-
न. वजन ; गुरुत्व ; जडपणा . पारदाचें गौरव इतर पदार्थात नाहीं . २ - पु . न . अब्रू ; मोठेपणा ; भारदस्ती ; मान्यता ; सन्मान ( काम , मनुष्य यांचा ). आपले घरीं कोणी गृहस्थ आला असतां त्याचा गौरव करावा . ३ वजन ; भारदरी मुजाखा ; योग्यता . श्रीमंताजवळ याचें गौरव आहे . ४ सत्कार ; मान ; आदर ; पूजा . ( क्रि० करणें ; ठेवणें ; राखणें ). ५ डौल ; थाटमाट ; शोभा ; बडेजाव ; वैभव . काय हा आरंभरंभेचा गौरवु . - ज्ञा ६ . ४६२ . ६ विनाकारण जास्त श्रम , प्रयत्न कारणीं लावण्याचा दोष ; दु : ख , श्रम , अप्रिय , क्लेशस्थिति . याच्या उलट लाघव ; हाल ; त्रास ; कठिण गोष्ट . घोडा असतां पायीं चालाणें यांत गौरव आहे . [ सं . गुरु - गौरव ] गौरवण - न . मोठेपणा देणें ; सन्मान ; सत्कार . गौरविणें , गौवविणें - उक्रि . १ मानसन्मान करणें ; मोठेपणा देणें ; आदरानें वागविणें ; गौरव करणें . दिव्यालंकारवस्त्रें गौरवुनि । मंडपांत बैसविल्या . २ ( ल . ) अंगावर वस्त्र जळणें . ( जळणें शब्द अशुभ आहे म्हणून त्याऐवजीं ). विस्तवाजवळ बसूं नको लुगडें गौरवेल . गौरवी - वि . गौरवयुक्त ; आदरशील ; सन्माननीय ; सभ्य .
-
ना. आदर , इज्जत , पूज्यभाव , प्रतिष्ठा , मरातब , महत्त्व , मान , मान्यता , मोठेपणा , वैभव , शोभा , सत्कार , सन्मान .
-
n Weight or gravity.
-
n m Reputation. Pomp. Grievous state.
Site Search
Input language: