वि. १ दरबाराशी परिचित ; दरबारी लोकांशी घसट असणारा . २ जाहीर ( वाईट कामाविषयी ); सर्वत्र जाहीर ( गोष्ट , काम ). [ फा . दर्बार + अर . मशहूर ] दरबारी वि . १ दरबारासंबंधीचा ; विशेष शिष्टाचारास अनुसरुन असा ( व्यवहार , बोली , मनुष्य इ० ). २ ( ल . ) पोकळ ; खोटा ; वरकरणी . ३ वैभवसंपन्न ; राजसभेचा घटक . [ फा . ] ०कानडा पु. ( संगीत ) एक राग . ह्यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . अवरोहांत धैवत वर्ज्य . जाती संपूर्ण षाडव . वादी ऋषभ , संवादी पंचम . गायनसमय मध्यरात्र . शास्त्रकारांच्या मते हा शुद्ध कानडा होय . याचे कौशी , अडाणा , जयमिनी , हुसेनी असे अनेक भेद आहेत . ०गडी पु. दरबारांत , सभेंत हुषारीने व तडफेने काम करणारा नोकर ; तरतरीत , हजरजबाबी सेवक . ०जोडा पु. ( ल . ) जुना , फाटका जोडा ( कोणी चोरुन नेला तरी चालेल असा . )
|